लोकसभा अध्यक्षांचं पहिलंच भाषण विरोधकांना झोंबलं, बिर्ला असं काय म्हणाले?

Lok Sabha Speaker Om Birla Speech : लोकसभा अध्यपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ओम बिर्ला यांनी केलेलं भाषण विरोधकांना चांगलंच झोंबलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
L
नवी दिल्ली:

Om Birla Speech on Emergency : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवार ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांची निवड झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून के. सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली होती. बिर्ला यांची आवाजी मतदानानंतर निवड झाली. या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं. बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष बनले आहेत. या अध्यपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर बिर्ला यांनी केलेलं भाषण विरोधकांना चांगलंच झोंबलं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले बिर्ला?

लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी त्यांच्या भाषणात आणीबाणीच्या कालखंडावर जोरदार टीका केली. त्यावर विरोधी पक्षांनी गोंधळ सुरु केला. त्यांनी आणीबाणी हा देशातील काळा कालखंड असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, 'काँग्रेस सरकारनं आणीबाणीच्या काळत राजघटना पायदळी तुडवणारे अनेक कामं केले. पण, आम्ही राज्यघटनचे संरक्षण करण्याच्या मुल्यांचं पालन केलं.' ओम बिर्ला यांनी यावेळी काँग्रेसचं वर्णन हुकुमशाही सरकार असं केलं. त्यांनी इंदिरा गांधींचाही उल्लेख केला. त्याचबरोबर नसबंदीच्या मुद्यावरही विरोधकांना लक्ष्य केलं. 

लोकशाही मुल्यांवर हल्ला

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं की, 'हे सभागृह देशात 1975 साली लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा (Emergency) कठोर शब्दात निषेध करत आहे. त्याचबरोबर आणीबाणीला कडाडून विरोध करणाऱ्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो. सर्व शक्ती एकाच व्यक्तीकडं यावी हाच काँग्रेसकडून करण्यात आलेल्या घटनादुरुस्तींचा हेतू होता. त्यांनी नागरिकांच्या अधिकारांची गळचेपी केली. तसंच लोकशाही मुल्यांवर हल्ला केला.'

( नक्की वाचा : आणीबाणी जाहीर झाली त्यावेळी सोनिया गांधी पंतप्रधानांच्या घरात होत्या! भाजपा नेत्याचा दावा )

नसबंदीचा उल्लेख

काँग्रेसवर टीका करताना बिर्ला यांनी सांगितलं, 'आणीबाणीच्या कालखंडात काँग्रेस सरकारकडून लोकांवर जबरदस्तीनं नसबंदी थोपवण्यात आली. शहरांमधील अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली सरकारच्या मनमानी आणि डावपेचांचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. हे सभागृह त्या सर्वांप्रती शोक व्यक्त करत आहे.  1975 ते 1977 हा कालखंड आपल्याला राज्यघटनेची तत्वे, संघराज्य संरचना आणि न्यायिक स्वातंत्र्याच्या महत्त्वाची आठवण करुन देतो. या सर्वांवर त्या काळात कसा हल्ला झाला आणि त्याचे संरक्षण का आवश्यक आहे, याची आठवण हा काळ करुन देतो, असं बिर्ला यांनी सांगितलं.
 

Advertisement