3 months ago

(Monsoon session of the state legislature) उद्यापासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. 30 जून ते 18 जुलै या कालावधीत हे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात हिंदी भाषेचा मुद्दा गाजणार असल्याची शक्यता आहे. सध्याचं वातावरण पाहता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. 

Jun 29, 2025 22:30 (IST)

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असून एकूण 18 जागांपैकी 15 जागा महायुतीच्या कोट्यात पडल्या असून 2 जागांवर विकास आघाडी तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली. असल्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर मतदात्यांनी महा युतीला एक हाती सत्ता देऊन आपला विश्वास दाखविला.

Jun 29, 2025 20:58 (IST)

Live Update : हिंदी सक्ती विरोधातील GR रद्द झाल्यानंतर मनसेचा जल्लोष

 हिंदी सक्ती विरोधातील GR रद्द झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थाना बाहेर मनसैनिक जमा झाले  होते. त्यांनी फटाके फोडून आणि ढोल ताशा वाजत आनंद व्यक्त केला. मुंबई प्रमाणे पुण्यात ही मनसैनिकांनी जल्लोष केला आहे.  

Jun 29, 2025 19:47 (IST)

हिंदी सक्ती विरोधातील 5 जुलैचा मोर्चा रद्द, संजय राऊत यांची माहिती

हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी आयोजित केलेला मोर्चाही रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे.  हा मराठी एकजुटीचा विजय,

ठाकरे एकत्र येणार याचा धसका, ५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही;पण.. ठाकरे हाच ब्रँड!

(फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान) असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. 

Jun 29, 2025 18:56 (IST)

Live Update : हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर महायुती सरकारने केला रद्द

हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयला अखेर महायुती सरकारने स्थगिती दिली आहे. एक समिती नेमली जाईल. त्याच्या अहवालानुसार त्रिभाषा सुत्र ठरवलं जाईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. हिंदी सक्ती विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाला होता. त्याच्या पुढे सरकारला झुकावं लागल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळालं आहे.  

Advertisement
Jun 29, 2025 18:47 (IST)

Live Update : हिंदी भाषेवरून फडणवीसांचे ठाकरेंना फटकारे

हिंदी भाषेवरून मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फटकारे लगावले आहेत. ते मुख्यमंत्री असतानाच तिसरी भाषा म्हणून हिंदी स्विकारली गेली होती. कॅबिनेट मिनिट्सवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची सही आहे.  २०२१ साली अहवाल ठाकरे सरकार पुढे सादर करण्यात आला होता. तो ठाकरे सरकारने स्विकारला होता असा दावा फडणवीसांनी केला आहे. विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर सरकार तर्फे पत्रकार परिषद घेवून विरोधकांच्या आरोपांचा खुलासा केला.  

Jun 29, 2025 17:47 (IST)

Live Update : चिपळूणमध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना

चिपळूण मध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना

चिपळूणमधल्या गोवळकोटमधील घटना

शिकारीसाठी बंदुकीतून केलेल्या गोळीबाराचा  नेम चुकल्याने गोळी थेट घुसली बिल्डिंग मधल्या खिडकीवर

सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही...मात्र नागरिकांमध्ये भीती.

रान डुकराच्या शिकारीसाठी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती

शेतीच्या पलीकडून बंदुकीतून झालेला गोळीबार थेट काचेवर

चिपळूण पोलिसांकडून शोध सुरू....चिपळूण मधील गोवळकोट मधला धक्कादायक प्रकार

Advertisement
Jun 29, 2025 16:46 (IST)

मुंबई-नाशिक महामार्ग वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी जवळील वडपे ते येवई या परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गीकेवर  मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. जवळ जवळ दोन तासांपासून जास्त काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याचे वाहन चालकांतून बोलले जाते. यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे सर्वच प्रवासी या वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. गेल्या दोन तासापासून वाहतुक कोंडीत अडकलेले लोक रविवार सुट्टीच्या दिवस असल्याने काही कामा निमित्ताने बाहेर निघालेले परत मुंबईच्या दिशेने जाताना ही वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय. 

