Operation Trap Tree Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील डिंडौरी जिल्ह्यामध्ये सुमारे 40 कोटी वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक 'साल'च्या (सरई) जंगलावर सध्या एक मोठे संकट कोसळले आहे. सालच्या जंगलातील झाडांना आतून पूर्णपणे पोकळ करणारा अतिशय धोकादायक 'बोरर' (Borer) कीटक तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा या जंगलात कर्दनकाळ बनून परतला आहे. या कीटकाने सामान्य वनविभागाच्या पूर्व करंजिया, पश्चिम करंजिया, दक्षिण समनापूर आणि बजाग वन परिक्षेत्रातील तब्बल 1.46 लाखाहून अधिक सालच्या झाडांना गंभीर नुकसान केले आहे.
किड्यांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वन विभागाने ऑपरेशन टॅप ट्री (Operation Trap Tree) सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत गावकऱ्यांना कीटक पकडण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक कीटकामागे 2 रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या सुवर्णसंधीचा फायदा घेत स्थानिक गावकऱ्यांनी आतापर्यंत तब्बल 10 लाख कीटक पकडले असून, त्याबदल्यात 20 लाख रुपयांची बंपर कमाई केली आहे. हे पैसे थेट गावकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत
किड्यांना पकडून त्यांची माळ तयार करून वन विभागाला सोपवत आहेत ग्रामीण.
काय आहे हा 'बोरर' कीटक? (वैज्ञानिक नाव आणि वैशिष्ट्ये)
- वैज्ञानिक नाव: या कीटकाचे वैज्ञानिक नाव 'हॉपलोसिरेंबिक्स स्पायनिकॉर्निस' (Hoplocerambyx spinicornis) असे आहे.
- स्वरूप: हा कीटक गडद तपकिरी रंगाचा असून याला अतिशय लांब मिशा असतात.
- झाडांचा शत्रू: जून-जुलै महिन्यातहे कीटक सालच्या झाडांच्या सालांमध्ये अंडी घालतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी (लारव्हा) थेट झाडाच्या आत शिरते आणि आतला लाकडी भाग हळूहळू खाऊन झाड आतून पूर्णपणे पोकळ करते.
- धोक्याची लक्षणे: कीटकाने हल्ला केलेल्या झाडाच्या बुंध्याशी लाकडाच्या भुशासारखी पांढरी पावडर जमा होऊ लागते.
- 300 वर्षांचे आयुष्य संपवणारा काळ: कीटकाच्या हल्ल्यामुळे सालच्या झाडाची वाढ पूर्णपणे थांबते. परिणामी तब्बल 300 वर्षांहून अधिक काळ जगण्याची क्षमता असलेले हे मजबूत झाड काही दिवसांतच वाळून नष्ट होते.
पहाटे 5 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेदरम्यान पकडले जातात किडे
10 लाख कीटक पकडले, गावकऱ्यांनी 20 लाख रुपये कमावले
वर्ष 1995नंतर डिंडौरीच्या 1.50 लाख हेक्टेर क्षेत्रात पसरलेल्या सालच्या जंगलात बोरर कीटकांचा वाढता प्रादुर्भाव पाहता वन विभागाने 'ऑपरेशन ट्रॅप ट्री' सुरू केले. एका किड्यावर दोन रुपयांचे बक्षीस घोषित करून गावकऱ्यांना मोहिमेशी जोडले गेले. 20 जूनपासून ते आतापर्यंत गावकऱ्यांना 10 लाख साल बोरर कीटक पकडले आहेत. यामोबदल्यात 20 लाख रुपये त्यांना देण्यात येत आहेत.
(नक्की वाचा: Exclusive: 'वैशूला आज संपवलं...' नाशिकच्या वैष्णवी आवारे हत्येची Inside Story! वेड्या प्रेमाचा रक्तरंजित अंत)
कीटक कसे पकडले जात आहेत?
- वन विभाग सालच्या झाडाच्या डिंकापासून (रेजिन) पावडर तयार करून गावकऱ्यांच्या घरांच्या आसपास ठेवत आहेत. पावडरच्या तीव्र वासाने आकर्षित होऊन कीटक स्वतःहून तिथे गोळा होतात.
- कीटकांना सूर्योदयापूर्वी (पहाटे 5 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेदरम्यान) पकडलं जाते, कारण उन्हामध्ये कीटकांना पकडणं कठीण होते.
- गावकरी झाडांच्या सालांमधील छिद्र शोधून तिथे ओली माती, पाने किंवा लाकडाचे तुकडे लावून ते बंद करतात. ऑक्सिजन न मिळाल्याने कीटक बाहेर पडतात.
- काही ठिकाणी झाडाच्या खोडाजवळ हलका धूर केला जातो, ज्यामुळे कीटक बाहेर पळतात.
- बाहेर आलेल्या कीटकांना गावकरी चिमटीने किंवा हाताने पकडून डब्यात बंद करतात. त्यानंतर 'कीटकांची माळ' तयार करून वन विभागाच्या कार्यालयात जमा करतात. तिथे कीटकांच्या डोक्यांची मोजणी करून गावकऱ्यांना तत्काळ पैसे दिले जात आहेत.
- जुलै महिन्याच्या अखेरीस वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जमा केलेल्या सर्व 10 लाख बोरर कीटकांची वैज्ञानिक आणि सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे, जेणेकरून पुढील वर्षात यांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.