Sayali Surve Case latest Update : बहुचर्चित असलेल्या सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी आतिफ तासे याला अखेर पालघर पोलिसांनी अटक केली आहे.जमीन बळकावणे आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा आरोपी आतिफ तासेवर मनोर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द केला होता,तेव्हापासून तो फरार होता. पालघर पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्यानंतर आता सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या आतिफ तासे याला मीरा भाईंदर पोलीस त्याचा ताबा घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी आतिफ तासेला मुंबईतील कांदिवली परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी आतिफ तासे त्याची आई गुलशन तासे -पटेल यांच्यासह 20 ते 25 गुंडांनी मिळून 19 ऑक्टोबर 2023 रोजी मनोर जवळील टेन गावातील जमिनीवर अनधिकृत पणे कब्जा करून स्थानिक शेतकऱ्यावर सशस्त्र हल्ला केला होता. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आतिफ तासे याचा जमीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 23 मे 2025 रोज जामीन रद्द केल्यापासून तो फरार झाला होता. पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करून त्याचा शोध सुरू केला होता.
नक्की वाचा >> Pune News: पुणेकरांना मोठी संधी! पुण्यात रंगणार 'ही' जागतिक स्पर्धा, सुरुवात अन् समारोप सुट्टीच्या दिवशी
पोटावर लाथा बुक्के मारून गर्भापात केलं?
आतिफ तासे हा काशीमीरा येथील गुलशन पटेल-तासेचा मुलगा असून पिंपरी-चिंचवड परिसरात लव्ह जिहाद आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्येही तो मुख्य आरोपी आहे.या अटकेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत,अशी माहिती पालघरचे पोलीस अधिक्षक यतिश देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर,दुसरीकडे सायली सुर्वेनं यु टर्न घेतल्याने प्रकरणाला नवीन वळण आले आहे.
सायलीने तिचा पती आरोपी आतीफ तासे आणि सासू गुलशन तासे -पटेल यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा स्वेच्छेने आणि माझ्या मुलांचे हीत लक्षात घेऊन माणुसकी म्हणून मागे घेतले असल्याची माहिती समाज माध्यमावर विडिओ पोस्टमधून स्पष्ट केले आहे.विशेष म्हणजे सायलीने पती आरोपी आतीफ तासेआणि सासू गुलशन पटेलवर धर्म परिवर्तन करण्यात दबाव टाकणं,मारहाण करणं,गरोदर असताना पोटावर लाथा बुक्के मारून गर्भापात करण्यासारखे अनेक आरोप सायली सुर्वे यांनी लावले होते. त्यानंतर पुन्हा घर वापसी करत आणि विधीवत पूजा अर्चा करून हिंदू धर्म स्वीकारला आहे.
नक्की वाचा >> Akola News : अकोल्यात लव्ह जिहाद? पत्नीचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, अन्नपूर्णा माता मंदिरासमोर..
प्रकरण मिटवण्याच्या उद्देशाने दबाव टाकण्यात आला
सायली सुर्वेच्या या बदललेल्या भूमिकेबद्दल हिंदुत्ववादी नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. हिंदुत्व वादी नेत्यांनी सायलीवर अनन्वित अत्याचार झाले असून तिचं आपहरण करून, ऍफिडेव्हिट वर तिची स्वाक्षरी घेऊन हे प्रकरण मिटवण्याच्या उद्देशाने तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे,अशी माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी दिली आहे.
एकंदरीत सायली सुर्वे लाव जिहाद प्रकरणातील आरोपी पती आतीफ तासे आणि सासू गुलशन तासे -पटेल यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे संपूर्ण राज्यभर लव जिहाद प्रकरण तापलं होतं.विविध संघटना किंवा राजकीय पक्षांनी या प्रकरणात आपापल्या भूमिका मांडल्या होत्या.शिवाय पोलीस प्रशासनावर देखील अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते.मात्र आता फिर्यादी आणि पीडित सायली सुर्वेनेच माघार घेतल्यामुळे या प्रकरणाचे पुढे काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world