जाहिरात

Dombivli : 65 बेकायदा इमारत प्रकरणी काय तपास केला? उच्च न्यायालयाची ED ला विचारणा

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी रहिवासियांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (27 जून 2025) सुनवणी पार पडली.

Dombivli : 65 बेकायदा इमारत प्रकरणी काय तपास केला? उच्च न्यायालयाची ED ला विचारणा
65 बेकायदा इमारत प्रकरणात झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयानं ED ला विचारणा केली.
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी रहिवासियांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (27 जून 2025) सुनवणी पार पडली. या वेळी न्यायालयाने ईडीने या प्रकरणात काय तपास केला ? अशी विचारणा ईडीच्या वकिलास केली आहे. या प्रकरणाची पूढील तपासणी येत्या आठवडानंतर होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्याच्या वकिल प्रिती वाळिंबे यांनी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी वास्तूविशारद संदीप पाटील यांनी याचिका दाखल केली होती.  या याचिकेवर सुनावणी उच्च न्यायालयाने महापलालिकेस या इमारती तोडण्याचे आदेश 19 नोव्हेंबर 2024 रोजी दिले होते. या इमारती 3 महिन्यात तोडण्यात यावे असे आदेशात म्हटले होते. 

फेब्रुवारी 2025 मध्ये या इमारतीमधील रहिवाशींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने काही अंशी त्यांना दिलासा दिला. रहिवाशियांनी इमारत नियमितीकरणासाठी महापालिकेकडे अर्ज करावेत. रहिवासियांनी महापालिकेस अर्ज केले. महापालिकेने ते अर्ज अपूर्ण कागदपत्रांचं कारण देत फेटाळून लावले. त्यानंतर राजकीय पक्षांनी रहिवासीयांची घरे वाचविण्यासाठी आंदोलने केली. रहिवासियांना बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे कारवाई थंडावली. 

( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सापडले 2 कोटींचे ड्रग्ज! घर पाहून पोलीसही हादरले )

मात्र न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी याचिकाकर्ते पाटील यांनी पुन्हा महापालिकेस नोटिस पाठविल्याने महापालिकेने रहिवासीयांना घरे खाली करण्याची नोटिस पाठविल्या. त्यानंतर 65 पैकी ट्यूलिप या इमारतीच्या रहिवायींनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली.  या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्याच्या वकील वाळिंबे यांनी सांगितले की. आज पार पडलेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने ईडीने आत्तापर्यंत काय तपास केला अशी विचारणा ईडीच्या वकिलांना केली आहे. सुनावणीच्या वेळी ईडीचे वकील उपस्थित होते. या प्रकरणातील पुढील सुनावणी येत्या आठवडाभरानंतर होणे अपेक्षित आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com