Coupl Syrup Children Death Case : कप सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याने मध्यप्रदेशमध्ये खळबळ उडाली होती. याप्रकरणी धिंदवाडा पोलिसांनी आरोपी डॉक्टर प्रवीण सोनीला अटक केली आहे. डॉ.प्रवीण सोनीवर विषारी सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टर सोनीला शनिवारी उशिरा रात्री अटक केली आहे. कप सिरप प्यायल्याने 11 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यप्रदेशमध्ये घडली होती. विषारी कप सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याप्रकरणी आरोग्य विभागाचे बीएमओ अंकित यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी डॉ.सोनी आणि श्रीसन कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेमकं काय घडलं होतं?
छिंदवाडा येथे विषारी सिरपमुळे मुलांच्या मृत्यूप्रकरणाबाबत मध्यप्रदेश सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, बेजबाबदारीमुळे मुलांचा मृत्यू झाला. जो सिरप मुलांना देण्यात आला होता, त्यात 46.2 टक्के इतकं डायएथिलिन ग्लायकॉलचं प्रमाण होतं. हे प्रमाण अधिक असल्याने मुलांचा मृत्यू होऊ शकतो. सरकारी डॉक्टरने प्रायव्हेट क्लिनिकमध्ये लोकांना हे औषध लिहून दिले. नागपूरमधून बायोप्सी रिपोर्ट आल्यानंतरही हे प्रिस्क्रिप्शन देण्यात आलं.
नक्की वाचा >> डिलिव्हरी बॉयने केलं मोठं कांड! बिल्डिंगमध्ये पार्सल देताना तरुणीच्या छातीला हात लावला अन्..CCTV Video व्हायरल
मध्यप्रदेशमध्ये सिरपमुळे सहा मुलांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन एक्टिव्ह मोडवर आलं होतं.हे सिरप मध्यप्रदेशमध्ये बॅन होण्याआधी राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये बॅन करण्यात आलं होतं. मुलांचा मृत्यू झाल्यानंतर मध्यप्रदेश सरकारही एक्शन मोडवर आलं आहे. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं कोल्ड्रिफ कफ सिरप संपूर्ण देशात प्रतिबंधित केलं आहे. तसच ज्या ठिकाणी नियम पाळले जाणार नाही, तिथे छापे टाकून औषधे जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत.
11 मुलांच्या कुटुंबियांना 4-4 लाखांची मदत
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटलं होतं की, छिंदवाडा जिल्ह्यात कोल्ड्रिंक्स कफ सिरपमुळे मुलांचा मृ्त्यू होणे, ही दु:खद घटना आहे. कफ सिरपचा तपास अहवाल आल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये या सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या विभागात छापे टाकून सिरप जप्त करण्यात आला आहे.या सिपमुळे ज्या 11 मुलांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना 4-4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
नक्की वाचा >> रोहित पर्व संपलं? टीम इंडियाला मिळाला नवा कॅप्टन, BCCI ने केली संघाची घोषणा, खेळाडूंची लिस्ट वाचा एका क्लिकवर