PM Internship Scheme : बेरोजगार तरुणांना मिळणार महिना 5 हजार रुपये, कसा आणि कुठं करणार अर्ज?

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

मोदी सरकारनं (Modi Government)  बेरोजगार तरुणांना नोकरी देण्यासाठी इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme) सुरु केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात  (Union Budget) या योजनेची घोषणा केली होती. पुढील 5 वर्षात तब्बल 1 कोटी तरुणांना या योजनेचा फायदा होईल. या योजनेत इंटर्ननं महिला 5000 रुपये मासिक भत्ता दिला जाईल. त्याचबरोबर एक वर्ष पूर्ण केल्यानंतर सरकारकडून वेगळे 6 हजार रुपये देण्यात येतील.  

पीएम इंटर्नशिप योजना मोदी सरकारकडून अधिकृत वेबसाईटवर लाईव्ह करण्यात आली आहे. ही योजना काय आहे? त्यासाठी कसा अर्ज करायचा? कोणती योग्यता आवश्यक आहे ? तसंच यामध्ये काय सूविधा मिळणार आहेत ते पाहूया...

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कधी सुरु होणार रजिस्ट्रेशन?

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी 12 ऑक्टोबरपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होईल. या पायलट प्रोजेक्टमध्ये नोंदणी करण्यासाठी इच्छूक उमेदवारांना 25 ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन करावं लागेल. 

उमेदवार शॉर्टलिस्ट कधी होणार

या इंटर्नशिप योजनेचे टेक्नॉलजी पार्टनर BISAG आहे. कंपनी 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार शॉर्टलिस्ट करेल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत इंटर्नशिप करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेता येईल. 2 डिसेंबरपासून सुरु होईल. ती 13 महिने असेल. 

( नक्की वाचा  : Lakhpati Didi Scheme : महिलांचं भाग्य बदलणारी 'लखपती दीदी' योजना काय आहे? कसा करणार अर्ज? )

किती मिळेल इंटर्नशिप?

पीएम इंटर्नशिपसाठी निवडण्यात आलेल्या प्रत्येक इंटर्नला 5000 रुपये मासिक भत्ता दिला जाईल. त्याचबरोबर 1 वर्ष पूर्ण झाल्यीानंतर 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाईल. 5000 रुपयांच्या मासिक भत्त्यामधील 10 टक्के म्हणजे 500 रुपये कंपनी त्यांच्या CSR फंडातून देईल. 4500 रुपये सरकारकडून दिले जातील. 

कुठे मिळेल इंटर्नशिप?

या पाललट प्रोजेक्टसाठी 800 कोटी बजेट असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक प्रादेशिक भाषांमध्ये इंटर्नशिप योजनेच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना शक्यतो त्यांच्या जिल्ह्यातच इंटर्नशिप दिली जाईल. 

कुणाला करता येईल अर्ज?

दहावीची परीक्षा उत्तीर्ण असलेला 21 ते 24 वयोगटातील कोणत्याही तरुणाला या योजनेसाठी अर्ज करता येईल. 

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )

कुणासाठी योजना नाही?

ज्या तरुणाच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकर असेल, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. जे उमेदवार स्वत: पूर्णवेळ नोकरदार असतील ते या योजनेसाठी अर्ज करु शकणार नाहीत. 

कसा करणार अर्ज?

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये तुम्ही तुमचे कौशल्य आणि आवड याबाबत माहिती देऊ शकता. त्याच्या आधारावर तुम्हाला इंटर्नशिप देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. 

आत्तापर्यंत किती कंपन्यांनी केलीय नोंदणी?

याबाबतच्या रिपोर्टनुसार आत्तापर्यंत टॉप 500 कंपन्यांमधील 111 कंपन्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार इंटर्नशिप प्रोग्राममध्ये SC/ST आणि OBC उमेदवारांसाठी असलेल्या आरक्षण धोरणांची अंमलबजावणी केली जाईल.