LPG Shortage: गॅस सिलिंडर संपला तर टेंशन घेऊ नका! स्वस्तात खरेदी करा हे 'स्मार्ट कुकर', पाहा जबरदस्त ऑफर्स

या सर्व कुकर्सवर बँक ऑफर्समुळे मोठी बचत होत असून ग्राहकांना गॅस सिलिंडरवरचे अवलंबित्व कमी करण्याची ही चांगली संधी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

मध्यपूर्वेतील इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता देशांतर्गत एलपीजी पुरवठ्यावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने गॅस बुकिंगच्या नियमांत बदल केला आहे. आता दोन सिलिंडरमधील अंतर किमान 25 दिवस असणे अनिवार्य केले आहे. यामुळे ज्या कुटुंबात गॅसचा वापर जास्त आहे, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र त्यांनी जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यासाठी एक भन्नाट पर्याय ही उपलब्ध झाला आहे. 

सरकारने जरी गॅस पुरवठा सुरळीत असल्याचे म्हटले असले, तरी जागतिक परिस्थिती पाहता ग्राहकांनी सावध राहणे गरजेचे आहे. अशा वेळी विजेवर चालणारे 'स्मार्ट कुकर' एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहेत. हे कुकर केवळ सुरक्षित नाहीत, तर गॅस संपण्याच्या कटकटीतूनही सुटका करतात. अमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवर सध्या नामांकित ब्रँड्सच्या स्मार्ट कुकरवर आकर्षक सूट मिळत आहे. त्यामुळे ते तुमच्या खिशाला ही परवडणारे आहे. सध्या या काळात त्याची मागणी ही वाढत असल्याचं दिसून येत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Oil shortage: भारत किती देशाकडून तेल आयात करतो? सर्वाधिक वाटा कोणत्या देशाचा? पाहा संपूर्ण यादी

Prestige, Nutricook आणि Usha सारख्या ब्रँड्सच्या 6 लिटर क्षमतेच्या इलेक्ट्रिक प्रेशर कुकरवर HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे 10% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. यामुळे हे कुकर सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत. Nutricook आणि Wonderchef सारख्या प्रीमियम ब्रँड्सचे कुकर आता ₹6,000 ते ₹8,000 च्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. जर तुमच्याकडे HDFC बँकेचे कार्ड असेल, तर तुम्हाला अतिरिक्त ₹750 पर्यंत सूट मिळू शकते. त्यामुळे सिलिंडरची वाट पाहण्यापेक्षा हा स्मार्ट पर्याय निवडणे कधीही फायदेशीर ठरेल.

नक्की वाचा - Air India विमानाच्या चाकाचे झाले तुकडे तुकडे, लँडिंग वेळी काळजाचा ठोका चुकला, पाहा थरारक Video

प्रमुख मॉडेल्स आणि किमती

  • Prestige 6.0L: प्रभावी किंमत ₹7,650
  • Nutricook Smart Pot 2: प्रभावी किंमत ₹6,749
  • Usha iChef: प्रभावी किंमत ₹6,449
  • Wipro Elato: प्रभावी किंमत ₹7,249
  • Wonderchef Nutri-Pot: प्रभावी किंमत ₹7,549

या सर्व कुकर्सवर बँक ऑफर्समुळे मोठी बचत होत असून ग्राहकांना गॅस सिलिंडरवरचे अवलंबित्व कमी करण्याची ही चांगली संधी आहे.