- इराण-इस्रायल युद्धामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर थेट परिणाम होऊन भारतात तुटवडा निर्माण झाला आहे
- भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश रशिया असून त्याचा हिस्सा गेल्या वर्षात कमी झाला आहे
- सौदी अरेबिया आणि इराक हे युद्धग्रस्त आखाती देश असून भारताला त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर तेल मिळत आहे
इराण, अमेरिका इस्त्रायल युद्धाचा फटका जगाला बसत आहे. या युद्धामुळे तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर थेट परिणाम झाला आहे. याचा थेट फटका भारताला ही बसला आहे. त्यामुळे युद्धाच्या एका आठवड्यातच भारतात तेल आणि गॅसचा तुटवडा जाणवत आहे. भारत तेलावर पुर्ण पणे काही देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे भारत सर्वात जास्त तेल कोणत्या देशाकडून आयात करतो? पहिले तीन देश कोणते आहेत. त्यांच्या सोबत किती डॉलरचा आपण व्यवहार करतो हेच आपण पाहाणार आहोत. यातून या युद्धाच्या झळा आपल्याला कशा बसणार आहेत हे ही यातुन स्पष्ट होणार आहे.
भारताच्या कच्च्या तेल आयातीची नवी आकडेवारी समोर आली आहे. रशिया अद्याप भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश राहिला आहे. रशियाकडून भारताने $1,981.40 दशलक्ष किमतीचे तेल आयात केले आहे. मात्र, गेल्या एका वर्षात रशियाच्या हिश्श्यात मोठी घट झाली आहे. वर्षभरापूर्वी रशियाचा वाटा 36% होता, तो आता 20% पेक्षा कमी होऊन 19.3% वर आला आहे. मात्र रशियानंतर भारत सर्वाधिक तेल हे युद्ध सुरू असलेल्या आखाती देशांकडूनच घेत आहे. त्यात युद्धात असलेल्या इराणचा ही समावेळ आहे. सर्वाधिक तेल हे आखाती देशातूनच भारताला मिळते.
रशियानंतर सौदी अरेबिया भारताचा दुसरा मोठा तेलाचा स्रोत ठरला आहे. सौदीकडून भारताने 17.5% म्हणजेच $1,795.56 दशलक्ष किमतीचे तेल खरेदी केले आहे. त्यानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो आहे इराकचा. इराक कडून आपण तब्बल 16.6% $1,701.75 दशलक्ष किमतीचे तेल आयात करतो. इराण तेल पुरवठा करणारा तिसऱ्या क्रमांचाचा देश आहे. तर संयुक्त अरब अमिराती (UAE) कडून आपण 10.4% तेल आयात करण्यात आले आहे. म्हणजेच जवळपास 44 टक्के तेल आपण हे आखाती देशांकडून आयात करत आहोत. युद्धामुळे या तेल आयातीवर परिणाम झाला आहे. त्याचा थेट फटका भारताला बसला आहे.
भारत जवळपास अर्धे तेल हे आखाती देशांकडून खरेदी करते. यानंतर अमेरिका (6.8%), कुवेत (6.1%), अंगोला (5.7%) आणि ब्राझील (4.9%) यांसारख्या देशांकडूनही तेलाची आयात केली जाते. कतार आणि नायजेरिया यांचा वाटा अनुक्रमे 3.6% आणि 3.3% इतका आहे. भारताची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी कोणत्या देशांकडून किती तेल येते, याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कधीकाळी भारताला 36% तेल पुरवणारा रशिया आता 19.3% वर आला असला, तरी अजूनही तोच भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार ठरला आहे. भारताने रशियाकडून तब्बल $1,981.40 दशलक्षचे तेल विकत घेतले आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यात मागील 10 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळे 'होर्मुझची सामुद्रधुनी' हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद कऱण्यात आला आहे. त्याचा फटका भारताला बसला आहे. कारण, भारत याच मार्गावरून जवळपास 55% तेल आयात करतो. पण हा मार्ग बंद झाल्यामुळे सौदी अरेबिया, इराक आणि युएई कडून येणाऱ्या तेलाचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे भारतावर मोठं संकट उभारले आहे. त्यामुळे आता भारताला रशियाकडून येणाऱ्या तेलावर अवलंबून राहावं लागणार आहे. ते तेल कधी मिळणार हा खरा प्रश्न आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world