मुस्लिमांना लग्न-घटस्फोटाची नोंदणी अनिवार्य, काझींची भूमिका संपणार; या राज्याचा मोठा निर्णय 

या निर्णयामुळे मुस्लीम समाजातील काझींची भूमिका संपणार असल्याचं चित्र आहे. 

Advertisement
Read Time: 1 min
दिसपूर:

आसाममध्ये (Assam News) आता मुस्लिमांना लग्न आणि घटस्फोटाची नोंदणी करावी लागणार आहे. आसाम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुस्लीम समाजातील काझींची भूमिका संपणार असल्याचं चित्र आहे. 

याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी सांगितलं की, राज्यात मुस्लिमांची लग्न आणि घटस्फोटासाठी सरकारी नोंदणी अनिवार्य असेल. यासाठी विधानसभेच्या आगामी सत्रात एक विधेयक आणलं जाईल. गुरुवारपासून सत्र सुरू होणार आहे. त्यांनी सांगितलं की, यापूर्वी मुस्लीम मुस्लीम लग्न काझींच्या माध्यमातून नोंद केले जात होते. मात्र या नव्या विधेयकामुळे मुस्लीम समाजातील सर्व विवाहांची नोंदणी  सरकारअंतर्गत होईल. 

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पुढे सांगितलं की, यापूर्वी काझी अल्पवयीन मुलींच्या लग्नाची नोंदणी करीत होते. मात्र आगामी विधेयकात यावर निर्बंध आणले जातील. त्यांनी कॅबिनेटच्या निर्णयाचा हवाला देत सांगितलं की, यापुढे कोणत्याही अल्पवयीनच्या लग्नाची नोंद केली जाणार नाही. 

नक्की वाचा - महंत रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यात गुन्हे दाखल; जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य भोवली!

कॅबिनेटमध्ये मंजुरी...
सरमा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितलं की, सरकार आगामी सत्रात आसाम मुस्लीम निकाह अनिवार्य नोंदणी आणि घटस्फोट विधेयक, 2024 सादर करणार आहे. आसाम मंत्रिमंडळाने बुधवारी एका प्रस्तावित कायद्याला मंजुरी दिली. 

Advertisement