आजपासून जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा महाकुंभचा शुभारंभ झाला आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत लाखोंच्या संख्येत हिंदू धर्मात आस्था असणारे श्रद्धाळू संगम नदीत स्नान करण्यासाठी येतील. कुंभमध्ये स्नान केल्याने सर्व पापं धुतली जातात आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे सनातन धर्मात आस्था ठेवणारे आपल्या आयुष्यात एक वेळा तरी कुंभमध्ये स्नान करण्यासाठी सामील होतात. कुंभदरम्यान काही खास तिथी असतात, ज्याला शाही स्नान म्हणतात. यादिवशी स्नान करण्याचे काही विशेष असतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या दिवशी संगम नदीत सर्वात आधी नागा साधू स्नान करतात. यानंतर सर्वसामान्यांसाठी खुली केली जाते. प्राचीन काळात नागा साधू धर्म, संस्कृतीची रक्षा करण्यासाठी सैन्याच्या रुपात काम करीत होते. या कारणास्तव कुंभमध्ये स्नान करण्याचा पहिला अधिकार नागा साधुंना दिला जातो. शाही स्नानाच्या नियमांचं पालन केल्यास कुटुंबातील सदस्यांना पवित्र स्नानाचा पूर्ण लाभ मिळतो. दुसरं म्हणजे कुंभात स्नान करताना किमान पाच वेळा डुबकी मारा. या दोन गोष्टी लक्षात ठेवून महाकुंभात स्नान केल्याने फायदा होतो, असं म्हटलं जातं.
नक्की वाचा - Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये आज महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ, कधी होईल शाही स्नान?
यंदा शाही स्नानाच्या सहा तिथी आहेत. ज्यात स्नान करीत पुण्य मिळवू शकता. 3 जनवरी 2024- पौष पौर्णिमा, 14 जानेवारी 2025 - मकर संक्रांत, 29 जानेवारी 2025 - मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी 2025 - वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी - माघ पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारी - महाशिवरात्री पर्व.