जाहिरात

Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्टबाबत DGCA चा मोठा निर्णय, 'या' निर्णयाचा काय आहे फायदा?

या विमानतळावरून एअर इंडिया पाठोपाठ इंडिगो आणि आकासा यांनी ही आपली विमान सेवा सुरू करण्याचा मानस जाहीर केलेला आहे.

Navi Mumbai  Airport: नवी मुंबई एअरपोर्टबाबत DGCA चा मोठा निर्णय, 'या' निर्णयाचा काय आहे फायदा?
नवी मुंबई:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने ऑक्टोबर 2025 मध्ये एरोड्रोम परवाना दिला आहे. त्यामुळे या विमानतळाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या हवाई वाहतुकीची मागणी पूर्ण करण्यासाठी हे विमानतळ आता सज्ज झाले आहे. एअर इंडियासारख्या कंपन्या येथून उड्डाणे सुरू करणार आहेत. त्याबाबतची सुचीही त्यांनी जारी केली आहे.  

आता नवी मुंबई विमानतळ(NMIA) पूर्णपणे कार्यान्वित होण्याच्या मार्गवार आहे. त्यातील एक महत्वाचा टप्पा या विमानतळाने पार केला आहे. लवकरच या विमानतळाचे उद्‌घाटन होणार आहे. या पाश्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या विमानतळाला एअरोड्रोम परवाना दिला आहे. त्यामुळे या विमानतळावरून हवाई वाहतूक सुरू होण्याचा मार्ग ही आपोआप मोकळा झाला आहे. हा एअरोड्रोम परवाना कोणत्याही विमानतळासाठी महत्वाचा मानला जातो. त्यामुळे ते ही काम आता झाले आहे.    

नक्की वाचा - Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअर पोर्टवरून कुठे कुठे विमानं जाणार? एअर इंडियाने जारी केली पहिली लिस्ट

DGCA महासंचालक फैज अहमद किडवाई यांनी हा एअरोड्रोम परवाना दिला आहे. विमानतळाने  सर्व सुरक्षा आणि नियामक मानकांची पूर्तता केली आहे. त्यानंतरच विमानतळाला हवाई उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. NMIAL ने आपल्या निवेदनात सांगितले आहे की कडक सुरक्षा आणि नियामक निकष पूर्ण केल्यानंतर हा परवाना दिला आहे. हा परवाना असल्या शिवाय हवाई उड्डाण करता येत नाही. त्यामुळे तो महत्वाचा टप्पा विमानतळाने पुर्ण केला आहे. 

नक्की वाचा - Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचे नाव जवळपास निश्चित, 'या' नावावर निर्णय शेवटच्या टप्प्यात

या विमानतळावरून एअर इंडिया पाठोपाठ इंडिगो आणि आकासा यांनी ही आपली विमान सेवा सुरू करण्याचा मानस जाहीर केलेला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसची नवीमुंबई विमानतळावरून  दररोज 20 दैनिक उड्डाणे होतील. त्यातून 15 भारतीय शहरे जोडली जाणार आहेत. एअर इंडिया समूह 2026 च्या मध्यापर्यंत दररोज 55 उड्डाणे (110 एटीएम) वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात दररोज 5 आंतरराष्ट्रीय उड्डाणे असतील. अदानी समूह आणि सिडको पाच टप्प्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करत आहेत. पहिल्या टप्प्यात दरवर्षी 20 दशलक्ष प्रवाशांना (MPPA) सामावून घेण्याची आणि 0.5 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता असेल. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com