13 जानेवारी रोजी सुरू झालेला महाकुंभ मेळ्याची(Maha Kumbh 2025) सांगता महाशिवरात्रीच्या (Maha Shivratri 2025) दिवशी झाली. 12 वर्षानंतर महाकुंभ मेळ्याचे प्रयागराज इथे आयोजन करण्यात आले होते. या महाकुंभ मेळा आर्थिकदृष्ट्याही प्रचंड भरभराटीचा ठरताना दिसतो आहे. या कुंभमेळ्याला 66 कोटी भाविकांनी उपस्थिती लावली होती असा अंदाज आहे. या भाविकांमुळे महाकुंभ मेळ्यात 3 लाख कोटींची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आर्थिक उलाढालीचे केंद्र हे फक्त प्रयागराजच नव्हते तर प्रयागराजच्या 150 किलोमीटरपर्यंतच्या परिघामध्ये याचा फायदा झालेला दिसतो आहे. या महातकुंभ मेळ्यामुळे बोटचालकांना अच्छे दिन आले होते. या बोटचालकांनी IIT, IIM वाल्यांना जे पॅकेज मिळते त्यापेक्षा कैकपट जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे. या बोटचालकांनी अवघ्या 45 दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रयागराजमध्ये एक कुटुंब आहे. या कुटुंबाकडे 130 बोटी आहेत. या बोटी भाविकांना गंगाविहार करवत असतात. या बोट चालवणाऱ्यांची महाकुंभ मेळ्यात दिवसाची कमाई 50 ते 52 हजार रुपये इतकी होती. महाकुंभ मेळ्यात 130 बोटी असणाऱ्या या कुटुंबाने तब्बल 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कुंभ मेळ्यात बोट चालकांचे हाल झाल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने केला होता. या आरोपांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, एका कुटुंबाकडे 130 बोटी आहेत, 45 दिवसांत त्यांनी 30 कोटींची कमाई केली. एका बोटीमागे त्यांनी 23 लाख रुपये कमावले आहेत. एका बोटीचे दिवसाला 50 ते 52 हजार उत्पन्न होते.
या महाकुंभ मेळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी बळकटी मिळाली आहे. या कुंभ मेळ्यातून तिथल्या सरकारला 54 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या महाकुंभ मेळ्यामुळे किमान 60 लाख लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळाला होता. पर्यटन, आदरातिथ्य, वाहतूक आणि किरकोळ विक्रीमुळे अनेकांना कमाईचे साधन मिळालेल होते. महाकुंभ मेळ्यासाठी आलेल्या भाविकांसाछी निवाऱ्याची, अन्नपाण्याची सोय करणाऱ्यांना आणि धार्मिक वस्तू विकणाऱ्यांना बराच फायदा झाल्याचे बोलले जाते.
नक्की वाचा : नोएडातील न्यूज चॅनलमध्ये IIT बाबाला मारहाण, Video शेअर करत केले अनेक आरोप
फक्त उत्तर प्रदेशच्याच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही महाकुंभ मेळ्यामुळे बळकटी मिळेल असा अंदाज आहे. भारताचा विकासदर चौथ्या तिमाहीमध्ये वेगाने वाढण्याची दाट शक्यता आहे. सेंट्रमने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. रेपो रेट कमी होणे, महाकुंभमध्ये झालेली आर्थिक उलाढाल याचा परिणाम चौथ्या तिमाहीमध्ये बघायला मिळेल असे सेंट्रमचे म्हणणे आहे. चौथ्या तिमाहीमध्ये भारताचा विकासदर 6.5% पर्यंत पोहचेल असा अंदाज सेंट्रमने व्यक्त केलाय. जागतिक पातळीवरील तणावाची स्थिती , युद्धे यांचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो असेही सेंट्रमने म्हटले आहे.