जाहिरात

Akola News: पाठीवर नवरा, हातात लहान मुल, पोटाला बॅग! पतीला वाचवण्यासाठी पत्नीची धडपड, पण पुढे जे घडलं ते...

रुग्णालयात आल्यानंतर ना तिला व्हीलचेअर मिळाली नाही तिला स्ट्रेचर उपलब्ध झाला. असा तिचा आरोप आहे.

Akola News: पाठीवर नवरा, हातात लहान मुल, पोटाला बॅग! पतीला वाचवण्यासाठी पत्नीची धडपड, पण पुढे जे घडलं ते...
  • अकोला जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात आदिवासी महिला नवऱ्याला पाठीवर घेऊन उपचारासाठी आली होती
  • नवऱ्याला ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर या महिलेला रुग्णालयात व्हीलचेअर आणि स्ट्रेचर सुविधा मिळाली नाही
  • महिला लहान मूल हातात घेऊन, पोटाला बॅग बांधून रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्याकडे मदतीसाठी भटकताना दिसली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
अकोला:

योगेश शिरसाट 

सध्या अकोला जिल्ह्यात एक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहील्यानंतर आपली आरोग्य व्यवस्था कशी आहे याची जाणीव होईल. शिवाय अशा आरोग्य व्यवस्थेची किव आणि चिड आल्या शिवाय राहणार नाही. एक आदिवासी महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी धडपडत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. अक्षरशः तिला आपल्या पतीला आपल्याच पाठीवर घेवून फिरावं लागताना या व्हिडीओत दिसत आहे. पण तिच्या मदतीला मात्र कोणीच येत नाही. पाठीवर नवरा, हातात लहान मुल आणि पोटाला बांधलेली बॅग असं विदारक चित्र या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. 

अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. या रुग्णालयात जिल्ह्यातून लोक उपचारासाठी येत असतात. त्यामुळे इथं रुग्णांची वरदळ असते. याच रुग्णालयातील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण हा व्हिडीओ तितका धक्कादायक आहे. ही महिला आदिवासी महिला आहे. तिच्या नवऱ्याला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यामुळे ती त्याला उपचारासाठी रुग्णालयात घेवून आली होती. रुग्णालयात आल्यानंतर ना तिला  व्हीलचेअर मिळाली नाही तिला स्ट्रेचर उपलब्ध झाला. असा तिचा आरोप आहे.  

नक्की वाचा - Shocking news: 'दुबईत नोकरी हवी असेल तर धर्म बदल' युट्यूबवर लग्न अन् त्यानंतर सुरू झाला खतरनाक खेळ, शेवटी...

नवऱ्याचे प्राण वाचवणे तिच्यासाठी गरजेचे होते. तात्काळ डॉक्टरांपर्यंत नेणे महत्वाचे होते. म्हणून तिने या गोष्टींची वाट न पाहात आपल्या नवऱ्याला आपल्या पाठीवर घेतले. लहान मुलाला हाताला धरले. सोबत आणलेली बॅग पोटाला बांधली. त्यानंतर सुरू झाली तिची शोध मोहीत. डॉक्टर, नर्स, उपचार कुठे होतील याची ती चौकशी करू लागली. पण हे करत असताना कुणालाही तिची मदत करू वाटली नाही. ती प्रत्येक ठिकाणी जावून चौकशी करताना या व्हिडीओत दिसत आहे. तिथे असलेल्या एका व्यक्तीने याचा व्हिडीओ तयार केला आहे. 

नक्की वाचा - Pune News: अजित पवारांचा एकेरी उल्लेख, विनयभंगाचा गुन्हा, राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याला प्रकरण भोवणार

हातात लहान मूल, पोटाला बॅग आणि पाठीवर आजारी पती अशा अवस्थेत ही महिला रुग्णालय परिसरात मदतीसाठी भटकताना दिसत आहे. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षक व काही कर्मचारी उपस्थित असूनही कोणीही मदतीसाठी पुढे न केल्याचा ही तिचा आरोप आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. "येथे उपचार की मरण?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाची याबाबत कोणतीही प्रतिक्रीया उपलब्ध होवू शकलेली नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com