लग्न हा जिवनातला एक महत्वाचा क्षण समजला जातो. ते चांगल्या पद्धतीने व्हावे. आपला जोडीदार चांगला मिळावा हीच सर्वांची अपेक्षा असते. ज्या वेळी हे स्वप्न पूर्ण होतं तो क्षण त्या जोडप्यासाठी महत्वाचा आणि आनंदाचा असतो. पण सर्व काही ठिक होत असताना एखादी गोष्टी काही तरी घडते आणि या सर्व गोष्टींवर पाणी फिरले जाते. कोणाच्याही नशिबी असं होवू नये. पण अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील किशनगढ येथे ही घटना घडली आहे. मिल कॉलनी येथील रहिवासी राकेश शर्मा यांचे लग्न ठरले होते. पण त्यांच्या सोबत जे काही झाले ते पाहून सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे.
राकेश शर्मा यांचं मोठ्या प्रयत्नांनी लग्न ठरलं होतं. ते किशनगढचे रहिवाशी आहेत. राकेश यांनी मोठ्या आशा-अपेक्षांनी आग्रा येथील पूजा गुर्जर हिच्याशी विवाह केला. आधी दोघांनी एकमेकाला पाहीले. पसंती दिली. त्यानंतरच हे लग्न करण्याचं ठरलं. लग्न कसं करायचं हेही यावेळी ठरलं. त्यानुसार जयपूरमध्ये त्यांची स्टॅम्प मॅरेज करण्यात आलं. या दोघांचे लग्न जितेंद्र नायक या व्यक्तीने जुळवलं होतं. लग्न जुळवण्यासाठी त्याने 2 लाख रुपये घेतले होते. मुलगी चांगली असल्याने राकेश शर्मा यांनीही त्यांना पैसे दिले होते. पण पुढे काय होणार आहे याची पुसटती कल्पनाही राकेश यांना नव्हती. लग्न झाल्यामुळे ते आनंदी होते. त्यांचे कुटुंबीय ही खुशीत होते.
नक्की वाचा - Dombivali News: ती रडत होती मात्र सांगू शकत नव्हती, जेव्हा खरं कारण समजलं तेव्हा...
लग्न झाल्यानंतर पूजाचे सासरच्या मंडळींनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. कुटुंबाने गृहप्रवेशापासून ते पूजा-अर्चेपर्यंत सर्व विधी आनंदाने पार पाडले. नवीन सून घरात सुख-समृद्धी घेऊन येईल, असे सर्वांना वाटत होते. पण या उत्साहामागे फसवणुकीचे मोठे षडयंत्र लपलेले होते. हे राकेशच्या कुटुंबीयांना समजलेच नाही. लग्न झाले. नवी सुन पूजा घरात आली होती. चांगल्या सुनेसारखी ती वागत होती. सर्व जण तिच्या वागण्यावर खूश होते. लग्नाच्या दिवशी रात्री दोघांची सुहागरात्र होती. त्यामुळे त्या दोघांना कुटुंबीयांनी एकत्र सोडलं. त्यानंतर जे पुढे घडलं त्याची कल्पनाही कुणी केली नसेल.
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पूजाने एक विचित्र अट राकेश यांना सांगितली. ती म्हणाली त्यांच्याकडे तीन दिवस पती-पत्नीने एकत्र न झोपण्याची परंपरा आहे. ही गोष्टा राकेश प्रमाणे त्याच्या कुटुंबीयांना खटकली. आज काही करता येणार नाही. ही आमची परंपरा आहे असं तिने ठाम पणे सांगितलं. ही परंपरा आहे असं मानून राकेशने तिच्याकडे दुर्लक्ष केले. प्रत्यक्षात ही फसवणुकीची सुरुवात होती. त्यानंतर रात्री संधी मिळताच पूजाने घरातील किमती दागिने आणि रोकड गोळा केली. त्यानंतर ती शांतपणे घरातून पळून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील लोकांना ना नवी नवरी दिसली, ना घरातले दागिने ना पैसे दिसले.
आपली फसवणूक झाल्याचे राकेश याला सकाळी उठल्यानंतर समजले. या घटनेनं तो हादरून गेला होता. सुखी संसाराची स्वप्न पाहाणाऱ्या राकेशच्या डोळ्या समोर अंधार आला होता. सर्व स्वप्न एका रात्रीत तुटली होती. स्वत: ला सावरत राकेश यांनी मदनगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ठाणेप्रभारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, हे संघटित फसवणुकीचे प्रकरण आहे. पोलिसांनी पूजा आणि दलाल जितेंद्र यांचा शोध सुरू केला आहे. कायदेशीर तज्ज्ञांच्या मते, हे फसवणूक आणि विश्वासघाताचे गंभीर कृत्य असून दोषींना कठोर शिक्षा होऊ शकते.