जाहिरात
7 months ago
मुंबई:

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर शुक्रवारी मतदान झालं. .या टप्प्यातील ताज्या आकडेवारीनुसार 61. 40 टक्के मतदान झालं. त्रिपूरामध्ये सर्वात जास्त 78.00 टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 53.20 टक्के मतदान झालं. महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात 53.70 टक्के मतदान झालं. मणिपूरमध्ये 77.20 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 71.80 टक्के आसाममध्ये 70.07, जम्मू काश्मीरमध्ये 67.40, केरळमध्ये 65.00, कर्नाटकात 64.00, राजस्थानमध्ये 60.50, मध्य प्रदेशात 55.50 आणि बिहारमध्ये 54.20 टक्के मतदान झालं. 
 

महाराष्ट्र - 53.70%

त्रिपूरा - 78.00%

मणिपूर - 77.20%

पश्चिम बंगाल - 71.80%

आसाम - 70.07%

जम्मू काश्मीर - 67.40%

केरळ - 65%

कर्नाटक - 64.00%

मध्य प्रदेश - 55.50%

बिहार - 54.20%

उत्तर प्रदेश - 53.20%

दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत झालेलं मतदान

वर्धा - 56.66 टक्के

अकोला - 52.49 टक्के

अमरावती - 54. 50 टक्के

बुलडाणा -  52.24 टक्के

हिंगोली -  52.03 टक्के

नांदेड -  52.47 टक्के

परभणी -53.79 टक्के

यवतमाळ - वाशिम -54.04 टक्के

हिंगोलीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदानाची नोंद

हिंगोली लोकसभा मतदार संघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 52.03% इतकं मतदान झाले आहे. 

5 वाजेपर्यंत वर्धा लोकसभा मतदार संघात 56.67 टक्के मतदान

वर्धा लोकसभा मतदान टक्केवारी

सकाळी 9 वाजता -  6.63% 

सकाळी 11 वाजता -18.35%

दुपारी 1 वाजता -     32.32%

दुपारी 3 वाजता -     45.95

 5 वाजता -              56.67%

नांदेडमध्ये एका व्यक्तीने कुऱ्हाडीने फोडले ईव्हीएम

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बॅलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली. या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे तो ओरडत होता. मतदान केंद्रावर गृह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते. पण त्यांचाही नाईलाज झाला. या फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनाचा दावा आहे.

95 वर्षीय आजीने रूग्णवाहीकेत जाऊन केले मतदान

प्रशासनाकडून जेष्ठ नागरिकांना घरून मतदान करण्याची सोय करण्यात आली होती. मात्र योग्य नोंदी न ठेवल्यामुळे आणि प्रशासनाकडून  घरपोच जाऊन मतदान करून न घेतल्यामुळे याचा नाहक त्रास एका जेष्ठ नागरिकांला सहन करावा लागत. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे 95 वर्षीय विमल पाठक या महिलेला उन्हाच्या तडाख्यात रुग्णवाहीकेत जाऊन मतदान करावे लागले. ही घटना वाशिममध्ये घडली. 

खासदार भावना गवळी यांनी बजावला आपल्या मतदानाचा हक्क

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी उशिरा आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. वाशिम शहरातील राजेंद्र प्रसाद शाळेच्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं आहे. 

राज्यात दुपारी 3 पर्यंत सरासरी 43.01 टक्के मतदानाची नोंद

राज्यातल्या आठ लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 43.01 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान हे वर्धा लोकसभेत झाले आहे. तर हिंगोलीत सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. 

दुपारी 3 वाजेपर्यंत वर्धा मतदार संघात सर्वाधिक मतदान

दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी 

वर्धा -          45.95 टक्के

अकोला -    42.69 टक्के

अमरावती - 43.76 टक्के

बुलढाणा -  41.66  टक्के

हिंगोली -    40.50 टक्के

नांदेड -      42.42 टक्के

परभणी -    44.49 टक्के

यवतमाळ - 42.55 टक्के

हिंगोलीत दुपारी 3 वाजेपर्यंत 40.5 टक्के मतदान

हिंगोली लोकसभा मतदारसंघात  दुपारी 3 वाजेपर्यंत 40.5 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

वर्धा लोकसभेत दुपारी 3 पर्यंत 45.95 टक्के मतदान

वर्धा लोकसभेत दुपारी 3 वाजेपर्यंत 45.95 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी 9 वाजता 6.63% ,

