Mahakumbh 2025 : स्टीव जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेलना शिवलिंगाला स्पर्श का करू दिला नाही?

अॅपलचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव जॉब्सची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स महाकुंभमध्ये सामील होणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

अॅपलचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्सची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स महाकुंभमध्ये सामील होणार आहेत. यासाठी त्या भारतात दाखल झाल्या आहेत आणि त्यांनी प्रयागराज जाण्यापूर्वी शनिवारी वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज त्यांच्यासोबत उपस्थित होते. उद्या 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कैलाशानंद गिरी महाराज यांनी लॉरेन पॉवेल जॉब्सला आपली मुलगी असल्याचं म्हटलं. मी तिला माझं गोत्र दिलं आहे. त्याशिवाय तिला कमला हे नवं नाव ठेवण्यात आलं आहे. वाराणसीहून त्या प्रयागराजला जातील. ते दुसऱ्यांना भारतात आल्या आहेत. स्टीव्ह जॉब्स यांना हिंदू धर्माबद्दल खास आस्था होती. 1974 मध्ये ते अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी भारतात आले होते. यावेळी ते नीम करोली बाबाच्या कैंची धाम आश्रमातही गेले होते. 

नक्की वाचा - Mahakumbh 2025: 'महाकुंभ'च्या अलोट गर्दीत हरवला तर? अद्ययावत प्रणाली करणार मदत; काय आहे खास व्यवस्था?

गंगेचं घेणार दर्शन...
निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांनी पुढे सांगितलं की, आज महादेवाची प्रार्थना करण्यासाठी काशीला आलोय. कुंभमेळाव्यात कोणताही अडसर येऊ नये यासाठी पूजा करण्यात आली. लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी मंदिरातील परंपरांचं पालन केलं आणि गंगेचं दर्शन घेतलं. पुढे ते म्हणाले, भारतीय परंपरेनुसार काशी विश्वनाथमध्ये कोणी अन्य हिंदू शिवलिंगाला स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी बाहेरून शिवलिंगाचं दर्शन घेतलं. 

Advertisement

13 जानेवारीपासून महाकुंभाला सुरुवात...
यंदा महाकुंभ मेळाव्यात 45 कोटींहून अधिक भाविक सामील होण्याची अपेक्षा आहे. महाकुंभदरम्यान भाविक पवित्र स्नान करण्यासाठी गंगा, यमुना आणि सरस्वती नदींच्या संगमावर एकत्र येतील. 13 जानेवारीपासून महाकुंभची सुरुवात होणार असून सांगता 26 फेब्रुवारीला होईल.