6 hours ago

आज पश्चिम रेल्वेवर आज वाणगाव ते डहाणू रेल्वे स्थनकादरम्यान ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर अंबरनाथ ते वांगणी दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भारत आणि पाकिस्तानचा दुबईत सामना होत आहे. रोहित-विराटवर चाहत्यांचं लक्ष असणार आहे. 

Feb 23, 2025 16:27 (IST)

निलम गोऱ्हेंच्या पुण्यातील घराबाहेर ठाकरे सेनेचे आंदोलन, महिलांचा हल्लाबोल

निलम गोऱ्हेंच्या पुण्यातील घराबाहेर ठाकरे सेनेच्या महिलांनी जोरदार आंदोलन केले. निलम गोऱ्हे यांनी मर्सिडीजबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे. शिवाय उद्धव ठाकरे यांची माफी मागावी अशी मागणी यावेळी आंदोलन करत असलेल्या महिलांनी केली. गोऱ्हे यांच्या घरा बाहेर यावेळी एक मर्सिडीज गाडी ही आणण्यात आली होती. गोऱ्हें विरोधात ठाकरे गट हा आता भलताच आक्रमक झाला आहे. 

Feb 23, 2025 15:26 (IST)

Live Update : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

नागपूरकडून समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे जात असताना झाला अपघात

अपघात वाहनांचा चेंदामेंदा

मृतक व अपघातग्रस्त यांना वर्धा येथील दवाखान्यात हलविण्यात आलं आहे

Feb 23, 2025 15:05 (IST)

Live Update : पती देवदर्शनाला अन पत्नी रात्री ड्युटीवर असताना चोरट्यांचा घरावर डल्ला

साईसंस्थानच्या कर्मचारी हौसिंग सोसायटीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारलाय. पती देवदर्शनाला अन पत्नी रात्री ड्युटीवर असताना चोरट्यांनी घराच कुलूप तोडून सोनेचांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेली आहे. राहुल ओहळ हे गेल्या पाच वर्षापासून सोसायटीत वास्तव्यास आहेत. पत्नी पत्नी दोघे ही साई संस्थानचे कर्मचारी असून त्यांच्या अडीच तोळे सोने आणि पंचवीस हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय.. 

Feb 23, 2025 12:07 (IST)

Live Update : पाकिस्तानसाठी आज करो या मरोचा सामना, भारताविरुद्ध सामन्यात विजय मिळाला तरच...

न्यूझीलंडविरुद्ध सलामीचा सामना गमावल्यामुळे पाकिस्तानी संघ अडचणीत सापडला आहे.

रविवारी दुबईत होणाऱ्या भारताविरुद्ध सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवणं आवश्यक

भारताविरुद्ध सामन्यात विजय मिळाला तरच पाकिस्तानचा संघ शर्यतीत कायम राहू शकतो.

साखळी फेरीतला पाकिस्तानचा अखेरचा सामना 27 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध रावळपिंडीत आहे

स्थानिक हवामान संस्थेच्या अंदाजानुसार 25 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत रावळपिंडीचं वातावरण ढगाळ असेल

यादरम्यान रावळपिंडीत पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळे पाकिस्तानचं स्थान डळमळीत होऊ शकतं

Advertisement
Feb 23, 2025 11:51 (IST)

Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या प्रयागराज येथे शाहीस्नान करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या प्रयागराज येथे शाहीस्नान करणार 

आज रात्री दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनानंतर एकनाथ शिंदे प्रयागराजला जाणार

Feb 23, 2025 09:23 (IST)

Live Update : महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर मंदिर सलग 2 दिवस खुलं राहणार

महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर मंदिर सलग दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार

- महाशिवरात्रीला पहाटे चार वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत घेता येणार दर्शन 

- भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता VIP दर्शन राहणार बंद

- महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे संस्थानकडून आयोजन

Advertisement
Feb 23, 2025 08:04 (IST)

Live Update : पुण्यात गावगुंडांचा धुडगूस सुरूच, वडगाव शेरीत पुन्हा वाहनांची तोडफोड

पुण्यात गावगुंडांचा धुडगूस सुरूच

वडगाव शेरीत पुन्हा वाहनांची तोडफोड

वडगाव शेरीत मध्यरात्री अनेक वाहनांची तोडफोड अन् नासधूस..

शुक्रवारी मध्यरात्री वडगाव शेरी परिसरात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने पुन्हा वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला 

घटनेत पाच चारचाकी, पाच दुचाकी, दोन ऑटो रिक्षांची तोडफोड 

या प्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Feb 23, 2025 08:00 (IST)

Live Update : बिबट्याचा वासरावर हल्ला, घटनेचा थरार मोबाइलच्या कॅमेरात कैद

निफाड तालुक्यातील विंचूरच्या हनुमान नगर बिबट्या वासरावर हल्ला करून  फडशा पाडीत  असल्याची घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये  कैद झाली आहे. हनुमान नगर येथील शेतकरी दीपक साहेबराव गुंड मध्यरात्रीच्या सुमारास वासराच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता बिबट्या वासरावर हल्ला करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली मात्र हतबल असलेल्या दीपक गुंड यांनी बिबट्याच्या तावडीतून वासराला वाचवता  आले नाही.महिना भरापासून बिबट्या धुमाकूळ घालीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Advertisement
Feb 23, 2025 07:59 (IST)

Live Update : मातीचे माठ आणि रांजणमध्ये 25 टक्क्यांनी भाव वाढ

गरीबाचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या मातीचे माठ आणि रांजण यांची किमत यावर्षी जवळपास 25 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतोय. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीची भांडी बाजारात दाखल झाली आहेत..दरवर्षीच बुलढाण्यात मातीच्या रांजण, माठ, घागरी याची मोठी मागणी पाहायला मिळत असते.. मात्र यावर्षी कच्च्याम मालाच्या किमती वाढल्याने या भांड्यांमध्ये देखील 25 टक्क्याने भाव वाढ झाली आहे..यामुळे मातीच्या भांड्यांची मागणी थोडी कमी झाल्याच चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.