11 वाजता  18.35%, दुपारी 1 वाजता 32.32% टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी पत्नी आणि आईसह केले मतदान

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या कुटासा गावात त्यांनी मतदान केलं. मिटकरींसह त्यांच्या पत्नी कविता मिटकरी आणि  आईंनी देखील  मतदान केले, 

वाशिमच्या पांगरी महादेव ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गांवाला मागील 22 वर्षांपासून ग्रामपंचायतचा दर्जा नाही. या गांवाला ग्रामपंचायत चा दर्जा द्यावा यासाठी पांगरी महादेव ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावांत एकूण 487 मतदार आहेत. त्या पैकी एकानेही मतदान केले नाही. जो पर्यंत गावाला ग्रामपंचायतचा दर्जा मिळत नाही,  तोपर्यंत सर्व निवडणुकांवर आमचा बहिष्कार कायम राहणार असल्याचं  ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.77 टक्के मतदान झाले

8 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे - 

वर्धा - 32.32 टक्के

अकोला - 32.25 टक्के

अमरावती - 31.40 टक्के

बुलढाणा -  29.07 टक्के

हिंगोली -  30.46 टक्के

नांदेड -  32.93 टक्के

परभणी - 33.88 टक्के

यवतमाळ - वाशिम - 31.47 टक्के

वर्धा लोकसभेत दुपारी 1 वाजेपर्यंत 32.32 टक्के मतदानाची नोंद

वर्धा लोकसभेत दुपारी 1 वाजेपर्यंत 32.32 टक्के मतदानाची नोंद

अमरावती लोकसभेतील मेळघाटच्या 5 गावांचा मतदानावर बहिष्कार

अमरावती लोकसभेतील मेळघाट मधल्या 5 गावांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. रंगुबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, खोपमार या गावांचा यात समावेश आहे. ही गावं अजूनही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. 

अकोल्यात तृतीयपंथीयांनी केले मतदान

अकोला लोकसभा मतदारसंघात 18 लाख 75 हजार 637 मतदार आहेत. यात 50 मतदार हे तृतीयपंथी आहेत. अकोल्यात हे तृतीयपंथी एकत्रितपणे मतदानाला गेले. या सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. 

वाशिममध्ये ईव्हीएममध्ये बिघाड, मतदार आक्रमक

वाशिम शहरातील बाकलीवाल विद्यालयामधील मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडले. त्यामुळे 20 ते 25 मिनिटे मतदान प्रक्रिया बंद होती. त्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला. शिवाय मतदान केंद्र निरीक्षकाकडे तक्रार केली. शेवटी  बॅटरी बदलण्यात आल्यावर आता मशीन सुरू झाली आहे.

खासदार अनिल बोंडेंनी सपत्नीक केले मतदान

राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी वरुड येथील नगरपरिषद मराठी विद्या मंदिर क्र.१ येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

अभिनेता शिव ठाकरे यांने अमरावतीमध्ये बजावला मतदानाचा हक्क

मराठी बिग बॉस विजेता अभिनेता शिव ठाकरे यांने अमरावतीत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याच आवाहन शिव ठाकरे याने केले आहे. मतदान करण्यासाठी मी मुंबईवरून आलो आहे, त्यामुळे प्रत्येक तरुणांनी देखील मतदान केलं पाहिजे असं आवाहन शिव ठाकरे यांने केलं आहे.

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क

बुलढाणा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. इथं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. 

रिसोडमध्ये कडक उन्हात मतदानासाठी मतदान केंद्रा बाहेर मोठ्या रांगा

अकोला लोकसभा मतदारसंघातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथल्या मतदान केंद्रावर दुपारच्या कडक उन्हातही मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.  मतदानासाठी मतदारांनी मोठी गर्दी केल्याचे या ठिकाणी दिसत आहे. 

यवतमाळ वाशिममध्येही मतदान यंत्रात बिघाड

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे 21 बॅलेट युनिट, 26 व्हीव्हीपॅट, आणि 11 कंट्रोल युनिट बदलण्यात आले आहेत. सध्या या ठिकाणी मतदान सुरळीत सुरू आहे.

राज्यात सकाळी 11 पर्यंत सरासरी 18.83% मतदानाची नोंद

राज्यातील 8 लोकसभा मतदार संघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 18.83% मतदानाची नोंद झाली आहे.  त्यात सर्वाधिक मतदान हे परभणी लोकसभेत 21.77 टक्के झाले आहे. 

