Kota News : आजारी पत्नीची सेवा करण्यासाठी नोकरी सोडली, फेअरवेल पार्टीत पत्नीचा मृत्यू

या घटनेनंतर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कोटा:

कोटामधील एका व्यक्तीने आपल्या आजारी पत्नीची सेवा करण्यासाठी नोकरी संपण्याच्या आधीच निवृत्तीचा निर्णय घेतला. मात्र निवृत्तीच्या सेलिब्रेशनदरम्यान धक्कादायक प्रकार झाला. ऑफिसमध्ये सुरू असलेल्या निवृत्तीच्या पार्टीत एकमेकांना फुलांची माळ घातल्यानंतर अचानक पत्नीची तब्येत बिघडली आणि तिने जीव सोडला. ही घटना कोट्यातील डकनिया भागातील आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र संदल हे सेंट्रल वेअर हाऊसच्या मॅनेजर पदावर काम करीत होते. त्यांनी निवृत्तीच्या तीन वर्षांपूर्वीच VRS घेतली. मंगळवारी त्यांचा ऑफिसमधील शेवटचा दिवस होता. यासाठी सहकाऱ्यांनी पार्टीचं आयोजन केलं होतं. देवेंद्र यांच्यासह त्यांची पत्नी टीनादेखील तेथे उपस्थित होत्या. एकमेकांना फुलांच्या माळा घातल्यानंतर काही वेळात टीना खुर्चीवरून खाली कोसळल्या. यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

नक्की वाचा - हनिमूनला जाण्यावरुन वाद, सासऱ्याने जावयासोबत केलं भयंकर कृत्य, कल्याणमध्ये खळबळ

देवेंद्र यांची पत्नी टीना या बऱ्याच वर्षांपासून आजारी होत्या. टीना यांना हृदयाचा आजार असल्याने देवेंद्र यांनी नोकरीतून VRS घेतलं. निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर सहकाऱ्यांनी पार्टीचं आयोजन केलं होतं. मंगळवारी निवृत्तीचा कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी टीना आणि त्यांचे पती देवेंद्र उभे होते. मात्र अचानक टीना खुर्चीवर बसल्या आणि खुर्चीवर बसल्या बसल्या त्या खाली कोसळल्या. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.