konark sun temple garbhagriha : कोणार्क सूर्य मंदिराशी अनेक रहस्य कथा जोडल्या गेल्या आहेत. सूर्य मंदिरावरील विशाल चुंबकीय दगड असो वा वास्तूकाराची आत्महत्येचा मुद्दा... या वास्तूशी अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत. या मंदिरातील गर्भगृहातील वाळू काढण्याचं काम सुरू झालं आहे. त्यामुळे लवकरच नवी रहस्य समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या कोणार्क सूर्य मंदिराच्या संवर्धनाच्या इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने सोमवारी कोणार्कमधील गर्भगृहातून वाळू काढण्याची बहुप्रतिक्षित प्रक्रिया सुरू केली आहे.
१३ व्या शतकात निर्मिती झालेली ही अद्वितीय वास्तू भारतीय स्थापत्य आणि सूर्य उपासनेची महान वारसा मानला जातो. याच्या गर्भगृहाला १९०३ मध्ये ब्रिटीश प्रशासकांनी संरचनात्मक कारणांमुळे वाळू आणि दगडांनी भरून बंद केलं होतं.
परंपरा आणि विज्ञान एकत्र येत अभियानाला सुरुवात...
गेली १२२ वर्षे कोणार्क सूर्य मंदिराचं गर्भगृह बंद होतं. त्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. अभियानाची सुरुवात पारंपरिक विधींसह करण्यात आला. अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर एएसआयच्या विशेतज्ज्ञांच्या टीमने गर्भगृहाच्या प्रखम मंडपाच्या पश्चिमेकडील ४ फूट x ४ फूट बोदगा बनवून वाळू हटविण्याचं काम सुरू केलं. याशिवाय भिंतीची मजबुती तपासण्यासाठी १७ इंचाती कोर ड्रिलिंगदेखील करण्यात आलं. संपूर्ण प्रक्रियेचं पर्यवेक्षण एएसआयचे अधीक्षक डी.बी. गडनायक आणि प्रादेशिक संचालक दिलीप खमारी यांनी केले. १० तज्ज्ञांच्या पथकाने जागेच्या संरचनात्मक स्थितीचे बारकाईने परीक्षण केले.
तांत्रिक तपासात गर्भगृहातील अंतर्गत रहस्य उघड
गर्भगृहाच्या अंतर्गत स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय भवन अनुसंधान संस्थानाने लेजर स्कॅनिंग, अँडोस्कोपिक तपास आणि रोबोटिक कॅमेऱ्याचा उपयोग केला. सर्वेक्षणानुसार, गर्भगृहाच १७ फूट वाळू आहे. तर दुसरीकडे छताला आधार देणारं लोखंडी तुळई आणि मोठमोठाला दगड अस्ताव्यस्त पसरले आहेत.
२०११ मध्ये कोणार्कच्या संरक्षणावर एक आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यानंतर ओडिशा हाय कोर्टाने मंदिराकडे लक्ष देण्यासाठी अमीकस क्युरीची नियुक्ती केली. बऱ्याच चर्चेअंती वैज्ञानिक अभ्यासानंतर २०२० मध्ये एएसआयच्या उच्चस्तरीय बैठकीत वाळू हटविण्याची मंजुरी दिली.