2 hours ago

Tamil Nadu Kerala Puducherry Assembly election Result LIVE 2026: तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा जागांसाठी 23 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवार, 4 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. तामिळनाडूतील मुख्य लढत डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात आहे, परंतु अभिनेता विजयने तामिळगा वेटी कळघम (टीव्हीके) मधून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने  ही लढत अधिकच रंजक बनवली आहे. 

पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीतील सर्व 30 जागांसाठी 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. आज, 4 मे रोजी मतमोजणी होत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 17 जागांची आवश्यकता आहे.

Advertisement
May 04, 2026 11:46 (IST)

Tamil Nadu election Result: कलांनुसार विजयचा TVK 112 जागांसह सर्वात मोठा पक्ष

Tamil Nadu election Result: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत, ट्रेंडनुसार विजय यांच्या टीव्हीके पक्षाने ११२ जागासह सर्वात मोठा पक्ष आहे.

May 04, 2026 10:43 (IST)

Tamil Nadu election Result LIVE 2026: कलांनुसार विजय यांचा टीव्हीके पक्षाची बहुमताच्या दिशेने वाटचाल

तामिळनाडू निवडणुकीच्या ट्रेंडनुसार, अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाने जोरदार लढत दिली आहे.  पक्ष हळूहळू बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Advertisement
May 04, 2026 09:37 (IST)

Tamil Nadu election Result LIVE 2026: तामिळनाडूमध्ये मोठा उलटफेर होणार? टीव्हीकेची मोठी आघाडी

तामिळनाडूमध्ये मोठा उलटफेर होणार?

टीव्हीके ६७ जागांवर, डीएमके ५८ जागांवर, तर एआयडीएमके ५५ जागांवर आघाडीवर

May 04, 2026 09:31 (IST)

Tamil Nadu election Result: तमिळनाडूमध्ये 234 पैकी 156 जागांचे कल हाती आले

तमिळनाडूमध्ये सत्ताबदल होणार का डीएमके सत्ता राखणार?

234 पैकी 156 जागांचे कल हाती आले

सुरूवातीच्या कलांमध्ये टीव्हीकेचे 48 उमेदवार आघाडीवर

डीएमकेचे 62 उमेदवार आघाडीवर  

एडीएमकेचे 45 उमेदवार आघाडीवर

May 04, 2026 09:28 (IST)

Tamil Nadu election Result LIVE 2026: केरळमधील 140 पैकी 80 जागांचे कल हाती

केरळच्या 140 पैकी 80 जागांचे कल स्पष्ट झाले आहेत. यापैकी, यूडीएफ 45 जागांवर, एलडीएफ 25 जागांवर, तर भाजप चार आणि उर्वरित सहा जागांवर आघाडीवर आहे. 

May 04, 2026 09:10 (IST)

Tamil Nadu election Result: तमिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या पक्षाची चांगली कामगिरी

तमिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या पक्षाची चांगली कामगिरी

टीव्हीके पक्षाचे 25 उमेदवार आघाडीवर

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एडीएमकेचे 26 उमेदवार आघाडीवर

सत्ताधारी पक्ष डीएमकेचे 56 उमेदवार आघाडीवर

234 पैकी 110 जागांचे कल आतापर्यंत हाती आले

Advertisement
May 04, 2026 08:58 (IST)

Kerala Results LIVE: केरळमधील 23 पैकी 13 जागांवर काँग्रेस आघाडीवर

Kerala Results LIVE:  केरळमध्ये काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ 13 जागांवर, तर डाव्यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ 15 जागांवर आघाडीवर आहे. भाजप तीन जागांवर, तर इतर पक्ष एका जागेवर आघाडीवर आहेत.

May 04, 2026 08:47 (IST)

Tamil Nadu election Result: मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष 32 जागांवर आघाडीवर

Tamil Nadu election Result:  तामिळनाडूमध्ये स्टॅलिनचा डीएमके पक्ष 32 जागांवर, एडीएमके 9 जागांवर आणि टीव्हीके 6 जागांवर आघाडीवर

Advertisement
May 04, 2026 08:44 (IST)

Tamil Nadu election Result: कोलाथूर मतदारसंघातून मुख्यमंत्री स्टॅलिन पिछाडीवर

Tamil Nadu election Result: कोलाथूर मतदारसंघातून मुख्यमंत्री स्टॅलिन पिछाडीवर

May 04, 2026 08:27 (IST)

Tamil Nadu election Result: तमिळनाडूमध्ये सत्ताधारी डीएमकेची आघाडी वाढायला लागली, 9 जागांवर आघाडी

Tamil Nadu election Result:  तमिळनाडूमध्ये सत्ताधारी डीएमकेची आघाडी वाढायला लागली, 9 जागांवर आघाडी

May 04, 2026 08:25 (IST)

Tamil Nadu election Result: तामिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजय पिछाडीवर

