2 days ago

आज प्रयागराजमधील महाकुंभमध्ये तिसऱ्या अमृत स्नानासाठी यंत्रणा सज्ज आहेत. मौनी अमावस्येला स्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 30 जणांचा मृत्यू झाल्यामुळे अधिक खबरदारी घेण्यात आली आहे. दुसरीकडे पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या वाढली असून रविवारी आणखी नऊ रुग्णांची भर पडली आहे. 
 

Feb 03, 2025 22:43 (IST)

प्रशासनात आता मराठी भाषेचा वापर अनिवार्य, सरकारने जीआर काढला

प्रशासनात आता मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मराठी भाषा धोरणाच्या शिफारसींची अंमलबजावणी बाबात जी आर जारी करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात मराठी भाषेत संभाषण न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यां विरूध्द तक्रार दाखल करण्यात येईल आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. असं या धोरणात नमुद करण्यात आलं आहे. 

Feb 03, 2025 22:23 (IST)

पुण्यात GBS आतापर्यंत 163 संशयित रुग्ण सापडले

पुण्यात आजपर्यत एकुण 163 संशयित रुग्ण सापडले आहेत. तसेच 5 संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 127 रुग्णांची GBS म्हणून निदान निश्चिती झाली आहे.  आतापर्यत 47 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. 47 रुग्ण आयसीयु मध्ये व 21 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.

Feb 03, 2025 21:14 (IST)

जी बी एस संसर्गजन्य नाही;महाराष्ट्रात पूर्णपणे नियंत्रणात- जे. पी. नड्डा

जी बी एस संसर्गजन्य नाही;महाराष्ट्रात पूर्णपणे नियंत्रणात आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात विशेष करून पुणे शहरात जी बी एस रुगाणची संख्या वाढत आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नाही, यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच राज्यात या आजारांवर लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत सांगितले. 

Feb 03, 2025 21:11 (IST)

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी होणार

आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप केले होते. याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती. शिवाय याबाबतचे पुरावे पालकमंत्री अजित पवार यांना दिले होते. त्यानुसार अजित पवार यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. मागील दोन वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी हे पथक करणार आहे. अवर सचिव सुषमा कांबळी यांच्या आदेशान्वये स्थापन झालेल्या या पथकात तिघांचा समावेश आहे. 

Advertisement
Feb 03, 2025 19:26 (IST)

राज्यात 1 लाख 94 हजार नवे विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार

आता राज्यात 1 लाख 94 हजार नवे विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यात येणार आहेत. तर विद्यमान नियुक्त्या रद्द केल्या गेल्या आहेत. अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

Feb 03, 2025 19:19 (IST)

इगतपुरीच्या ठाकूरवाडी इथं विहिरीत आढळले 2 अल्पवयीन मुलींचे मृतदेह

इगतपुरीच्या ठाकूरवाडी इथं विहिरीत 2 अल्पवयीन मुलींचे मृतदेह आढळले आहेत. आत्महत्या की घातपात ? याबाबत पोलीस तपास सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. याबाबतची तक्रार पोलीसांकडे देण्यात आली होती.घोटी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. 

Advertisement
Feb 03, 2025 17:45 (IST)

रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 23 हजार 778 कोटींचा निधी - अश्विनी वैष्णव

रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 23 हजार 778  कोटींचा निधी दिल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. काँग्रेसच्या काळातील निधी पेक्षा हा 20 पट जास्त असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

Feb 03, 2025 12:26 (IST)

Live Update : मंत्रालयात पहिल्याच दिवशी गोंधळ, अनेक कर्मचाऱ्यांचा फेस आयडी मॅच न झाल्याने गोंधळ

मंत्रालयात पहिल्याच दिवशी गोंधळ, अनेक कर्मचाऱ्यांचा फेस आयडी मॅच न झाल्याने गोंधळ 

कर्मचारी यांची मोठी रांग

Advertisement
Feb 03, 2025 12:14 (IST)

Live Update : पुण्यात GBS साथीचा प्रादुर्भाव वाढला, सिंहगड रोडच्या बाहेरील रुग्ण आढळले!

पुण्यात GBS साथीचा प्रादुर्भाव वाढला, सिंहगड रोडच्या बाहेरील रुग्ण आढळले!

पुण्यातील गिलियन-बरे सिंड्रोम (GBS) साथीचा फैलाव वाढत असून, आता सिंहगड रोड परिसराच्या बाहेरही संशयित रुग्ण आढळू लागले आहेत. नवीन रुग्ण थेरगाव, मुंढवा, मावळ, खेड, चिखली, पिंपळे गुरव, वाघोली, धनकवडी, तळेगाव, चाकण, पिंपरी, कोथरूड, रावेत आणि मोशी यासह इतर भागांमध्ये आढळले आहेत. आरोग्य विभाग आणि WHOच्या टीम्स परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना करत आहेत.

Feb 03, 2025 11:36 (IST)

Live Update : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल दोनच्या पार्किंगमध्ये अपघात, 5 जण जखमी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल दोनच्या पार्किंगमध्ये अपघात

पॅसेजर सोडण्यासाठी आलेल्या मर्सिडिज गाडीवरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

अपघातात 5 जणं जखमी, जखमींमध्ये 2 चेक रिपब्लिक देशाच्या दोघांचा समावेश, तर तीन जण विमानतळावरील क्रू मेंबर असल्याची पोलिसांची माहिती

Feb 03, 2025 08:33 (IST)

Live Update : छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या खाजगी बसला कांडगाव जवळ अपघात, एक ठार..30 जखमी

कोल्हापूरजवळ मध्यरात्री ट्रॅव्हल उलटली, १ ठार तर ३० जखमी झाले असून ४ गंभीर आहेत. 

गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या खाजगी बसला कांडगाव जवळ अपघात

जखमींवर कोल्हापूरमधील CPR आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू 

Feb 03, 2025 08:03 (IST)

Live Update : मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता

आगामी काळात मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. कारण वरील धरणातून जायकवाडीत सोडण्यात येणाऱ्या हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांकडून चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. दरम्यान यावेळी संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आपली भूमिका मांडत, मराठवाड्याला हक्काचं पाणी देताना कुचराई करू नका, विखे पाटील असो किंवा अजून कुठले नेते, त्यांना विनंती आहे की, तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहात, कुठल्या एका भागाचं नाही. जर तुम्ही हक्काच्या मागणीला विरोध करत असाल तर आम्हाला तुमचा विरोध करावा लागेल, असा इशारा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना दिला आहे.