Party Position Lok Sabha 2026: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातून बंड करुन बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात विलिनीकरणास लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. लोकसभा सचिवालयानं याबाबतचं अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे.
6 खासदारांच्या पक्षांतरामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (यूबीटी) पक्षाची लोकसभेतील ताकद आता केवळ 3 खासदारांवर आली आहे. अरविंद सावंत हे या ३ खासदारांचे नेतृत्व करत आहेत. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद आता 13 खासदारांवर पोहोचली असून लोकसभेत डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे त्यांचे नेते आहेत.
लोकसभेतील सुधारित पक्षीय बलाबल
लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 18 व्या लोकसभेतील सर्व पक्षांची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे:
भारतीय जनता पक्ष : 239
इंडियन नॅशनल काँग्रेस : 98
समाजवादी पक्ष : 37
ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस : 28*
द्रविड मुन्नेत्र कळघम : 22
तेलगू देसम : 16
शिवसेना : 13
जनता दल (युनायटेड) : 12
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार : 8
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) : 5
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) : 4
राष्ट्रीय जनता दल : 4
युवजन श्रमिका रयथू काँग्रेस पक्ष : 4
आम आदमी पक्ष : 3
इंडियन युनियन मुस्लिम लीग : 3
झारखंड मुक्ती मोर्चा : 3
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : 3
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया : 2
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिंनवादी) (लिबरेशन) : 2
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स : 2
जनसेना पक्ष : 2
जनता दल (सेक्युलर) : 2
राष्ट्रीय लोक दल : 2
विदुथलाई चिरुथाईगल कात्ची : 2
आझाद समाज पक्ष (कांशीराम) : 1
आजसू पक्ष : 1
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन : 1
आपला दल (सोनेलाल) : 1
आसाम गण परिषद : 1
भारत आदिवासी पक्ष : 1
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) : 1
केरल काँग्रेस : 1
मरुमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम : 1
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : 1
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष : 1
रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पक्ष : 1
शिरोमणी अकाली दल : 1
सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा : 1
युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल : 1
झोराम पीपल्स मूव्हमेंट : 1
अपक्ष : 7
सध्या लोकसभेत 7 अपक्ष खासदार आहेत. यामध्ये विशाल (दादा) प्रकाशबापू पाटील, राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव, अमृतपाल सिंह, सरबजीत सिंह खालसा, उमेशभाई बाबूभाई पटेल, अब्दुल रशीद शेख आणि मोहम्मद हनीफा यांचा समावेश आहे.
( नक्की वाचा : Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या एका संकेताने बदलणार देशाचे राजकारण? मोदी सरकारसमोर ठेवली 'ही' अट )
याव्यतिरिक्त लोकसभेत 3 जागा सध्या रिक्त आहेत. पश्चिम बंगालमधील बसिरहाट, मेघालयातील शिलाँग आणि आसाममधील नगाव या जागा खासदारांचे निधन आणि राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या आहेत.
स्पष्टीकरण * : तृणमूल काँग्रेसच्या 28 पैकी 20 खासदार यांची बैठक व्यवस्था स्वतंत्र असेल. हे सर्व खासदार ममता बॅनर्जी यांच्या पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या 8 खासदार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world