माजी आमदार अरुणभाऊ अडसड यांनी ॲम्बुलन्सने येऊन बजावला मतदानाचा हक्क

माजी आमदार अरुणभाऊ अडसड यांच्यावर एक महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी अमरावती येथून ॲम्बुलन्सने येऊन मतदानाचा हक्क बजावला. धामणगावात त्यांनी मतदान केले. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत.

11 वाजेपर्यंत परभणीत सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान 11 वाजेपर्यंत टक्केवारी 

वर्धा – 18.35

अकोला – 17.37

अमरावती – 17.73

बुलढाणा – 17.92

हिंगोली – 18.19

नांदेड – 20.85

परभणी – 21.77 

यवतमाळ-वाशिम – 18.01

शेतकरी नेते अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

बुलढाणा लोकसभेचे  शेतकरी नेते आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. या मतदार संघात तिरंगी लढत होत आहे.  

प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बूब यांनी केले मतदान

अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांनी आपल्या कुटुंबासह अमरावतीच्या नेहरू मैदानावरील शाळेमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतदारांनी मतदान करावं असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसेच या निवडणुकीमध्ये विजय होईल असा विश्वास ही व्यक्त केला.

वंचितच्या नांदेडमधील उमेदवाराचे ठिय्या आंदोलन

नांदेड लोकसभेतील वंचितचे उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत आहेत. 250 बुथवर मतदान केंद्र प्रतिनिधींना येऊ दिले जात नसल्याचा वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांचा आरोप आरोप आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. तर वंचितने मतदान केंद्र प्रतिनिधींची यादी उशिरा दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  सर्व मतदान केंद्रावर वंचितचे केंद्र प्रमुखांना आता प्रवेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

निवडणूक समाजाच्या हाती दिली आहे. त्यामुळे समाज काय तो निर्णय घेईल असे मत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यांनी लोकसभेसाठी मतदान केले. त्यानंतर ते बोलत होते.  

माजी मंत्री भाजपनेते अनंतराव देशमुखांनी केले मतदान

भाजपा नेते माजी मंत्री, माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी रिसोड इथं कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे.

अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणांनी केले मतदान

अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी अमरावतीकर त्यांच्या सूनेला आणि एका माजी सैनिकाच्या मुलीला लोकसभेत नक्की पाठवतील असा विश्वास व्यक्त केला. 

देवेगौडा, राहुल द्रविड, अनिल कुंबळेने केले मतदान

देशाताली 88 लोकसभा मतदार संघात मतदान सुरू आहे. महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, त्रिपूरा, जम्मू या राज्यात मतदान होत आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर, शशी थरूर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. शिवाय क्रिकेटपटू राहुल द्रविड, अनिल कुंबळे यांनी कर्नाटकात आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मतदान करा,मुड ऑफ द नेशन सेट - अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. त्यानंतर जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. आज मी राजकीय काहीही बोलणार नाही, पण मुड ऑफ द नेशन सेट आहे असे ते म्हणाले. दुपार नंतर उन्हाची तीव्रता वाढेल त्यामुळे त्यापूर्वी मतदान करा असे आवाहन त्यांनी केलंय.

काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला

काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आपल्या तळेगाव ठाकूर या मूळ गावी आपला मतदानाचा हक्क बजावला. अमरावतीची निवडणूक यशोमती ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

 

महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांनी मतदान करून आपला हक्क बजावला

हिंगोली लोकसभेची निवडणूक आज पार पडत आहे. त्या अनुषंगाने महायुतीचे हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळिकर यांनी आपला मतदानाचा हक्क हदगाव तालुक्यातील मौजे कोहळी इथे बजावला आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात 39 मतदान केंद्रावर मतदानादरम्यान अडथळा

हिंगोली लोकसभेत 39 बॅलेट मशीन तर 16 कंट्रोल युनिट बदलाव्या लागल्या. त्याच बरोबर 25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीनही बदलाव्या लागल्या आहेत. एकूण 39 हुन अधिक मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासांमध्ये मतदानाला अडथळा निर्माण झाला होता. आता मतदान सुरळीत सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.34 टक्के मतदान

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 6.34 टक्के मतदान झाले आहे. या मतदार संघात भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात लढत होत आहे. 

अकोला लोकसभेसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 7.17 % मतदानाची नोंद

अकोला लोकसभेसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 7.17 % मतदानाची नोंद झाली आहे. या मतदार संघात प्रकाश आंबेडकरांचा सामना भाजपच्या अनूप धोत्रें बरोबर होत आहे.  

