सोशल मीडिया स्टार आणि बिहारचे प्रसिद्ध शिक्षक खान सर पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पण यावेळी त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे नाही, तर त्यांच्या लग्नामुळे. त्यांच्या रिसेप्शनचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या चर्चेचे मुख्य कारण ठरली आहे त्यांची पत्नी. लोकप्रिय शिक्षक आणि YouTube सेन्सेशन असलेले खान सर, आपल्या मनोरंजक शिकवण्याच्या शैलीसाठी लाखो लोकांच्या मनात घर करून आहेत. आता त्यांच्या लग्नामुळे ते चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अत्यंत साधेपणाने लग्न केले. त्यानंतर पाटण्यामध्ये एक रिसेप्शन आयोजित केले. या कार्यक्रमात खान सर यांच्यापेक्षा अधिक चर्चा झाली ती त्यांच्या पत्नीची.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये काय?
रिसेप्शनमध्ये खान सर यांच्या पत्नीचा चेहरा पदराने झाकलेला दिसत आहे. त्यांनी लाल रंगाची साडी घातली होती. शिवाय त्यांनी नथनी घातली होती. परंतु, ज्या गोष्टीमुळे सोशल मीडियावर सर्वाधिक खळबळ उडाली, ती म्हणजे त्यांच्या भांगेत भरलेले सिंदूर भरलेला दिसला. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, खान सर यांच्या पत्नी हिंदू आहेत का? सोशल मीडियावर यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक युझर्सनी पोस्ट करून विचारले आहे की, जर सिंदूर लावले असेल, तर त्या दुसऱ्या धर्माच्या आहेत का? तर काहींनी याला केवळ एक परंपरा म्हटले आहे.
सांस्कृतिक परंपरा आणि सिंदूर
खरं तर, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये, मुस्लिम समाजातील काही स्त्रिया लग्नादरम्यान भांगेत सिंदूर भरतात. पारंपरिक श्रृंगार करतात. तेथील सामाजिक संस्कृतीत ही एक सामान्य बाब मानली जाते. याच कारणामुळे अनेक लोक याला खान सर यांच्या पत्नीच्या सांस्कृतिक मुळांशी जोडून पाहत आहेत.
खान सर यांच्याबद्दलचे गूढ कायम
खान सर यांनी अद्याप आपल्या पत्नीचे नाव किंवा त्यांचे स्वतःचे खरे नाव सार्वजनिक केलेले नाही. या रहस्यमयतेमुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. काही लोकांनी घुंगटबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी याला 'मागासलेल्या विचारांचे' प्रतीक म्हटले आहे, तर काहींनी 'वैयक्तिक पसंती' असे म्हटले आहे. खान सर यांनी एकदा एका ऑनलाइन क्लासमध्ये खुलासा केला होता की, भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान त्यांनी गुपचूप लग्न केले होते. त्याला खूप कमी लोक उपस्थित होते. आता जेव्हा रिसेप्शन झाले, तेव्हा सोशल मीडियावर त्यापेक्षा कितीतरी जास्त चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे, कधी शिकवण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत असलेले खान सर, आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रसिद्धीच्या झोतात आहेत. नाव नसले तरी, त्यांची शैलीच हे सांगायला पुरेशी आहे की, खान सर जिथे जातात, तिथे चर्चा आपोआप होते.