जाहिरात

Sambhal Dispute : संभळमधल्या पृथ्वीराज चौहानांच्या जमिनीवरही अवैध कब्जा

Prithviraj Chauhan : यापूर्वी उत्तर प्रदेशातील संभळमध्ये एक विहीर सापडली होती. ही विहीर आपल्या पूर्वजांची असल्याचा दावा राजा चंद्र विजय सिंह यांनी केला होता. राजा प्रीतम कुमार यांचे ते वंशज आहेत. 

Sambhal Dispute : संभळमधल्या पृथ्वीराज चौहानांच्या जमिनीवरही अवैध कब्जा

उत्तर प्रदेशातील संभळमध्ये रोज नवनव्या गोष्टी सापडायला लागल्या आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तू इथे सापडू लागल्या असून यामध्ये मंदिरे आणि विहिरींचा समावेश आहे. आता संभळमध्ये पृथ्वीराज चौहान यांची जमीन सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. याही जमिनीवर अवैध कब्जा केल्याचा आरोप केला जात आहे. संभळमधल्या शाही जामा मशिदीजवळ एक पोलीस चौकी उभारण्यात येत आहे. ही चौकी जिथे उभारण्यात येत आहे, त्या ठिकाणीला लागून असलेली जमीन पृथ्वीराज चौहानांची असल्याचा दावा केला जात आहे. इथे पृथ्वीराज चौहान होलिकादहन करायचे असे सांगितले जाते. ही जमीन पुन्हा आपल्या ताब्यात दिली जावी जेणेकरून इथे-पूजा-अर्चा सुरू करता येईल असे इथल्या स्थानिकांनी म्हटले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कश्यप समाजातील नागरिकांनी म्हटले आहे की, आमच्या समाजातील महिला पूर्वी इथे पूजा करायच्या. 1978 च्या दंगलीनंतर ही जागा अवैधरित्या बळकावण्यात आली होती. ही जमीन आम्हाला पुन्हा देण्यात यावी जेणेकरून आम्ही इथे पूजा करू शकू. कश्पय समाजातील लोकांनी या जागेच्या मालकीसाठी पोलीस प्रशासनाला एक निवेदनही दिले आहे. 

184 जणांचा मृत्यू, हिंदूंचं पलायन... 46 वर्षांपूर्वी काय घडलं होतं? वाचा संभलच्या शिव मंदिराचं सत्य

नक्की वाचा - 184 जणांचा मृत्यू, हिंदूंचं पलायन... 46 वर्षांपूर्वी काय घडलं होतं? वाचा संभलच्या शिव मंदिराचं सत्य

संभळमधल्या मशिदीजवळ एक पोलीस चौकी उभारण्यात येत आहे. शनिवारी या चौकीची पायाभरणी करण्यात आली. या चौकीमुळे आमचे रक्षण होईल असे आम्हाला वाटत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. स्थानिकांनी या चौकीच्या उभारण्यासाठी पुढाकार घेतला असून इथल्या महिलांनी चौकीच्या उभारणीसाठी श्रमदानही केले. संभळ हे गेल्या काही दिवसांपासून धगधगत आहे.

Latest and Breaking News on NDTV

इथली जामा मशिद हरीहरनाथ मंदिरावर उभारण्यात आल्याचा दावा केला जात होता आणि त्यासाठी एक याचिकाही दाखल करण्यात आली होती.  या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पुरातत्व खात्याला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. सर्वेक्षणादरम्यान इथे हिंसाचार उसळला होता, ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला. 

उत्तरप्रदेशातील संभलमध्ये 30 वर्षांनी उघडलं मंदिराचं दार, शिवलिंग सापडलं; जय श्रीरामची घोषणाबाजी

नक्की वाचा - ​​​​​​​उत्तरप्रदेशातील संभलमध्ये 30 वर्षांनी उघडलं मंदिराचं दार, शिवलिंग सापडलं; जय श्रीरामची घोषणाबाजी

संभळमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिम आणि उत्खनन मोहिमेमध्ये एक बारव सापडली होती. ही बारव आपल्या पूर्वजांची असल्याचा दावा राजा चंद्र विजय सिंह यांनी केला आहे. राजा प्रीतम कुमार यांचे ते वंशज आहेत. ही बारव मानवी सभ्यतेची एक जुनी खूण असून त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. ही बारव किती खोल आहे, ती कुठपर्यंत जाते याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत ही बारव तीन मजल्यांची असल्याचे उत्खननात दिसून आले आहे. या बारवच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमणही हटविण्यात येत आहे.  चंदौसी नगर पालिकेचे कार्यकारी अधिकारी कृष्ण कुमार सोनकर यांनी या 'बारव'बद्दल माहिती देताना सांगितले की ही एक ऐतिहासिक महत्त्व असलेली वास्तू असून यावर कोणालाही बांधकामाचा अधिकार नाही. या बारवचे नीट उत्खनन केले जाईल आणि त्याचे अवशेष जिथपर्यंत सापडत जातील तिथपर्यंतची जागा रिकामी केली जाईल.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com