3 वेळा फोन...खर्गेंचा अपमान केल्याचा राहुल गांधींचा आरोप! राजनाथ यांनी दिलं उत्तर

Lok Sabha Speaker Post : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा अपमान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. 

Advertisement
Read Time: 2 mins
Rajnath Singh Mallikarjun Kharge
नवी दिल्ली:

Lok Sabha Speaker Post :  लोकसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षांची निवड मतदानातून होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्तारुढ एनडीएकडून ओम बिर्ला आणि विरोधकांकडून काँग्रेस खासदार के. सुरेश मैदानात आहेत. अध्यक्षांची निवड एकमतानं व्हावी, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठिंब्याच्या बदल्यात लोकसभेचं उपाध्यक्षपद मागितल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण, सत्तारुढ आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलं नाही. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा अपमान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाठिंबा मागण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांना फोन केला होता, असं राहुल यांनी सांगितलं. राजनाथ सिंह यांनी आपण रिटर्न कॉल करु असं खर्गेंना सांगितलं होतं. पण त्यांना रिटर्न कॉल आलाच नाही, असा दावा राहुल यांनी केला होता.

राहुल यांच्या या आरोपावर राजनाथ सिंग यांनी उत्तर दिलं आहे. 'मल्लिकार्जुन खर्गे हे एक वरिष्ठ नेते आहेत. मला त्यांचा आदर आहे. काल संध्याकाळपासून आजपर्यंत माझी त्यांच्यासोबत तीन वेळा चर्चा झालीय,'असं त्य़ांनी स्पष्ट केलं. अध्यक्षपदासाठी एकमत व्हावं सरकारकडून राजनाथ सिंह यांच्यासह संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षांशी चर्चा केली. 

( नक्की वाचा : अमित शाहांनी राजनाथ सिंह यांच्यानंतर शपथ का घेतली? काय आहेत लोकसभेचे नियम? )
 

अध्यक्षपदासाठी एकमत का नाही?

विरोधी पक्षाकडून काँग्रेस नेते केसी वेणूगोपाल आणि डीएमके नेते टीआर बालू यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. विरोधी पक्षांनी उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे. त्यावर अध्यक्षपदाची निवडणूक एकमतानं होऊ दे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विषय येईल त्यावेळी सरकार याबाबत विरोधकांशी चर्चा करेल. सरकारचा हा प्रस्ताव विरोधकांनी फेटाळला. 
 

Advertisement