2 months ago

शरद पवार-अजित पवार आज एकाच मंचावर येणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला दोघेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी ‘एआय'वर चर्चा होणार आहे. ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरावर आज मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एकदिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. 

Jun 09, 2025 21:27 (IST)

लाच मागितल्या प्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त लाच-लुचपतच्या जाळ्यात

लाच मागितल्या प्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त लाच-लुचपतच्या जाळ्यात

सात लाखांची लाच मागितल्या प्रकरणी उपायुक्त वैभव साबळे विरोधात गुन्हा दाखल.

महापालिका क्षेत्रातल्या एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी मागितली होती लाच.

दहा लाखांची मागणी करून सात लाखांची रक्कमेवर झाली होती तडजोड. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराने केली होती तक्रार.

तक्रारी मध्ये सात लाखांची लाच मागितल्याचं निष्पन्न.

उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनात उडाली खळबळ..

Jun 09, 2025 16:09 (IST)

स्कुल बस बाबात शासनाची नवी नियमावली जाहीर

 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय विभागाने स्कुल बस ड्रायव्हरांचा बाबाती नियमावली तयार केलीय यामध्ये दर आठवड्याला स्कुल बस चालकांची मद्यचाचणी होणार आहे…दर आठवड्याला ही चाचणी करणे बंधनकारक असणार आहे आणि नियम सर्व शाळांना लागु करण्यात आलाय…मुंबईत ६००० स्कुल बस कार्यरत आहेत त्यामुळे स्कुल बस असोसिएशन ने या नियमावलीचे स्वागत केलं आहे. बस मध्ये जीपीएस सेवा बसवणे,  सीसीटीव्ही कॅमेरे लावणे,  दर ६ महिन्यांनी बसची तांत्रिक तपासणी करून आरटीओ कडून प्रमाणपत्र घेणे,  बसमध्ये आसन क्षमते एवढेच विद्यार्थी घेणे, प्रत्येक बस मध्ये एक महीला सेविका अनिवार्य हे नियम लागू करण्यात आले आहेत.  

Jun 09, 2025 15:58 (IST)

सोयाबीन, कांदा, फळबागासाठी AI चा वापर, सरकारचा मोठा निर्णय

राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार  AI चा वापर इतर पिकांसाठीही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सोयाबीन, कांदा, फळबागासाठीही AI चा वापर केला जाणार आहे. त्यासाठी  सरकार शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे.  उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय होईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिली आहे. 

Jun 09, 2025 14:40 (IST)

LIVE Updates: पीओपी मूर्तींवरील निर्बंध हटवले

गणेश मूर्तिकारांसाठी महत्वाची बातमी

गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

POP च्या मूर्तीवर बनवण्यावर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यात  आले

परंतु मूर्तिचे विसर्जन नैसर्गिक जलाशयात करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने केली सक्त मनाई

पीओपी मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावात केलं जाऊ शकतं

परंतु 20 फुटाच्या मूर्तिकरीता भूमिका स्पष्ट झाली नाहीय म्हणून राज्यसरकारला 3 आठवड्याचा वेळ देण्यात आला

सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 30 जून ही पुढील सुनवाईची तारीख जाहीर

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाचा निर्णय

Advertisement
Jun 09, 2025 14:10 (IST)

लोकलचे दरवाजे बंद केले तर लोक गुदमरून मरतील- राज ठाकरे

लोकलचे दरवाजे बंद केले तर लोक गुदमरून मरतील असं  राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत लोकलमधून पडून काही जणांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. येणारे लोंढे वाढत आहेत. त्यामुळे गर्दी वाढली आहे. कुठलेही नियंत्रण राहीले नाही त्यामुळे अशा घटना होत असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

Jun 09, 2025 12:50 (IST)

Live Update : मुंब्रा अपघातानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Advertisement
Jun 09, 2025 12:49 (IST)

Live Update : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत लोकलमधून खाली पडलेल्या प्रवाशांची नावं...

मुंब्रा दुर्घटनेत रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

रेल्वेतून पडलेल्या प्रवाशांची नावे

आदेश -२६  वर्ष

रेहान शेख- २६ वर्षे

तुषार-22 वर्षे

मनीष -23 वर्षे

मच्छिंद्र - 22 वर्षे

वर्षा धोंडे- २४ वर्षे

प्रियांका-26 वर्षे

इतर तिघांची ओळख पटलेली नाही.

Jun 09, 2025 09:55 (IST)

Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर 

पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची होणार बैठक

 संघटनात्मक बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर बैठक

Advertisement
Jun 09, 2025 09:48 (IST)

Live Update : आताची मोठी बातमी! लोकलचा भीषण अपघात, दरवाजाला लटकून प्रवास करणारे 12 ते 15 प्रवासी ट्रॅकवर पडले

फास्ट लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवर आणि स्टेशन पडले..

आठ ते बारा प्रवासी पडल्याची प्राथमिक माहिती..

अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने घटना घडल्याचा अंदाज..

Jun 09, 2025 08:00 (IST)

Live Update : अकोला शहरातील राधेनगर परिसरात बंद फ्लॅटमध्ये चोरी

शहरातील राधेनगर परिसरातील ममता अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहणारे ऍड. ओमप्रकाश गुरुप्रसाद अग्रवाल यांच्या बंद फ्लॅटमधून रोख रक्कम व चांदीच्या नाण्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऍड.अग्रवाल हे शहराबाहेर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद आणि चांदीच्या नाण्यांची चोरी केली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि तसेच तपासणी पथक दाखल झाले होते.

Jun 09, 2025 07:54 (IST)

Live Update : पुढील चार ते पाच दिवस विजांसह पावसाचा अंदाज

कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील चार ते पाच दिवस विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे

दरम्यान, विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानाचा पारा चाळीशीपार पोहोचला आहे

मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे

यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत आहे

मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गेले काही दिवस पाऊस पडलेला नाही

परिणामी तेथील तापमानात वाढ झालेली आहे

Jun 09, 2025 07:03 (IST)

Live Update : लता हगवणे, शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण तिघांची आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी

आज दुपारी लता हगवणे, शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण या तिघांची पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सुनावणी होणार आहे.या अगोदर लता हगवणे आणि शशांक हगवणे यांना जेसीबी प्रकरणात खेड न्यायालयात हजर केले होते त्याच प्रकरणात चौकशीसाठी म्हाळुंगे MIDC पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.आता या सगळ्यांच्या चौकशी दरम्यान पोलिसांना काय पुरावे मिळाले हे न्यायालयात सादर करून आजची सुनावणी होईल...दरम्यान या प्रकरणात हगवणे कुटुंबीयांना आणि निलेश चव्हाण ला पुन्हा कारागृहात जावे लागणार की त्यांची जामीनावर सुटका होईल याकडे पहावे लागेल

Topics mentioned in this article