चप्पलमध्ये लावला GPS ट्रॅकर, पतीनं मोबाईलवर पाहिले पत्नीचे कारनामे, स्वत:च्याच घरी बायकोला रंगेहाथ पकडलं अन्..

एका संशयी पतीने त्याच्या पत्नीच्या चप्पलमध्ये जीपीएस ट्रॅकर बसवला.त्यानंतर पत्नीचा पर्दाफाश झाला.पतीने थेट पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं.त्यानंतर असं काही घडलं..

जाहिरात
Read Time: 2 mins
Husband Caught Wife Raid Handed

GPS Wife Tracking Case:  पटनाच्या फुलवारी शरीफमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका संशयी पतीने त्याच्या पत्नीच्या चप्पलमध्ये जीपीएस ट्रॅकर बसवला.त्यानंतर पत्नीचा पर्दाफाश झाला.पतीने थेट पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं.त्यानंतर जो काही ड्रामा झाला,ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. 

बिहारची राजधानी पटनाच्या फुलवारी शरीफमध्ये 'स्मार्ट जासुसी'करणाऱ्या पतीची मोठी चर्चा आहे. हे प्रकरण एकता नगर येथील आहे. पतीला त्याच्या पत्नीच्या वागणुकीवर थोडा संशय होता.त्यामुळे त्याने पत्नीला रंगेहाथ पकडण्यासाठी तिच्या चप्पलमध्ये छोटासा जीपीएस ट्रॅकर बसवला. जेणेकरून पत्नीची प्रत्येक हालचाल तो मोबाईलवर लाईव्ह पाहू शकेल. 

Advertisement

नक्की वाचा >> Miss India Sayli Surve Case : पुण्याची मॉडेल सायली सुर्वेनं घेतला यू-टर्न, लव्ह जिहाद प्रकरणाला नवं वळण

पत्नीला पाहून पतीच्या पायाखालची जमिनच सरकली

शनिवारचा दिवस होता. पती कामावर निघाला पण त्याचं लक्ष मोबाईल स्क्रीनवर होतं. त्याला अचानक लोकेशनवर संशयास्पद गोष्टी दिसल्या. लोकेशन घरचंच होतं पण टायमिंग आणि तेथील घटनेनं धोक्याची घंटा वाजवली. त्यानंतर पती ऑफिसमधून थेट निघाला  आणि त्याच्या घरी पोहोचला. पतीने जसा दरवाजा उघडला,त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. कारण त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत होती.पत्नीला रंगेहाथ पकडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पतीचा पारा चढला आणि त्याने पत्नीच्या प्रियकराची पिस्तुल आणि चैनच खेचली, असा आरोप आहे.

नक्की वाचा >> Ashok Kharat: 'हा' चित्रपट पाहून अशोक खरात बनला 'मास्टरमाईंड', चीड आणणारं भोंदूबाबाचं आणखी एक प्रकरण समोर

वादविवाद वाढल्यानं कोणीतरी पोलिसांना फोन केला. त्यानंतर प्रकरण थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं. फुलवारी शरीफ मोहम्मद शहबाज आलम यांनी सांगितलं की,112 च्या टीमने सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पण कोणीही लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली नाही. शेवटी पती पत्नी आणि प्रियकरामध्ये तडजोड झाली. कोणीही लेखी तक्रार केली नाही.