Rajasthan Accident : धनत्रयोदशीच्या दिवशी मोठा अपघात, बस पुलाला धडकली, 12 प्रवाशांचा मृत्यू

Major Accident in Sikar: सीकरचे खासदार अमरा राम देखील घटनास्थळी पोहोचले.  मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा आणि अनेक नेत्यांनी या अपघाताच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Sikar Accident :  देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. मात्र धनत्रयोदशीच्या दिवशीच राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात अपघाताची मोठी घटना घडली आहे. एका पुलाला धडकल्याने झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.  जखमींना लक्ष्मणगड आणि सीकर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुलाच्या भिंतीला धडकल्याने बसचे मोठे नुकसान झाले. बसच्या समोरील बाजूचा अक्षरश: चक्काचूर झाला. धडक जोरदार असल्याने बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले. या अपघातात बसमधील 12 जणांचा मृत्यू झाला, तर काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. 

हादसे वाली जगह पर जुटी लोगों की भारी भीड़ और घायलों को लेकर निकलती एंबुलेंस.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी, एसपी यांच्यासह अनेक लोक घटनास्थळी पोहोचले. सीकरचे खासदार अमरा राम देखील घटनास्थळी पोहोचले.  मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा आणि अनेक नेत्यांनी या अपघाताच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

हादसे की शिकार हुई बस को जेसीबी के जरिए रास्ते से हटाने की कोशिश की जा रही है.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला

सीकर दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी लिहिले की, "सीकरच्या लक्ष्मणगढ भागात बस दुर्घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. मृतांच्या शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच प्रभू श्री राम चरणी प्रार्थना."

Advertisement