Tamil Nadu election Result: तामिळनाडूमध्ये अभिनेता थलपती विजय पिछाडीवर
तमिळनाडूमध्ये डीएमके 7 जागांवर, एआयडीएमके 3 तर टीव्हीके 1 जागेवर आघाडीवर

May 04, 2026 08:22 (IST)

Tamil Nadu election Result LIVE 2026: तामिळनाडूमध्ये डीएमके 4 जागांवर आघाडीवर

तामिळनाडूमध्ये डीएमके ४ जागांवर आघाडीवर

May 04, 2026 08:19 (IST)

Kerala Results LIVE: केरळमध्ये काँग्रेसचा धमाका, 13 पैकी 8 जागांवर आघाडी

केरळमध्ये काँग्रेस पक्ष जोरदार पुनरागमन करत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ लक्षणीय आघाडी घेत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 13 जागांचे कल समोर आले असून, त्यापैकी आठ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. एलडीएफ तीन जागांवर, भाजप एका जागेवर आणि इतर एका जागेवर आघाडीवर आहेत.

May 04, 2026 08:18 (IST)

Kerala Results LIVE: केरळमध्ये 9 जागांवरील कल हाती

केरलमध्ये 9 जागांचे कल हाती लागले असून,  6 वर यूडीएफ आघाडीवर आहे. तर दोन जागांवर एलडीएफ आघाडीवर आहे. तर एका जागेवर भाजप आघाडीवर आहे. 

May 04, 2026 08:16 (IST)

Tamil Nadu election Result: डीएमके तीन जागांवर आघाडीवर

Tamil Nadu election Result: तामिळनाडूत सुरुवातीच्या कलांत डीएमके तीन जागांवर आघाडीवर

May 04, 2026 08:11 (IST)

Kerala election Result LIVE: केरळमधील पहिले कल UDF च्या बाजूने

Kerala election Result LIVE: केरळमध्ये एकूण 140 विधानसभा जागा असून, बहुमतासाठी 71 जागा आहेत. केरळमधील पहिला कल यूडीएफच्या बाजूने गेला आहे. 

May 04, 2026 08:08 (IST)

Tamil Nadu election Result: दिल्लीतील भाजप कार्यालयात पुरी-भाजी आणि मिठाई बनवण्यास सुरुवात

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपने जल्लोष सुरू केला आहे. दिल्ली भाजप कार्यालयात पुरी, भाजी आणि मिठाई बनवण्याची तयारी सुरू झाली आहे.

May 04, 2026 07:13 (IST)

Kerala election Result LIVE: केरळमध्ये कशी आहे स्थिती?

Kerala election Result LIVE: केरळमध्ये कशी आहे स्थिती?

May 04, 2026 07:06 (IST)

Tamil Nadu election Result LIVE 2026: तामिळनाडूत कुणाचं पारडं जड?

तामिळनाडूत यंदाच्या निवडणुकीत कशी आहे स्थिती? कुणाचं पारडं जड?

May 04, 2026 06:59 (IST)

Kerala election Result LIVE: केरळमध्ये 10 वर्षांनंतर सत्तांतर होणार?

Kerala election Result LIVE: केरळमधील एक्झिट पोलने  10 वर्षांनंतर सत्तांतर होण्याचे संकेत दिले आहेत. 140 जागा असलेल्या केरळमध्ये बहुमताचा आकडा 71 आहे. एनडीटीव्ही पोल ऑफ पोल्सनुसार, डाव्या आघाडीला (एलडीएफ) यावेळी धक्का बसू शकतो.

  • यूडीएफ (काँग्रेस आघाडी): 75 जागा
  • एलडीएफ: 60 जागा
  • एनडीए: 4 जागा

May 04, 2026 06:57 (IST)

Kerala election Result LIVE: केरळमध्ये कोण बाजी मारणार?

Kerala election Result LIVE: काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं की यूडीएफचा विजय निश्चित आहे. "आम्हाला विश्वास आहे की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ विजयी होईल. आरन्मुला मतदारसंघातून निवडणूक लढवलेले भाजपचे ज्येष्ठ नेते कुम्मनम राजशेखरन म्हणाले की, पक्षाला ही जागा जिंकण्याचा विश्वास आहे. त्यांनी असेही सांगितले की, राज्यात खाते उघडण्याची भाजपला आशा आहे. 

May 04, 2026 06:55 (IST)

Tamil Nadu election Result: स्टॅलिन यांची सत्ता टीकणार की जाणार?

Tamil Nadu election Result LIVE 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एकूण 48.8 मतदारांनी मतदान केले. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासाठी, डीएमकेचे कल्याणकारी शासन मॉडेल, सामाजिक न्यायाचा अजेंडा आणि आघाडी व्यवस्थापन सत्ताविरोधी लाटेचा सामना करू शकते की नाही, याची ही निवडणूक एक कसोटी आहे.

Topics mentioned in this article