West Bengal : PM मोदींशी मैत्री, तरीही सत्तेच्या खुर्चीला लाथ; मिथुन चक्रवर्तींनी पद नाकारण्याचं कारण उघड

Mithun Chakraborty: पंतप्रधान मोदींशी त्यांची जवळीक अनेकदा जाहीर सभांमध्ये दिसून आली. मात्र, इतकी मेहनत घेऊनही त्यांनी मंत्रिमंडळात कोणतेही पद स्वीकारले नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींनी कोणते पद का घेतले नाही?
मुंबई:

Mithun Chakraborty: भारतीय चित्रपटसृष्टीतील डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रचंड सक्रिय आहेत. 2021 आणि आता 2026 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपासाठी रक्ताचे पाणी केले. गल्लीगल्लीत फिरून प्रचार केला आणि तृणमूल काँग्रेसच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. 

पंतप्रधान मोदींशी त्यांची जवळीक अनेकदा जाहीर सभांमध्ये दिसून आली. मात्र, इतकी मेहनत घेऊनही त्यांनी मंत्रिमंडळात कोणतेही पद स्वीकारले नाही, ना ते राज्यसभेवर गेले. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, यामागील त्यांची भूमिका आता स्पष्ट होत आहे.

Advertisement

नक्षलवादी चळवळीतून सुरू झाला राजकीय प्रवास

मिथुन चक्रवर्ती यांचा राजकारणाशी संबंध चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीपासूनच होता. 1960 च्या दशकात जेव्हा ते कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हा बंगालमध्ये नक्षलवादी चळवळीचा मोठा प्रभाव होता. मिथुन चक्रवर्ती देखील या चळवळीत सामील झाले होते. नक्षलवादी नेते चारू मजूमदार आणि रवी रंजन यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते.

 मात्र, एका नक्षलवादी मोहिमेदरम्यान त्यांच्या मोठ्या भावाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेने मिथुन हादरले आणि वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी कोलकाता सोडले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील FTII मध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.

( नक्की वाचा : कोर्टात गायलं गाणं अन् न्यायाधीशांनीच काढलं तिकीट!PM मोदी ज्यांच्या पाया पडले ते 97 वर्षांचे माखनलाल सरकार कोण? )

डाव्या विचार ते तृणमूल काँग्रेस

बॉलिवूडमध्ये सुपरस्टार झाल्यानंतरही मिथुन चक्रवर्ती यांचे राजकीय संबंध कायम होते. ते पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या खूप जवळचे होते. जेव्हा जेव्हा सीपीएम सरकारला निधीची गरज पडत असे, तेव्हा मिथुन विनामूल्य कार्यक्रम करून निधी गोळा करून देत असत. 

ज्योती बसू यांच्या निधनानंतर त्यांनी डाव्या पक्षांपासून अंतर राखले आणि 2014 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना राज्यसभेवर देखील पाठवले, मात्र 2016 मध्ये शारदा घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली.

( नक्की वाचा : Bengal Election 2026: बंगालमध्ये कमळ फुलताच मोदींना झाली 'त्यांची' आठवण; कोण होते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी? )

भाजपमध्ये प्रवेश आणि पदापेक्षा सेवेला प्राधान्य

राजकारणापासून लांब राहिल्यानंतर 5 वर्षांनी म्हणजेच 7 मार्च 2021 रोजी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी त्यांनी स्पष्ट केले होते की, त्यांना कोणताही स्वार्थ नाही तर केवळ गरिबांसाठी काम करायचे आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभा सदस्य होण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मान्य केले होते. 

Advertisement

तेव्हापासून आजपर्यंत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपसाठी बंगालमध्ये अहोरात्र मेहनत घेतली आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा बंगालमध्ये येतात, तेव्हा मिथुन दा त्यांच्यासोबत व्यासपीठावर अत्यंत आत्मीयतेने चर्चा करताना दिसतात.

मंत्रीपद किंवा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर

नुकत्याच पार पडलेल्या राजकीय घडामोडींनंतर अनेकांना वाटले होते की मिथुन चक्रवर्ती बंगालचे मुख्यमंत्री किंवा किमान केंद्रात मोठे मंत्री होतील. मात्र, जेव्हा शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा झाली आणि मंत्रिमंडळाची शपथ पार पडली, तेव्हा त्यात मिथुन दा यांचे नाव नव्हते. 

Advertisement

विशेष म्हणजे ते स्वतः या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही नाराजी नव्हती. भाजपमध्ये येऊन 5 वर्षे उलटली तरी त्यांनी राज्यसभेची जागा मागितली नाही की मंत्रिपदासाठी प्रयत्न केले नाहीत.

काय आहे कारण?

मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश करतानाच सांगितले होते की, वयाच्या 18 व्या वर्षापासून त्यांचे एक स्वप्न होते की त्यांनी गरिबांसाठी लढावे आणि त्यांना सन्मान मिळवून द्यावा. आज त्यांची तीच भूमिका पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. त्यांनी केवळ प्रचाराची जबाबदारी सांभाळली आणि कोणत्याही अधिकाराच्या पदावर न बसता पक्षाचे काम करणे पसंत केले. राजकारणात सत्तेसाठी सर्वकाही पणाला लावणाऱ्या काळात मिथुन चक्रवर्ती यांनी पदापेक्षा सेवेला महत्त्व देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.