2 नवऱ्यांच्या व्यथा ऐका... जिला 18 वर्ष शिकवलं ती अधिकारी होताच सोडून गेली, दुसऱ्याची बायको निघाली लेस्बियन!

आपण सामान्यतः कौटुंबिक वादांमध्ये महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या आणि छळाच्या कथा ऐकतो. मात्र, एका सरकारी आयोगाच्या सुनावणीत जेव्हा काही पुरुष आपली व्यथा मांडण्यासाठी पोहोचले...

जाहिरात
Read Time: 2 mins
 Women Commission hearing: महिला आयोगात सुनावणीसाठी दोन अजब प्रकरणं आली आहेत.
मुंबई:

 Women Commission hearing: आपण सामान्यतः कौटुंबिक वादांमध्ये महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या आणि छळाच्या कथा ऐकतो. मात्र, एका सरकारी आयोगाच्या सुनावणीत जेव्हा काही पुरुष आपली व्यथा मांडण्यासाठी पोहोचले, तेव्हा तिथे उपस्थित असलेले अधिकारीही सुन्न झाले. लग्नाच्या 18 वर्षांनंतर पत्नीने अचानक सोडून जाणे असो वा पत्नीचे भलत्याच संबंध असल्याचा संशय असो, पुरुषांनी मांडलेले हे दोन किस्से सध्या भयंकर चर्चेत आले आहेत.

मध्य प्रदेशच्या राज्य महिला आयोगाच्या दोन दिवशीय जनसुनावणीत हे अजब आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. एरवी महिलांच्या तक्रारी ऐकणाऱ्या या आयोगासमोर जेव्हा पतींनी आपल्या पत्नींविरोधात तक्रारीचा पाढा वाचला, तेव्हा ऐकणारे प्रत्येक जण अवाक झाले.

Advertisement

पहिला किस्सा: शिकवून अधिकारी बनवले, पद मिळताच मुलाला घेऊन निघून गेली

पहिल्या प्रकरणात एका पतीने स्वत:ची वेदनादायी कहाणी सांगताना सांगितले की, लग्नानंतर तब्बल 18 वर्षे त्याने पत्नीच्या शिक्षणाचा आणि करिअरचा संपूर्ण खर्च उचलला. त्याच्याच पाठिंब्यामुळे पत्नी टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग विभागात असिस्टंट डायरेक्टर या उच्च सरकारी पदावर रुजू झाली. मात्र, हाती सत्ता आणि अधिकार येताच तिचा नूर पूर्णपणे बदलला. तिने मुलाला सोबत घेतले, घर सोडले आणि थेट पतीविरोधातच छळाची खोटी तक्रार दाखल केली.

( नक्की वाचा : 'लग्नानंतरही माझ्या खोलीत यायची, तिच्या नवऱ्याला VIDEO देखील पाठवलाय,' IPS अधिकाऱ्याच्या चिठ्ठीनं प्रचंड खळबळ )
 

आयव्हीएफ तंत्रज्ञानाने झाला होता मुलगा

पतीने आयोगासमोर वेदना मांडताना सांगितले की, त्यांचा मुलगा आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाद्वारे झाला आहे. आमचे नाते आधीपासूनच खराब असते तर त्यांनी मुलाचा विचार कसा केला असता? यश मिळताच पत्नीने साथ सोडल्याचा आरोप त्याने केला. या सुनावणीला पत्नी गैरहजर राहिल्याने महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा यादव यांनी पुढील सुनावणीत दोन्ही बाजूंना उपस्थित राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

दुसरा किस्सा: 'पत्नीचे मैत्रिणीसोबत संबंध, मला विषाची भीती'

दुसऱ्या पतीने केलेला दावा तर त्याहूनही हादरवणारा होता. आपल्या पत्नीचे एका मैत्रिणीसोबत समलैंगिक (लेस्बियन) संबंध असल्याचा खळबळजनक आरोप पतीने केला. दोघांमधील अश्लील संभाषण ऐकल्याचे आणि चॅटिंग वाचल्याचे सांगत त्याने यासंबंधीचे पुरावेही आयोगासमोर सादर केले. पत्नीकडून आपल्या जीवाला धोका असून ती अन्नातून विष देऊ शकते, अशी भीतीही त्याने व्यक्त केली.

( नक्की वाचा : 'तू मरशील, माझे काय होणार?' कॅन्सर पीडित पतीला सोडून पत्नीने उरकले दुसरे लग्न; कोर्टाचे कडक पाऊल" )
 

मध्य प्रदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या दोन दिवशीय जनसुनावणीत कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, सायबर छळ आणि घरगुती वादांशी संबंधित 50 हून अधिक प्रकरणांवर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आयोगाने आवश्यक ते कायदेशीर निर्देश जारी केले आहेत.
 

Advertisement

Topics mentioned in this article