Jun 29, 2025 16:32 (IST)

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे नेते विलास शिंदे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे नेते  विलास शिंदे यांनी अखेर ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.  मी पहिल्यापासूनच शिवसेनेमध्ये होतो. शिवसेनेमध्येच पुन्हा एकदा मिनी पक्षप्रवेश केलेला आहे असं त्यांनी प्रवेश करताना सांगितलं. शिंदे यांचा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Advertisement
Jun 29, 2025 15:08 (IST)

LIVE Updates: हिंदीच्या मुद्द्यावरुन जीआरची होळी, उद्धव ठाकरे आझाद मैदानात दाखल

राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज २९ जुलै रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघात दुपारी तीन वाजता, अन्याय्य शासननिर्णयांची प्रतीकात्मक होळी आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. 

Jun 29, 2025 14:50 (IST)

मराठा आरक्षणासाठी मुंबईत मराठा समाज धडकणार, जरांगेंनी केली घोषणा

जरांगे म्हणाले आम्ही 27 ऑगस्टला अंतरवालीतून निघणार. 27 ला सकाळी 10 वाजता निघणार. 28 ला मुंबईत पोहचणार. 29 ला आंदोलन सुरू करणार. इथून शहागड,आळाफाटा,शिवनेरी,वाशी,चेंबूर,मंत्रालय आझाद मैदान येथे पोहचणार आणि आंदोलन सुरू करणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

Jun 29, 2025 14:47 (IST)

हिंदी भाषा सक्तीची नाही- उदय सामंत

हिंदी भाषा सक्तीची नाही. सक्तीची आहे असं सांगून काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोप उदय सामंत यांनी केला आहे. हा  उबाठाचा दुटप्पीपणा आहे असं ही ते म्हणाले.  2020 मध्ये केंद्र शासनाच्या शिक्षण धोरणाच्या बाबतीत अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने समिती नेमण्यात आली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 98 व्या कॅबिनेटमध्ये अहवाल स्वीकारला गेला, त्यानंतर हिंदी सक्तीची असावा हा निर्णय घेण्यात आला. आणि आता ते दुटप्पीपणा करत आहेत.  मराठी बाजूला करून हिंदीची सक्ती केली जात आहे. हे फेक नरेटिव्ह काही लोकं सेट करत आहेत असं ही सामंत म्हणाले. 

Jun 29, 2025 14:27 (IST)

खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे नेते आक्रमक

मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे नेते आक्रमक

दिल्लीत जाऊन वरिष्ठांशी भेट घेऊन करणार तक्रार

नसीम खान, भाई जगताप थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार

वर्षा गायकवाड यांनी स्थापन केलेल्या समितीत नाव नसल्याने नेते नाराज 

काँग्रेस हाय कमांड कडे याआधी ही वर्षा गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केली होती

आज पुन्हा दोघे हाय कमांड कडे तक्रार करणार आहेत

Jun 29, 2025 14:17 (IST)

Live Update : मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे नेते आक्रमक

मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे नेते आक्रमक

दिल्लीत जाऊन वरिष्ठानशी भेट घेऊन करणार तक्रार

नसीम खान, भाई जगताप थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार

काँग्रेस वरिष्ठानशी भेट घेऊन वर्षा गायकवाड यांच्या या समिती नाव नसल्याने हे नेते नाराज असल्याची माहिती आहे

काँग्रेस हाय कमांड कडे याआधी ही वर्षा गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केली होती

आज पुन्हा दोघे हाय कमांड कडे तक्रार करणार आहेत

Jun 29, 2025 13:03 (IST)

Live Update : पुण्याच्या इंदापुरात पार पडलं तुकोबांच्या सोहळ्यातील दुसरा गोल रिंगण, तुकाराम तुकारामच्या जय जयघोषाने इंदापूर नगरी दुमदुमली

जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाच दुसरं गोल रिंगण आज इंदापूर मध्ये पार पडलाय लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलाय....

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या मैदानामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर तुकाराम तुकारामाच्या जयघोषात या मैदानामध्ये झेंडेकरी,तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला,विणेकरी   आणि त्यानंतर पोलिस धावले.

रिंगणात मानाचे दोन अश्व धावले यातील एका आश्वावरती जगद्गुरु श्री संत तुकोबाराय रूढ झालेले असतात तर दुसऱ्या आश्वावरती चोपदार बसलेला असतो तीन फेऱ्या मारल्यानंतर हे रिंगण पूर्ण झालं.

