Actress Rokeya Prachy: बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेत्री रोकेया प्राची यांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. "युनूस हे गुन्हेगार आणि दंगखोरांचे 'गॉडफादर' बनले असून, त्यांनीच माझ्यावर जमावाकडून हल्ला घडवून आणला," असा आरोप प्राची यांनी केला आहे.
नक्की वाचा: जिम की धर्मांतराचा सापळा? व्यायामाच्या नावाखाली तुमच्या लेकीच्या मनावर आणि धर्मावर घातला जातोय घाला
भररस्त्यात विवस्त्र करण्याचा प्रयत्न
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोकेया प्राची हिने तिच्यासोबत घडलेल्या भयानक घटनेबद्दल सविस्तरपणे सांगितले. 14 ऑगस्ट 2024 रोजी युनूस यांच्या समर्थकांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात माझे कपडे फाडण्यात आले आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने काही लोकांनी मध्यस्थी केल्यामुळे माझा जीव वाचला. असं रोकेया प्राची हिने म्हटले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर हादरलेली प्राची लपून बसली होती. तिने कसंबसा बांगलादेशातून पळ काढला आणि भारत देश गाठला.
हिंदूंच्या नरसंहारावर युनूस गप्प का? प्राचीचा सवाल
प्राची हिने बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 5 ऑगस्ट 2024 नंतर बांगलादेशात हिंदींवर अनन्वित अत्याचारांना सुरूवात झाली. बांगलादेशातील मंदिरे पाडली जात आहेत. दीपू चंद्र दाससारख्या अनेक हिंदूंची हत्या केली जात आहे, मात्र युनूस सरकारने याबद्दल साधा खेदही व्यक्त केलेला नाही असे प्राचीने म्हटले आहे. युनूस हे संविधानाचा वापर संविधान संपवण्यासाठीच करत आहेत, अशी टीकाही तिने केली आहे.
नक्की वाचा: मुंगीच्या वेगाने धावणारी ट्रेन! 5 तासात कापते 'एवढेच' अंतर; कोणती आहे भारताची सर्वात स्लो रेल्वे?
बांगलादेश 'जंगिस्तान' होईल!
भारतात सुरक्षित पोहोचल्यानंतरही रोकेया यांना अजूनही बलात्कार आणि हत्येच्या धमक्या येत आहेत. त्यांनी इशारा दिला की, जर आगामी निवडणुकीत 'आवामी लीग'ला लढू दिले नाही, तर बांगलादेशचे अस्तित्व संपेल आणि त्याचे रूपांतर एका 'जंगिस्तान'मध्ये होईल. बांगलादेशातील इतर महिला आपल्यासारख्या नशीबवान नाहीत, त्या आजही नरकयातना भोगत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.