Indore News: कोट्यधीश भिकारी! 3 घरे, 3 रिक्षा, कार अन् बरंच काही... भीक मागण्याची पद्धतही युनिक

मंगीलालकडे 3 ऑटो रिक्षा आहेत, ज्या त्याने भाड्याने दिल्या आहेत. तसेच एक स्विफ्ट डिझायर (Swift Dzire) कार असून ती चालवण्यासाठी त्याने पगारावर ड्रायव्हर ठेवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Indore Begger (Google Gemini AI Image)

मध्य प्रदेशातील इंदूर शहराला भिकारीमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत महिला व बाल विकास विभागाच्या पथकाला एक धक्कादायक सत्य कळले. सराफा बाजार परिसरात लोखंडी सरकत्या गाडीवर बसून, हातात जुने बूट घालून स्वतःला पुढे ढकलणारा दिव्यांग मंगीलाल प्रत्यक्षात अफाट संपत्तीचा मालक निघाला. अनेक वर्षांपासून दिव्यांग म्हणून वावरणारा मंगीलाल नावाचा व्यक्ती प्रत्यक्षात करोडपती असल्याचे तपासात समोर आले आहे.

भीक मागण्याची अनोखी पद्धत

मंगीलाल कधीही कोणाकडे उघडपणे भीक मागत नसे. तो फक्त एका कोपऱ्यात बसून राहायचा किंवा पाठीवर बॅग लटकवून इकडून तिकडे फिरायचा. त्याची असहाय अवस्था पाहून येणारे-जाणारे लोक स्वतःहून त्याच्या हातात पैसे द्यायचे. यातून त्याला दिवसाला 500 ते 1000 रुपयांची कमाई होत असे.

मंगीलालची संपत्तीचा आकडा 

जेव्हा बचाव पथकाने मंगीलालला ताब्यात घेऊन त्याचे पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली, तेव्हा त्याने स्वतःच्या संपत्तीचा पाढा वाचला.मंगीलालचे भगतसिंग नगरमध्ये 3 मजली घर, शिव नगरमध्ये 600 स्क्वेअर फूटचे घर आणि अलवासामध्ये एक 1-BHK फ्लॅट आहे. हा फ्लॅट त्याने दिव्यांग कोट्यातून PMAY अंतर्गत मिळवला होता.

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)

मंगीलालकडे 3 ऑटो रिक्षा आहेत, ज्या त्याने भाड्याने दिल्या आहेत. तसेच एक स्विफ्ट डिझायर (Swift Dzire) कार असून ती चालवण्यासाठी त्याने पगारावर ड्रायव्हर ठेवला आहे.

Advertisement

सावकारीचा व्यवसाय 

मंगीलाल केवळ भीक मागत नव्हता, तर मिळालेल्या पैशातून सराफा बाजारातील लहान ज्वेलरी व्यावसायिकांना मोठ्या व्याजाने कर्जही देत असे. तो रोज किंवा आठवड्याला व्याजाची वसुली करायचा.

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईकरांनो काही दिवस पाणी उकळून प्या आणि जपून वापरा! BMC चं नागरिकांना आवाहन)

प्रशासनाची कारवाई

नोडल अधिकारी दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मंगीलालच्या बँक खात्यांची आणि इतर मालमत्तेची चौकशी सुरू आहे. स्वतःची मालकीची घरे असतानाही त्याने प्रधानमंत्री आवास योजनेचा (PMAY) लाभ कसा घेतला, याबाबत त्याला जिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाईल. तसेच विनापरवाना सावकारी करणे हा गुन्हा असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Advertisement
Topics mentioned in this article