तुकोबारायांच्या पालखीने देहूतून प्रस्थान ठेवल्यापासून पंढरीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या वारकऱ्यांना या रिंगण सोहळ्याचे वेध लागलेले असतात,अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या नेत्रदीपक अशा सोहळ्याकडे असते आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा इंदापूर मध्ये पार पडलाय.

Jun 29, 2025 13:02 (IST)

Live Update : भाजपकडून प्रदेशअध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

भाजपकडून प्रदेशअध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर 

उद्या दुपारी १ ते ४ वेळेत अध्यक्षपदासाठी अर्ज भरला जाणार 

उद्याच संध्याकाळी ७ पर्यंत अर्ज मागे घेता येणार 

एकाहून अधिक अर्ज आल्यास घेतले जाणार मतदान 

उद्या संध्याकाळी ७ ते रात्री १० दरम्यान मतदान 

मंगळवारी १ जुलै रोजी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार

तुर्तास रवींद्र चव्हाण यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता

Jun 29, 2025 11:30 (IST)

Live Update : चिखलदरा मार्गावर वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा....

चिखलदरा मार्गावर वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब रांगा....

वनविभागाच्या एन्ट्री पॉईंटवर पैसे देण्यासंदर्भात काही पर्यटकांनी हुज्जत घातल्याने वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा...

रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची चिखलदरा जाण्यासाठी मोठी गर्दी..

सध्या पावसामुळे चिखलदऱ्याच सौंदर्य फुलल आहे त्यामुळे पर्यटक चिखलदाराला जात आहे..

Jun 29, 2025 11:08 (IST)

Live Update : बीड : भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या 40 विद्यार्थ्यांना विषबाधा!

आष्टीतील टायगर  अकॅडमीत रात्रीच्या जेवणानंतर 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री जेवण केल्यानंतर मध्यरात्री एक वाजेपासून विद्यार्थ्यांना उलटी, जुलाबचा त्रास सुरू झाला. सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 20 जणांची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना आहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी जेवणात हुलग्याची भाजी, भाकरी आणि भात खाल्ला होता. सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिली आहे. याप्रकरणी आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे व "मी राजीनामा दिला आहे. सीएसला विचारा," असे सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे

Jun 29, 2025 10:19 (IST)

Live Update : भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप 

काँग्रेसकडून शहरात करण्यात आली फ्लेक्सबाजी 

बोला अण्णा,बोला ताई अशा प्रकारचे फ्लेक्स पुण्यात झळकले 

भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर स्वतःच्या कार्यालयीन उपयोगासाठी वीज चोरी केल्याचा आरोप केला जात आहे 

त्यामुळे काँग्रेसने महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन देखील छेडले होते 

त्यानंतर आता काँग्रेसकडून शहरात फ्लेक्स बाजी करत धीरज घाटेंवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे

Jun 29, 2025 08:24 (IST)

Live Update : बारामतीतील एका कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येणार.. दोघांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष...

शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येणार आहेत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर (सायन्स पार्क) याची राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन मुंबई यांचे मार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टेक्नॉलॉजी डेमोस्ट्रेशन प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे. 

Jun 29, 2025 08:22 (IST)

Live Update : पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी अंबादास दानवेंच्या घरी मविआ नेत्यांची बैठक

उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, अंबादास दानवेंच्या घरी मविआ नेत्यांची बैठक, बैठकीनंतर दुपारी 1 वाजता होणार पत्रकार परिषद

Jun 29, 2025 08:22 (IST)

Live Update : पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी अंबादास दानवेंच्या घरी मविआ नेत्यांची बैठक

उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, अंबादास दानवेंच्या घरी मविआ नेत्यांची बैठक, बैठकीनंतर दुपारी 1 वाजता होणार पत्रकार परिषद

Jun 29, 2025 08:21 (IST)

Live Update : हिंदीविरोधातील मोर्चासाठी राज ठाकरे घेणार मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

हिंदीविरोधातील मोर्चासाठी राज ठाकरे घेणार मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, सकाळी 11 वाजता मनसेच्या पक्ष कार्यालयात नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे राहणार उपस्थित 

Jun 29, 2025 08:20 (IST)

Live Update : हिंदीविरोधात मराठी अभ्यास केंद्राची आज सभा, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सभेचं आयोजन

हिंदीविरोधात मराठी अभ्यास केंद्राची आज सभा, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सभा, मनसेचे नितीन सरदेसाई, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार