देव तारी त्याला कोण मारी… अशीच एक घटना कोलकातामध्ये घडली आहे. तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक सुशांत घोष यांच्यावर हल्ला करुन त्यांना त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोराने सुशांत यांच्यावर पिस्तुल रोखली आणि ट्रिगरही दाबला. मात्र सुदैवाने सुशांत घोष बचावले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली असून घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हिडीओत दिसतंय त्यानुसार, सुशांत घोष हे काही जणांसोबत त्यांच्या घराबाहेब बसले होते. त्यावेळी दोन हल्लेखोर दुचाकीवर येतात. त्यापैकी एका हल्लेखोराने पिस्तुल काढून घोष यांच्यावर रोखली, ट्रिगरही दाबला. मात्र त्यातून गोळी सुटली नाही. पिस्तुलातील तांत्रिक बिघाडामुळे त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. हल्लेखोरांना घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी दोन्ही हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
(नक्की वाचा- हेलिकॉप्टरची अचानक तपासणी, सैनिकांच्या अंधारातील कवायती पाहून अधिकारी हादरले)
पाहा VIDEO
कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशन नगरसेवक सुशांत घोष यांनी याबाबत म्हटलं की, "मी 12 वर्षे नगरसेवक आहे आणि मला कधीच वाटले नव्हते की माझ्यावर हल्ला होऊ शकतो."
गोळीबाराचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोरांनी स्कूटरवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र घाई गडबडीत ते घसरून पडले. त्यानंतर नगरसेवक सुशांत घोष यांना हल्लेखोरांचा पाठलाग करून त्यांना पकडले. स्थानिक नागरिक आणि घोष यांच्या कार्यकर्त्यांना हल्लेखोरांना जबर मारहाण केली.
(नक्की वाचा - बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्याला पाहिलं का? घटनास्थळावरच शिवकुमारला पोलिसांनी हटकलं होतं)
पोलिसांना याबाबत सांगितलं की, आरोपींना या कामासाठी अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्याला फक्त एक फोटो देण्यात आला आणि हत्या करण्यास सांगितले होते. हत्येनंतर पैसे मिळणार होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवकाची हत्या करण्यासाठी बिहारमधून शूटर नेमण्यात आले होते. या हल्ल्यामागे परस्पर वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.