बिहारमध्ये पोलिसांच्या निष्काळजीपणाचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीच्या हत्येच्या आरोपाखाली चार जणांना शिक्षा झाली होती. मात्र 17 वर्षांनंतर हत्या झालेली व्यक्ती जिवंत सापडली आहे. या व्यक्तीच्या हत्येचा आरोप त्याच्याच काका आणि तीन चुलत भावांवर होता. चौघांनीही तुरुंगात हत्येच्या गुन्ह्याखाली शिक्षा देखील भोगली. दरम्यान काकांचा मृत्यू झाला तर तिघे चुलत भाऊ जामिनावर बाहेर आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बिहारमधील झाशी येथील हे संपूर्ण प्रकरणा आहे. नथुनी पाल या व्यक्तीच्या हत्येच्या गुन्ह्याखाली या चौघांना शिक्षा झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार 2007 मध्ये नथुनी पालच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे ते बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. कुटुंबाने नथुनीचा काका आणि चार भावांवर त्यांचा खून करून त्याची जमीन हडप केल्याचा आरोप केला होता. सुनावणीदरम्यान एका तरुणाची निर्दोष मुक्तता करण्यात आली, तर काकासह तीन भावांना तुरुंगात टाकण्यात आले.
(नक्की वाचा - Pune Crime : पुण्याच्या IT कंपनीत तरुणीची हत्या, सहकाऱ्याने पार्किंगमध्ये गाठलं अन्...)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जानेवारी रोजी गस्त घालत असताना नथुनी हा संशयास्पद अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की, तो काही काळापूर्वी झाशीला राहायला आला होता. तो एकटाच राहतो आणि त्याचे आई-वडील मरण पावले आहेत. अधिक सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याची पत्नी त्याला सोडून गेली असून तो सुमारे 17 वर्षांपूर्वी गाव सोडून कुठेतरी गेला होता.
(Kolhapur Crime : मामाकडून भाचीचं लग्न उद्ध्वस्त करण्याचा घाट, जेवणात घातलं विष; कारण ऐकून पाहुण्यांचा संताप!)
याप्रकरणी पोलिसांनी आता नथुनीच्या हयातीची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याची तयारी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सध्या तीन जण जामिनावर आहेत. नथुनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याच्या कुटुंबीयांचे जबाब घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर नथुनी मागील काही वर्षांत कुठे आणि कसा राहत होता, याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.