PNG Supply: भारत हा जगातील लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LNG) चा चौथा सर्वात मोठा आयातदार देश आहे आणि देशात LNGची मागणी वेगाने वाढत आहे. अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) जवळपास ठप्प होण्याच्या स्थितीत आहे. जगातील सुमारे 20 टक्के LNG व्यापार याच मार्गाने होतो. यामुळेच भारताचा गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. भारत स्वतः देखील एलपीजीचे (LPG) उत्पादन करतो, पण घरगुती गरजेचा मोठा हिस्सा आयात करावा लागतो. वर्ष 2024‑25मध्ये भारताचा एलपीजी वापर सुमारे 3.13 कोटी टन होता, तर देशांतर्गत उत्पादन केवळ 1.28 कोटी टनांच्या आसपास होते.
याचा अर्थ असा की, उरलेली आवश्यकता आखाती देशांतून आयात करून पूर्ण केली जाते आणि तिथे होणारे संघर्ष किंवा सागरी मार्गांमधील अडथळ्यांमुळे पुरवठा विस्कळीत होतो. भारतात नैसर्गिक वायूचे उत्पादन देशातील विविध भागांत आणि सागरी क्षेत्रांतील 'सेडिमेंटरी बेसिन'मधून (Sedimentary Basins) केले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की PNG गॅस नक्की येतो कुठून आणि तो कधी संपू शकतो का? चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.
भारतात सध्या जाणवत असलेल्या एलपीजी (LPG) संकटामध्ये पाइपलाइनद्वारे मिळणारा पीएनजी (PNG - Piped Natural Gas) हा एक सुरक्षित आणि शाश्वत पर्याय म्हणून समोर आला आहे. सरकारी आदेशांनुसार, ज्या भागात पीएनजी उपलब्ध आहे, तेथे तीन महिन्यांच्या आत एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद केला जाऊ शकतो. सरकार नागरिकांना पीएनजी गॅस वापरण्यावर भर देण्याचे आवाहन करत आहे.
(नक्की वाचा: April 1 Rules Change: तुमच्या एका चुकीमुळे लागू शकतो मोठा दंड; 1 एप्रिलपूर्वी जाणून घ्या 5 नवीन नियम)
PNG गॅस कुठून येतो?
पीएनजी हा प्रामुख्याने 'मिथेन' (CH4) वायू आहे. हा मुख्यतः नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) विहिरींमधून मिळवला जातो. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 50 टक्के नैसर्गिक वायूची निर्मिती घरगुती स्रोतांतून करतो. उर्वरित आवश्यकतेसाठी अमेरिका, रशिया आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांतून 'लिक्विफाईड नॅचरल गॅस' (LNG) स्वरूपात तो आयात केला जातो. गेल (GAIL) आणि इतर स्थानिक गॅस वितरण कंपन्यांमार्फत पाइपलाइनच्या जाळ्याद्वारे हा वायू थेट तुमच्या स्वयंपाकघरात 24 तास पुरवला जातो.
(नक्की वाचा: Bank Holiday: बँक सलग 6 दिवस बंद? महाराष्ट्रासह अन्य राज्यांत बँका कधी असणार बंद? 30 मार्च ते 5 एप्रिलपर्यंतची ही यादी वाचा)
PNG देखील संपू शकतो का?
सैद्धांतिकदृष्ट्या PNG (Piped Natural Gas) देखील संपू शकतो, पण हा गॅस संपुष्टात येण्याचे कारण एलपीजीपेक्षा वेगळे आहे. पीएनजी हा एक नैसर्गिक स्रोत आहे, जो जमिनीच्या खालून येतो आणि तो मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. नैसर्गिक साठे संपल्यास याचा पुरवठा थांबू शकतो.
Photo Credit: NDTV Marathi
LPG च्या तुलनेत PNG चे फायदे:एलपीजीच्या तुलनेत पीएनजीचे अनेक फायदे आहेत
- पीएनजीचा 24x7पुरवठा सुरू असतो, त्यामुळे सिलिंडर संपण्याची चिंता राहत नाही.
- पीएनजी हवेपेक्षा हलका असतो, त्यामुळे गळती झाल्यास तो वर हवेत उडून जातो, ज्यामुळे आगीचा धोका कमी होतो.
- मीटरनुसार बिल येते, म्हणजेच तुम्ही जितका गॅस वापरला तितकेच पैसे भरावे लागतात.
- पीएनजीचा पर्याय हा एलपीजीच्या तुलनेत स्वस्त पडू शकतो.