- दावा किया गया है कि JBL के ईयरफोन्स इस्तेमाल के समय अजीब सी आवाज करने लगे
- इस घटना के बाद उसके कान का पर्दा खराब हो गया।
- । ऐसी ही शिकायतें अन्य यूजर्स की तरफ से भी देखने को मिल रही हैं।
MBBS च्या एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर मोठा दावा केला आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, JBL च्या इयरफोनमुळे त्याच्या कानांचं नुकसान झालं आहे. कथितपणे विद्यार्थ्याने दावा केला आहे की, ब्लूटूथ इयरफोन वापरत असताना त्याच्या कानात ब्लास्ट झाला. ज्यामुळे त्याच्या कानाचा पडदा खराब झाला आणि आत सूज आली आहे.
जाणून घ्या काय आहे प्रकरण?
JBL इयरफोन कानाच्या आत फुटला, असा दावा MBBS विद्यार्थ्याने केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही पोस्ट व्हायरल होत आहे. विद्यार्थ्याने दावा केला आहे की, JBL च्या इयरफोनचा वापर करीत असताना विचित्र आवाज येत होता. विद्यार्थ्याला झालेल्या त्रासासाठी इयरबर्ड्स कारण असल्याचं सांगितलं आहे. पोस्टमध्ये लिहिलंय, असं वाटलं जणू काही कानाच्या आत ड्रिल मशीन चालू आहे. विद्यार्थ्याने दावा केला की, या घटनेनंतर त्याच्या कामाचा पडदा खराब झाला आणि कानाच्या आत सूज आली आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अशाच तक्रारी अनेक वापरकर्त्यांकडून केली जात आहे. अनेकांनी या प्रकरच्या समस्या उद्भवत असल्याचं सांगितलं आहे. एका वापरकर्त्याने लिहिलंय, इयरफोन्समुळे त्याच्या कानाच्या आत फंगल इन्फेक्शन झालं. तर अनेकांनी म्हटलंय, या इयरफोन कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई व्हायला हवी. तर अनेकांनी वायरचा इयरफोन वापरण्याचा सल्ला दिला आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, इयरबर्ड्सचा जास्त वापर करणं किंवा मोठ्या आवाजात गाणं ऐकल्याने कानांला इजा होऊ शकते. रिपोर्टनुसार, कानात वारंवार कोणतीही वस्तू टाकणं, इयरबर्ड्सचा वारंवार वापर केल्याने किंवा मोठ्या आवाजात ऐकल्याने ऐकण्यास अडचणी येऊ शकतात. अशामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.