गेल्या तीन महिन्यांत आग्रामध्ये मुबारक मंजिल या औरंगजेबाच्या हवेलीसह चार वारसा स्थळे जमीनदोस्त करण्यात आली. मुघल काळात यमुनेच्या काठावर बांधलेल्या रिव्हरफ्रंटमध्ये 17 बागा आणि 28 हवेल्या होत्या, त्यापैकी मुबारक मंजिल ही एक होती. या हवेलीची निर्मिती सामूगढच्या लढाईनंतर औरंगजेबाने केली होती. ही जागा केवळ मुगल बादशाह शाहजहा, शुजा आणि औरंगजेबासाठी महत्त्वाची नव्हती तर ब्रिटीश काळात याचा वापर कार्यालय आणि कस्टम हाऊस म्हणूनही करण्यात आला होता.
नक्की वाचा - Sambhal Dispute : संभळमधल्या पृथ्वीराज चौहानांच्या जमिनीवरही अवैध कब्जा
दिवाळीदरम्यान जोहरा बागेतील तीन मजली इमारतही पाडण्यात आली. तीन मुघल राजांच्या वास्तूकलांचा नमुना म्हणून याकडे पाहिलं जात होतं. शाही हमाम वर्ष 1620 मध्ये अल्लावर्दी खां यांनी या तीन मजली इमारतीची निर्मिती केली होती. ही इमारत गेल्या महिन्यात उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र उच्च न्यायालयाने यावर बंदी आणली. दिल्ली हायवेवर असलेल्या लोदी काळातील मशिदीचा दत्तक हेरिटेजमध्ये समावेश करण्यात आला होता, परंतु ऑक्टोबरमध्ये तिचा घुमट पाडण्यात आला.
पुरातत्व विभागाचे अधिकारी राजीव त्रिवेदी यांनी सांगितलं की, मी लखनऊमध्ये आहे. माझी टीम बुधवारी येथे जाऊ शकली नाही. गुरुवारी माझी टीम निरीक्षणासाठी जाणार आहे. हा मुघल काळातील वारसा आहे, तो नष्ट करता येणार नाही. उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही तीन वारसा स्थळे जमीनदोस्त...
जोहरा बाग - एएसआय संरक्षित तीन मुघल बादशाहाच्या काळात वास्तुकला जोहरा बागेचे तीन मजले दिवाळीवर पाडण्यात आलं होतं.
शाही हम्माम - मुघल काळात १६२० मध्ये अल्लावर्दी खाँ यांनी हम्मामची उभारणी केली होती. गेल्या महिन्यात हा भाग तोडला जात होता, मात्र उच्च न्यायालयाने यावर बंदी आणली.
लोदीकालीन मशीद - दिल्ली हायवेवरील कामायनी रुग्णालयासमोरील बाबरी मशिदीप्रमाणे तयार केलेली लोदीकालीन मशीन दत्तक वारसा हक्कात सामील होती. मात्र ऑक्टोबरमध्ये याचं घुंबट तोडण्यात आलं.