Trending News: एआयचा धोका ओळखा! व्हायरल PHOTO ने मीडिया जगतात खळबळ; असं काय घडलं?

AI Misuse: एआयमुळे फेक फोटो, व्हिडिओ बनवणे सोपे झाले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

AI generated ID cards: सध्या एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा सर्वच क्षेत्रात वापर होत आहे. एआयने अनेक कामी सोपी केली आहेत. एकीकडे एआयमुळे तंत्रज्ञानाचा विकास होत असतानाच त्याचे काही धोकेही दिसत आहेत. एआयमुळे फेक फोटो, व्हिडिओ बनवणे सोपे झाले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एआयचा वापर करुन एका तरुणाने चक्क बनावट ओळखपत्र तयार केली आहेत. 

एआयने बनवली बनावट कागदपत्रं

समोर आलेल्या माहितीनुसार, बेंगळूरुमधील हरवीर सिंग चड्ढा नावाच्या एका टेक-तज्ञाने गुगलच्या जेमिनी तंत्रज्ञानाचा वापर करून हुबेहूब दिसणारे पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार केले, ज्यावर त्याने मजेत ‘ट्विटरप्रीत सिंग' हे नाव टाकले होते. ही पोस्ट काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली ज्यावर नेटकऱ्यांनी भविष्यातील डिजिटल सुरक्षिततेवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.

Gauri Garje Death: ॲमेझॉन बुकिंगमुळे सत्य समजलं, गौरीच्या पायाखालची जमीन सरकली; धक्कादायक खुलासा

​हरवीर सिंग चड्ढाने या नकली ओळखपत्रांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, जेमिनीची नॅनो-जनरेटिंग  क्षमता जितकी प्रभावी आहे, तितकीच ती धोकादायकही आहे. हे तंत्रज्ञान इतकी अचूक बनावट ओळखपत्रे बनवू शकते की सध्याच्या काळात वापरली जाणारी पारंपरिक पडताळणी पद्धत त्यांना ओळखण्यात अपयशी ठरू शकते.

​सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये आधार आणि पॅन कार्ड ज्या पद्धतीने बनवले आहे ते पाहून खरे की खोटे असा प्रश्नही मनात येत नाही,  अत्यंत बारकाईने पाहिल्यानंतरच ते खोटो असल्याचे समजते. दोन्ही कार्डांच्या छायाचित्रांवर जेमिनी AI (Gemini AI) चा वॉटरमार्क (Watermark) स्पष्टपणे दिसतो, ज्यामुळे हे कार्ड AI द्वारे तयार केले गेले आहेत, हे सिद्ध होते.

Advertisement

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

​या पोस्टवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही नेटिझन्सने या घटनेला भविष्यातील गंभीर धोका मानले आहे. तर काहींनी ‘घाबरण्याचे कारण नाही' म्हणत या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास व्यक्त केला. काहींनी हा आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबतचा मोठा धोका आहे, असं स्पष्ट मत मांडलं आहे. 

Paithan Election News: 'प्रचाराला येऊ नका..' तरुणाने घरासमोर लावला 'असा' बॅनर; अख्ख्या जिल्ह्यात चर्चा