LPG price hike: महागाईचा भडका! सिलिंडर 29 रुपयांनी महागला, महाराष्ट्रातला दर किती?

दरम्यान महागाई वाढत असली तरी सरकारचा दावा भलताच आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

LPG Price Hike News: सर्व सामान्यांच्या खिशाला आज पुन्हा एकदा झटका बसला आहे. महागाईने कहर केला असून त्याचा भडका आज पुन्हा एकदा उडाला आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर जवळपास 29 रूपयांनी महाग झाला आहे. त्याच थेट बोजा सर्व सामान्यांच्या खांद्यावर पडणार आहे.नवे दर आजपासूनच लागू होणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात सिलिंडरच्या दरात 89 रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ अशीच होत राहीली तर सर्व सामान्यांनी करायचे काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

14.2 किलोचा स्वयंपाकाचा सिलिंडर गॅसचे नवे दर आजपासून लागू होत आहेत. मुंबई महाराष्ट्रात हाच गॅस सिलिंडर आधी 912.50  रूपयांना भेटत होता. तो आता 941.50 रूपयांना भेटणार आहे. तर हाच गॅस सिलींडर दिल्लीत 945.50 रुपयांना मिळणार आहे. दिल्लीत तो आधी 916 रुपये 50 पैशांना मिळत होता.  याआधी 7 मार्च रोजी तेल कंपन्यानी सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ केली होती. 

Advertisement

नक्की वाचा - Trending News: पेट्रोल, डिझेल, गॅस संकटानंतर देशावर आता नवं संकट! यातून मार्ग कसा काढणार?

याचा अर्थ गेल्या तीन महिन्यांमध्ये सिलिंडरच्या दरात 89 रुपयांची वाढ झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या संकटानंतर पेट्रोलियम उत्पादने सातत्याने महाग होत आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेल प्रमाणे गॅसच्या किंमती ही भरमसाट वाढत आहेत. अजूनही अमेरिका इराण युद्धाचा शेवट झालेला नाही. शिवाय पर्यायी व्यवस्थाही झालेली नाही. सरकारकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. पण प्रत्यक्षात सर्व सामान्यांच्या खिशाला चाट लागत आहे ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. 

नक्की वाचा - Akola News: पाठीवर नवरा, हातात लहान मुल, पोटाला बॅग! पतीला वाचवण्यासाठी पत्नीची धडपड, पण पुढे जे घडलं ते...

दरम्यान महागाई वाढत असली तरी सरकारचा दावा भलताच आहे. सरकारने इतर देशांच्या तुलनेत भारतात गॅस सिलिंडर स्वस्त मिळत असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानमध्ये सिलिंडर 1046 रूपयांना मिळत असल्याचं सरकारने सांगितलं आहे. तर नेपाळमध्ये 1207 रुपयांना मिळत आहे. बांगलादेशमध्ये 1225 रूपयांना सिलिंडर मिळत आहे. श्रीलंकेत 1241 रूपयांना हा सिलिंडर मिळत आहे. अमेरिकेत 1755 रूपयांना एक सिलिंडर मिळत आहे. म्हणजेच जगातील इतर देशाच्या तुलनेत भारतात तो स्वस्त मिळत असल्याचा सरकारचा युक्तीवाद आहे. मात्र महागाई वाढली आहे ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही.