जाहिरात

'तू मरशील, माझे काय होणार?' कॅन्सर पीडित पतीला सोडून पत्नीने उरकले दुसरे लग्न; कोर्टाचे कडक पाऊल"

Wife Abandons Cancer Patient Husband: पतीचा आरोप आहे की, "तू तर उद्या मरशील, माझे काय होणार?" असे म्हणत पत्नीने त्याच्यापासून दुरावा निर्माण करण्यास सुरुवात केली.

'तू मरशील, माझे काय होणार?' कॅन्सर पीडित पतीला सोडून पत्नीने उरकले दुसरे लग्न; कोर्टाचे कडक पाऊल"
Wife Abandons Cancer Patient Husband: या दोघांचे प्रेम इन्स्टाग्रामवर जुळले होते.
मुंबई:

Wife Abandons Cancer Patient Husband: सोशल मीडियावर एकत्र येताना 'जन्मोजन्मी सोबत राहू' अशा मोठ्या शपथा घेतल्या गेल्या. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने मोठ्या थाटामाटात लग्नही पार पडले. पण संसाराची गाडी अवघी काही महिनेच पुढे सरकली असेल, तोच नियतीने असा काही खेळ खेळला की नात्यातील विश्वासालाच तडा गेला. संकटाच्या काळात पतीला आधाराची गरज असताना पत्नीने दिलेला नकार आणि त्यानंतर घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले आहे.

काय आहे प्रकरण?

इंदूरमधील महसूल कॉलनीत राहणाऱ्या एका कॅन्सरग्रस्त तरुण पतीने आपल्या पत्नीविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. पीडित तरुणाचे नाव आकाश जाट असून त्याची आणि रतलाम येथील साक्षी नकुमची मैत्री इंस्टाग्रामवर झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी 20 नोव्हेंबर 2022 रोजी आर्य समाज मंदिरात विवाह केला. त्यानंतर 13 डिसेंबर 2022 रोजी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने धार्मिक रीतीरिवाजांनुसार पुन्हा एकदा लग्न झालं.

Latest and Breaking News on NDTV

संसाराची नव्याने सुरुवात होत असतानाच आकाशची प्रकृती बिघडू लागली. उपचारासाठी त्याला गुजरातच्या वडोदरा येथे नेण्यात आले. तिथे 10 एप्रिल 2023 रोजी झालेल्या तपासणीत त्याच्या श्वास नलिकेत कर्करोग (कॅन्सर) असल्याचे स्पष्ट झाले. आजाराची माहिती मिळताच पत्नीच्या वर्तनात अचानक मोठा बदल झाला. पतीचा आरोप आहे की, "तू तर उद्या मरशील, माझे काय होणार?" असे म्हणत पत्नीने त्याच्यापासून दुरावा निर्माण करण्यास सुरुवात केली.

( नक्की वाचा : Dombivli News :डोंबिवलीत 73 वर्षांच्या आजीबाईंना 'लिव्ह इन' ची हौस नडली, 57 लाख गेले, बँक खाते रिकामे )

घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असतानाच केला दुसरा संसार

उपचार सुरू असतानाच पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली, मात्र वैद्यकीय कागदपत्रे पाहिल्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर तिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच, पत्नीने 10 जून 2024 रोजी छतरपूर येथील एका तरुणाशी दुसरा विवाह केला. या दुसऱ्या लग्नातून त्यांना एक मुलगीही झाली. या सर्व प्रकारानंतर पतीने आपल्या वकिलांमार्फत न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली.

18 एप्रिल 2026 रोजी कौटुंबिक न्यायालयाने पत्नीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावला. पती गंभीर आजाराशी लढत असताना तिने केलेले आरोप सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. यानंतर, पहिले लग्न कायम असताना दुसरे लग्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 82(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वारंवार समन्स पाठवूनही ती हजर न राहिल्याने न्यायालयाने तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले असून 25 जुलै 2026 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

आई-वडिलांचे छत्र हरपले, मित्रांच्या आधारावर उपचाराची धडपड

कर्करोगासारख्या आजाराशी लढा देत असतानाच 19 जून 2023 रोजी आकाशच्या वडिलांचे निधन झाले. काही दिवसांनंतर त्याच्या आईचेही निधन झाले. एकापाठोपाठ एक बसलेल्या या आघातांमुळे तो पूर्णपणे खचला आहे. सध्या तो एकटाच राहत असून, उपचारासाठी आणि रोजच्या गरजांसाठी त्याला मित्रांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com