केंद्र सरकारनं बुधवारी 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारनं आयुष्यमान भारत आरोग्य योजना आता 70 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी कॅबिनेटनं बुधवारी (11 सप्टेंबर) या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांवर मोफत उपचार केले जातील. या योजनेनुसार 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा मोफत इन्शूरन्स कव्हर मिळणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी मोदी कॅबिनेटच्या या निर्णयाचा माहिती दिली. 'या योजनेच्या मंजुरीनंतर 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी त्यासाठी पात्र होतील. पात्र वरिष्ठ नागरिकांना AB PM-JAY नुसार वेगळे कार्ड दिले जाईल,' असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
सरकारनं सांगितलं की, 'योजनेनुसार पहिल्यांदा कव्हर करण्यात आलेल्या परिवारांशी संबंधित 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना प्रत्येक वर्षासाठी 5 लाखांचे अतिरिक्त टॉप अप कव्हर ( जे त्यांना 70 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना देता येणार नाही) मिळेल.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )
लोकांना मिळेल योजना निवडण्याचा पर्याय
ज्येष्ठ नागरिक ( 70 वर्षांपेक्षा ज्येष्ठ) जे पहिल्यापासून केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS), माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) आणि आयुष्यमान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सारख्या अन्य सार्वजनिक विमा योजनांचा फायदा घेत आहेत, ते त्यांची विद्यमान योजना निवडू शकतात. अथवा AB PM-JAY पर्याय निवडू शकतात.
सरकारनं स्पष्ट केलंय की 70 वर्षांपेक्षा जास्त वयांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक जे खासगी विमा पॉलिसी तसंच कर्मचारी राज्य विमा योजनेच्या अंतर्गत आहे ते देखील AB PM-JAY योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
( नक्की वाचा : Lek Ladki Yojana : राज्य सरकार मुलींना करणार 1 लाख 1 हजारांची मदत, कसा मिळणार फायदा? वाचा संपूर्ण प्रोसेस )
2017 मध्ये सुरु झाली योजना
राष्ट्रीय आरोग्य योजनेनुसार केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत योजना 2017 साली सुरु केली. आयुष्यमान भारत योजनेनुसार देशभरातील निवडक सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीचे 10 दिवस आणि नंतरच्या खर्चासाठी या योजनेमध्ये रिफंडचा नियम आहे. मात्र पश्चिम बंगालसह अनेक राज्यांनी ही योजना राबवण्यास नकार दिला आहे. ही राज्य स्वत:ची योजना चालवत आहेत.
सर्व आजारांवर उपचार
आयुष्यमान भारत योजनेमध्ये सर्व जुने आजारही कव्हर होतात. कोणत्याही आजारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च यामध्ये कव्हर होतो. त्याचबरोबर मेडिकल टेस्ट, ऑपरेशन, औषधं इतकंच नाही तर प्रवासासाठी होणाऱ्या खर्चाचाही यामध्ये समावेश आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी उपचार केले आहेत.
( नक्की वाचा : Lakhpati Didi Scheme : महिलांचं भाग्य बदलणारी 'लखपती दीदी' योजना काय आहे? कसा करणार अर्ज? )
आयुष्यमान कार्ड कोण बनवू शकतं?
- ग्रामीण भागात राहणारे लोक
- असंगठित क्षेत्रातील काम करणारे मजूर
- अनुसूचित जाती/जनजाती किंवा आदिवासी समाजाचे लोक
- दारिद्र्यरेषेखालील लोक
- रोजंदारीवर काम करणारे मजूर
कुणाला मिळणार नाही एन्ट्री?
- संघटित क्षेत्रात काम करणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
-ज्या लोकांकडे कायमस्वरूपी घरं आणि वाहनं आहेत ते या योजनेच्या बाहेर आहेत.
- ज्या लोकांचा भविष्य निर्वाह निधी कापला जातो त्यांनाही या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे.
- ESIC सदस्य देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- सरकारी कर्मचारी आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत येत नाहीत.
- आयकर भरणारे नागरिकही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.