बुलढाणा लोकसभा मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

बुलढाणा लोकसभा मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पुढील काही तासात हा आकडा वाढण्याची शक्यत आहे. 

परभणीत आता पर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद

परभणी लोकसभा मतदार संघात सकाळी 9 वाजे पर्यंत 9.77 % मतदानाची नोंद झाली आहे. राज्यातल्या 8 मतदार संघा पैकी परभणीमध्ये आता पर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. 

खासदार अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये बजावला मतदानाचा अधिकार

खासदार अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये मतदानाचा अधिकार बजावला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाणांचे हे पहिलेच मतदान आहे. नांदेडमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगतो आहे.  

हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा सरासरी 7 टक्के मतदान

सकाळी 9 वाजेपर्यंत हिंगोली लोकसभा मतदार संघात 7.23 टक्के, यवतमाळ वाशिम लोकसभेत 7.23 टक्के तर  बुलढाणा लोकसभेत 6.61 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी फक्त 7.45 % मतदान, तर त्रिपूरात सर्वाधिक 16.65 % मतदान

राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी फक्त 7.45 % मतदानाची नोंद झाली आहे. तर त्रिपूरात सर्वाधिक 16.65 % मतदाना झाले आहे. देशात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. 

सकाळी 9 वाजेपर्यंत वर्ध्यात 6.63% तर नांदेड लोकसभेसाठी 7.73% मतदान

सकाळी 9 वाजेपर्यंत वर्ध्यात 6.63% तर नांदेड लोकसभेसाठी 7.73%  मतदानाची नोंद झाली. पहिल्या दोन तासात मतदान धीम्या गतीने झाले आहे. पुढच्या काही तासात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.  

वर्ध्याचे मविआचे उमेदवार अमर काळेंनी केले मतदान

महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी आपल्या मतदानचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्या बरोबर त्यांचा संपुर्ण परिवार हजर होता. 

मनोज जरांगे-पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहुन रवाना

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील प्रकृती ठीक नसतानाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ॲम्बुलन्सने शहागडच्या दिशेने रवाना झाले आहेत.

प्रकाश आंबेडकरांनीही केलं मतदान

प्रकाश आंबेडकर यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे. ते अकोला लोकसभेतून वंचितचे उमेदवार आहेत. त्यांची लढत भाजपच्या अनूप धोत्रें बरोबर आहे. काँग्रेस उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत तिरंगी झाली आहे.  

बच्चू कडूंनी बजावला मतदानाचा अधिकार

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू यांनी बेलोरा येथील आपल्या मूळ गावी आपला मतदानाचा हक्क बजावला.

देगलूरचे बंद पडलेले मतदान यंत्र सुरू

 नांदेडच्या देगलूर तालुक्यातील निप्पानी सावरगाव येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल होती. त्यामुळे दीड  तास मतदान खोळंबले होते. आता मतदान यंत्रात सुधारणा करण्यात आली आहे. शिवाय मतदानही सुरू झाले आहे.  

आमदार राजेश टोपे यांनी बजावला आपल्या मुळ गावी मतदानाचा हक्क

माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी परभणी लोकसभा मतदार संघातील त्यांच्या मुळ गावी पाथरवाला बुद्रुक इथं मतदान केलं. या वेळी त्यांच्या पत्नी मनीषा टोपे यांनी ही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

अनुप धोत्रेंनीही केले मतदान

अकोल्याचे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. अकोला जिल्ह्यातील पळसो गावात सकाळी आठ वाजता त्यांनी आपलं मतदान केलं.

अमरावतीचे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडेंनी केले मतदान

अमरावती लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी दर्यापूर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

आधी लगीन लोकशाहीचे!

वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव येथील प्रफुल बाबाराव राऊत या युवकाचे आज लग्न आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे लग्न असताना वरात निघाली. पण आधी लगीन लोकशाहीचे म्हणत या नवरदेवाने मतदानाचे कर्तव्य बजावले आहे.

नांदेडच्या देगलूरात ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान प्रक्रिया खोळंबली

नांदेडच्या देगलूर तालुक्यातील निप्पानी सावरगाव येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडलीय. मागील दीड  तासापासून  मशीन बंद पडली आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया खोळंबली आहे. 

महायुतीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांनी पत्नीसह केले मतदान

महायुतीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांनी सपत्नीक मतदान केले. देवळी इथल्या मतदान केंद्रावर ते मतदानासाठी गेले होते. यावेळी विजयाची हॅट्रीक करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाला होता.  

