एस जयशंकर Exclusive : "जगभरात स्थिरता आणि शांती कायम राहील ही आपली देखील जबाबदारी"

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये युक्रेनमध्ये गेले होते. याबाबत जी-7 देश आणि इतर देशांसोबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा पुढे कशी घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे. मोदी सरकारच्या पहिल्या 100 दिवसातील हे मोठे विषय आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

मोदी सरकारच्य तिसऱ्या कार्यकाळाचे आज 100 दिवस पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमी NDTV चे एडिटर इन चीफ संजय पुगलिया यांना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या 100 दिवसांमधील परराष्ट्र धोरणांची माहिती जयशंकर यांनी दिली. 

एस जयशंकर यांनी म्हटलं की, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. यासाठी आम्ही आधीच तयारी केली होती. तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात आम्ही खूप वेगाने सुरुवात केली आहे. परराष्ट्र धोरणाबद्दल बोलताना जयशंकर यांनी म्हटलं की, रशिया-युक्रेन युद्ध लवकर संपावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू. शांती प्रस्तापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जगभरात स्थिरता आणि शांती कायम राहील ही आपली देखील जबाबदारी. यासाठी जगभरातील देशांशी चर्चा सुरू.

जगभरातील तणावाच्या स्थितीवर बोलताना जयशंकर यांनी म्हटलं की, युक्रेन-रशिया युद्धाचं हे तिसरं वर्ष आहे. मिडल ईस्ट आणि गाझामध्ये देखील युद्ध सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये युक्रेनमध्ये गेले होते. याबाबत जी-7 देश आणि इतर देशांसोबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा पुढे कशी घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे. मोदी सरकारच्या पहिल्या 100 दिवसातील हे मोठे विषय आहेत.

भारत आणि चीन संबंधांवर बोलताना एस जयशंकर यांनी म्हटलं की, भारताच्या क्षमतेबद्दल बोलायचं तर जोपर्यंत टेक्नोलॉजी आपल्याकडे नाहीत तोपर्यंत आपण विकसित बनू शकत नाही. आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग येत नाही तोपर्यंत टेक्नोलॉजी येणार नाही. आपलं दुर्दैव आहे की आपण टेक्नोलॉजीमध्ये मागे राहिलो. मॅन्युफॅक्चरिंग वाढली की रोजगार वाढेल. यासाठी जी स्कील हवी आहे त्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. 

Topics mentioned in this article