Mahakumbh 2025 : महाकुंभमध्ये मोनालिसाने 10 कोटी कमावले, दाव्यामागील सत्य काय आहे? 

माळा विकणारी तरुणी आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि अदांनी सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ करीत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराजमध्ये इंदूरची मोनालिसाच्या (Mahakumbh 2025) नावाची आणि सौंदर्याची मोठी चर्चा आहे. गळ्यातल्या माळा विकणारी तरुणी आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि अदांनी सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ करीत आहे. सुंदर-नक्षीदार डोळे आणि साधेपणाने तिने लोकांची मनं जिंकली आहेत. ज्यामुळे अवघ्या काही दिवसात ती स्टार झाली आहे. 

मोनालिसा खरंच कोट्यधीश झाली?
गेल्या काही दिवसांपासून मोनालिसाने ( Monalisa Photos) महाकुंभमध्ये 10 दिवसांमध्ये दहा कोटी जमा केल्याचं वृत्त व्हायरल होत आहे. या बातम्यांनी लोकही हैराण झाले आहेत. अनेकांचा तर यावर विश्वासच बसत नाही. 

Advertisement

मोनालिसा ही मूळची मध्यप्रदेशातील इंदूरची राहणारी आहे. ती आपल्या कुटुंबासह रुद्राक्ष आणि मोत्यांच्या माळा विकण्याचं काम करते. महाकुंभमध्येही ती याच उद्देशाने आली होती. मात्र सौंदर्यामुळे तिला वेगळी ओळख मिळाली. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

10 कोटींचं सत्य काय आहे?
मोनासिलाने रुद्राक्षच्या माळा विकून दहा दिवसात दहा कोटी रुपये कमावल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या सर्व अफवा असल्याचा दावा स्वत: मोनालिसाने केला आहे. 

सोशल मीडियावर मोनालिसाची चर्चा...
मोनालिसाचे व्हिडिओ आणि फोटोंमुळे इंटरनेटवर धूम आहे. तिचं मोठं कौतुक केलं जात आहे. मात्र दहा कोटींच्या दाव्याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

Advertisement

नक्की वाचा - Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, महाकुंभात केले पिंडदान, Video

प्रसिद्धीचा मनस्ताप..
सोशल मीडियावर मोनालिसेने अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याने अवघ्या काही दिवसात तिला प्रसिद्धी मिळाली. मात्र याचा फटकाही तिला सहन करावा लागला.  सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी तिला भंडावून सोडलं आहे. सतत तिचा व्हिडिओ, फोटो घेतले जातात. सतत तिला मुलाखत देण्याची जबरदस्ती केली जाते. अशावेळी तिच्या भोवती लोक गराडा घालतात. यामुळे काही व्हिडिओमध्ये ती चिडल्याचंही दिसतं. या सर्व प्रसंगांनंतर ती मध्यप्रदेशातील महेश्वर येथे आपल्या गावी गेल्याची माहिती आहे. 

मोनालिसाला चित्रपटाची ऑफर...
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया स्टार मोनालिसा हिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. निर्माते सनोज मिश्रा यांनी आपला आगामी चित्रपट द डायरी ऑफ मणिपूरमध्ये प्रमुख भूमिकेसाठी मोनासिलाला ऑफर दिली आहे. मोनालिसा आणि तिच्या कुटुंबीयांनी ही ऑफर मान्यही केली आहे. या चित्रपटात मोनालिसा निवृत्त सैन्य अधिकाऱ्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. मात्र चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी तीन महिने तिला मुंबईत अभिनयाचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आह. 

Advertisement


  
 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world