Court News: वंश वाढवण्यासाठी मृत मुलाचे वीर्य द्या.. आईची हायकोर्टात धाव, न्यायालयाने काय म्हटलं?

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: मृत मुलाचे गोठवलेले वीर्य देण्यास नकार दिल्याने एका महिलेने फर्टिलिटी सेंटरविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्या वंशपरंपरा वाढवण्यासाठी त्या विर्याचा वापर करणार असल्याचे त्या महिलेने म्हटलं आहे. महिलेच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील एका फर्टिलिटी सेंटरलामृत पुरूषाचे गोठलेले वीर्य त्याच्या आईने केलेल्या याचिकेची सुनावणी होईपर्यंत जतन करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Dombivli : 65 बेकायदा इमारत प्रकरणी काय तपास केला? उच्च न्यायालयाची ED ला विचारणा

काय आहे नेमके प्रकरण?

याचिकाकर्त्या महिलेच्या मुलाने कर्करोगाच्या केमोथेरपी उपचारादरम्यान त्याचे वीर्य गोठवण्याचा पर्याय निवडला होता. त्याच्या मृत्यूनंतर, आईने मुंबईमधील फर्टिलिटी सेंटरला आपला वंश वाढवण्यासाठी या वीर्याचे नमुने गुजरातमधील आयव्हीएफ केंद्रात नमुना हस्तांतरित करण्याची विनंती केली. मात्र या फर्टिलिटी सेंटरने ते देण्यास नकार दिला. 

कारण त्याच्या संमती पत्रात मृत्युनंतर शुक्राणू वाहून नेणारे द्रव नष्ट करावे असे नमूद केले होते. तसेच नवीन कायद्याअंतर्गत आईला न्यायालयाकडून परवानगी घेण्यासही सांगितले. त्यानंतर महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. 25 जुन रोजी याची सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी महिलेने तिच्या मुलाने त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत न करता त्याच्या संमती फॉर्ममध्ये  जर तो मरण पावला तर गोठलेले वीर्य नष्ट करा असे नमूद केल्याचा दावा केला आहे. 

Tech News : खोटे बोलणे, कट रचणे, धमकावणे... AI च्या नव्या वर्तनामुळे संशोधक चिंतीत

याप्रकरणी खंडपीठाने म्हटले आहे की, सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (नियमन) कायदा, 2021 च्या तरतुदींनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे वीर्य कसे जतन केले जाते याबद्दल याचिकेत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच न्यायालयाने निदर्शनास आणून दिले की सध्याच्या प्रकरणात फेब्रुवारीमध्ये त्याच्या मृत्यूच्या वेळी पुरूष अविवाहित होता.

Advertisement

दरम्यान, या सुनावणीत न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने म्हटले की, जर याचिकेची सुनावणी होईपर्यंत मृताचे गोठलेले वीर्य नष्ट झाले तर ते निष्प्रभ होईल. त्यामुळे अंतरिम निर्देश म्हणून फर्टिलिटी सेंटरला याचिकेच्या प्रलंबित कालावधीत मृत पुरूषाच्या गोठलेल्या नमुन्यांची सुरक्षित देखभाल आणि साठवणूक सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी ठेवली आहे. 

Topics mentioned in this article