जाहिरात

Paithan Election News: 'प्रचाराला येऊ नका..' तरुणाने घरासमोर लावला 'असा' बॅनर; अख्ख्या जिल्ह्यात चर्चा

अनेकदा पाण्यासाठी निवेदन देऊनही उपयोग झाला नाही, त्यामुळे त्या निवेदनाच्या प्रतिचे फोटो देखील त्यांनी बॅनरवर लावले आहे. 

Paithan Election News: 'प्रचाराला येऊ नका..' तरुणाने घरासमोर लावला 'असा' बॅनर; अख्ख्या जिल्ह्यात चर्चा

Chhatrapati Sambhajinagar News: राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे धुमशान सुरु आहे. गावागावात प्रचारांचा धडाका सुरु असून पारांवर, कट्ट्यांवर राजकारणाच्या चर्चा रंगत आहेत. एकीकडे निवडणुकीत उमेदवारांमध्ये शाब्दिक वाद, आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच पैठणमधील एका मतदाराने लावलेला बॅनर चांगलाच चर्चेत आला आहे. 

 पैठण नगरपरिषदमध्ये एका होर्डिंगची जोरदार चर्चा आहे. गेल्या चार वर्षांपासून नळाला पाणी येत नाही, त्यामुळे एका व्यक्तीने अनोखे बॅनर आपल्या घराच्या गेटवर लावले आहे. विलास जोशी असे बॅनर लावणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे घरासमोर बॅनर लावून प्रचारासाठी घरी कुणीही येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. अनेकदा पाण्यासाठी निवेदन देऊनही उपयोग झाला नाही, त्यामुळे त्या निवेदनाच्या प्रतिचे फोटो देखील त्यांनी बॅनरवर लावले आहे. 

Crime News: मुख्यध्यापकाकडून लैंगिक छळ; विद्यार्थिनीने लायब्ररीतच जीवन संपवलंं; सुसाईड नोटमध्ये काय?

श्रीक्षेत्र पैठण तसेच प्रभाग क्र. १२ मधील सन्माननीय सर्व उमदेवार व नगर अध्यक्ष पदासाठीचे उमेदवार यांना विनंती आहे की कोणीही आपला प्रचार करण्यासाठी व आपल्याला मतदान मागण्यासाठी वैयक्तिक श्री. विलास लक्ष्मीकांत जोशी म्हणजेच माझ्या परी कोणीही घेऊ नये. ही सर्वांना विनंती, असा मजकूर या बॅनरवर दिसत आहे. 

तसेच यामागचे मोठे कारणही त्यांनी सांगितले आहे. मागील ४ वर्षापासुन माझ्या परातील नळाला नगर परिषद चे पिण्याचे पाणी येत नाही नगर परिषद कार्यालयास वारंवार सांगुनही लेखी अर्ज करुनही पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. म्हणुन मी व माझ्या परिवाराने या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे. सर्वांना मनापासुन हार्दिक शुभेच्छा, असं या मतदाराने म्हटलं आहे. सध्या या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे.

Kalyan Traffic News: कृपया लक्ष द्या! कल्याणमधील महत्त्वाचा पूल 10 दिवस बंद; पर्यायी मार्ग कोणते? वाचा डिटेल्स

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com