Leopard Attack: आई समोरच चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, लेकीला वाचवण्यासाठी आईची धडपड अन्...

या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI image

Leopard Attack: चिमुकली आपल्या आई सोबत शेतावर गेली होती. आई शेतात काम करत होती तर चिमुकली शेतात खेळत होती. पुढे काय होणार याची पुसटती कल्पनाही या माय लेकींना नव्हती. त्याच वेळी शेतात अचानक बिबट्या आला. त्याची नजर शेतात खेळत असलेल्या त्या चिमुकलीवर पडली. त्याच वेळी आईची नजरही त्या बिबट्यावर पडली. आई काही करणार तेवढ्यात या बिबट्याने त्या चिमुकलीवर हल्ला केला. त्याच वेळी तिथे एकच गोंधळ उडाला. आईने लेकीला वाचवण्यासाठी टाहो फोडला. ही अंगावर काटा आणणारी घटना मध्य प्रदेशातल्या बडवानी इथं घडली आहे. 

जिल्ह्यात रविवारी  ही हृदयद्रावक घटना घडली.  चिमुकली आपल्या आईसोबत शेतात गेली असताना हा हल्ला झाला. आईच्या डोळ्यासमोरच बिबट्याने या चिमुरडीच्या गळ्या धरले. त्यानंतर तिला ओढले. बिबट्याने हल्ला केल्यानंतर चिमुकलीच्या आईने आणि शेतातील इतर मजुरांनी तात्काळ मोठा आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या मुलीला सोडून जंगलाच्या दिशेने पळून गेला. पण त्याने मुलीवर हल्ला केली होता. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्या चिमुकलीला मृत घोषीत केले. 

नक्की वाचा - Kalyan News: कल्याणमध्ये नशेखोरांचा हैदोस! खात्री पटल्याशिवाय लोक उघडत नाहीत दार

मृत मुलीचे नाव गीता आहे. तिच्या मानेवर बिबट्याने खोलवर जखमी केली होती. त्यात तिचा मृत्यू झाला. याघटनेनंतर राजपूर उपविभागातील किरता फलिया गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात कामाला जायचे की नाही असा प्रश्न गावातल्या लोकांना पडला आहे. या भागात अनेक वेळा बिबट्याचे दर्शन होते. शिवाय ते लोकांवर हल्ले ही करत आहेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याची मागणी गावकरी वारंवार करत आहेत. त्यामुळे या घटनेनंतर तरी प्रशासन काही कारवाई करणार का असा प्रश्न गावकरी करत आहेत.

नक्की वाचा - Navratri 2025: नवरात्रात घरात 'या' गोष्टी आणल्याने वाढते सुख-समृद्धी, मिळतो देवी भगवतीचा आशीर्वाद

ही घटना जिल्हा मुख्यालयापासून 37 किलोमीटर दूर असलेल्या राजपूर उपविभागातील किरता फलिया गावात घडली. शेतात काम करत असतानाच अचानक बिबट्याने चिमुकलीला गळ्यापासून पकडले. मुलीच्या आईने आणि इतर मजुरांनी मोठा आरडाओरडा केल्यावर, बिबट्या जखमी मुलीला सोडून जंगलाकडे गेला. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या चिमुकलीच्या मानेवर दोन्ही बाजूने हल्ला झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव गीता असून ती फक्त एक वर्षाची होती. यापूर्वीही याच बिबट्याने एका बकरीला मारले होते. गेल्या 35 दिवसांत या परिसरात बिबट्याचा हा तिसरा हल्ला आहे. वन विभागाने या बिबट्याचा शोध घेतला असून त्याला पकडण्यासाठी पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. परिसरात 24 तास गस्त वाढवण्यात आली आहे.

Advertisement