हिंगोली लोकसभेत माहूर येथे मतदान यंत्रात बिघाड

हिंगोली लोकसभा अंतर्गत येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात मतदान यंत्रात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे काही काळ मतदान थांबले होते. माहूर तालुक्यातील टाकळी येथील ही घटना आहे. केंद्र प्रमुखांनी वरिष्ठांना ही माहिती दिल्यावर तत्काळ तज्ज्ञांनी तेथे पोहोचून मतदान प्रक्रिया सुरू केली.

वर्ध्याच्या देवळी मतदान केंद्रावर सावळा गोंधळ

वर्धा लोकसभेच्या देवळी मतदान केंद्रावर सावळा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी काही काळ मतदान यंत्र बंद होते. त्यामुळे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी मतदानासाठी वाट पाहावी लागली. 

वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी बजावला मतदानाचा हक्क

वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले. लॉयन्स विद्या निकेतन या मतदान केंद्रावर वन विभागाडून मतदानानंतर  वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी विविध उपाय योजना केल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

अमरावतीत मतदान यंत्र 1 तास बंद, मतदार घरी परतले

अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर कवरराम हायस्कूल, वडरपुरा आणि रुख्मिनी नगर येथील मनपा हायस्कूल मधील ईव्हीएम बंद पडले होते.  मशीन जवळपास 1 तास बंद होते. त्यामुळे काही मतदार मतदानासाठी वाट पाहात थांबले होते. तर काही नागरीक मतदान न करताच परत गेले. 

नांदेडचे काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाणांनी बजावला मतदानाचा हक्क

नांदेड लोकसभेचे काँग्रेचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी नायगाव तालुक्यात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

नांदेडमध्ये मतदान केंद्रा बाहेर रांगा

नांदेड लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सरासरी 65% मतदान झाले होते. यावेळी प्रशासनाने 75% पेक्षा जास्त मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

वाशिमच्या नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी केलं मतदान

वाशिम जिल्ह्यातील कानडी येथील सचिन भोयर यांनी आधी मतदान मग लग्न म्हणत मतदानाचा हक्क बजावला.  बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

वर्ध्यातही मतदानाला सुरूवात

वर्ध्यात आज लोकसभेचे मतदान होत असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

अकोल्याचे काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

अकोला लोकसभेचे काँग्रेस उमेदवार डॉ अभय पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. अकोला लोकसभेत काँग्रेस भाजप आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत होत आहे. 

अमरावतीत 2 मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड

अमरावतीत दोन मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबले, मतदान यंत्र बदलण्याची प्रक्रीया सुरू. अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर कवरराम स्कूल मधील ईव्हीएम बंद, यासह ग्रामीण भागातील एक ईव्हीएम मशीन बंद.

वाशिम यवतमाळमध्येही मतदानाला सुरूवात

वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सकाळी 7 वाजता पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 1 हजार 76 मतदान केंद्रावर 9 लाख 79 हजार 237 मतदार असून आपल्या मतदानाचा हक्क बाजावणार आहेत.

माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी मतदानाचा अधिकार बजावला

माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी नांदेडमध्ये मतदानाचा अधिकार बजावला. सावंत हे अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. नांदेडमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. 

बुलढाण्यात मतदानाला सुरूवात, कडक पोलिस बंदोबस्त

बुलढाणा लोकसभेसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 82 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी 1162 मतदान केंद्र बनवण्यात आले आहेत. तसेच या मतदानाकरिता 11 हजार 592 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले असून पाच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्त करता तैनात करण्यात आले आहे.

उद्योगपतींचं सरकार हवं की जनतेचं?-राहुल गांधी

काही उद्योगपतींचं सरकार हवं की 140 कोटी जनतेचं, राहुल गांधीचा ट्विटमधून सवाल, घरातून बाहेर पडत मतदान करण्याचं केलं आवाहन. 

 

           मेरे प्यारे देशवासियों!

विक्रमी संख्येनं मतदान करा- नरेंद्र मोदी

विक्रमी संख्येनं मतदान करा, पंतप्रधान मोदींचं मराठीत आवाहन, युवा, महिलांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याची दिली साद

अमरावतीत मतदानाला सुरूवात

अमरावती लोकसभा मतदार संघासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे मैदानात आहेत. तर प्रहारनेही आपला उमेदवार रंगणात उतरवला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com