जाहिरात

Gym Jihad: जिम की धर्मांतराचा सापळा? व्यायामाच्या नावाखाली तुमच्या लेकीच्या मनावर आणि धर्मावर घातला जातोय घाला

Gym Jihad Case: व्यायामाच्या नावाखाली तुमच्या लेकीच्या मनावर आणि धर्मावर घाला घातला जात असेल तर? हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. 

Gym Jihad: जिम की धर्मांतराचा सापळा? व्यायामाच्या नावाखाली तुमच्या लेकीच्या मनावर आणि धर्मावर घातला जातोय घाला
Mirzapur Gym Conversion Case : काही जिम्समध्ये व्यायामाच्या नावाखाली धर्मांतराचे एक मोठे आणि भयंकर षडयंत्र रचले जात होते. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Gym Jihad Case:  तुमची मुलगी घराबाहेर पडते, तेव्हा ती सुरक्षित असेल असा विश्वास प्रत्येक पालकाला असतो. स्वतःला फिट ठेवण्यासाठी किंवा छंद म्हणून  मुले जिममध्ये जातात, पण तिथे व्यायामाच्या नावाखाली तुमच्या लेकीच्या मनावर आणि धर्मावर घाला घातला जात असेल तर? हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. 

सध्या एका अशाच धक्कादायक प्रकाराने संपूर्ण देश हादरला असून, जिम ही शरीर कमावण्याचे साधन नसून धर्मांतराची फॅक्टरी बनल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. तुमची मुलगी ज्या ट्रेनरच्या विश्वासावर जिममध्ये जाते, तोच जर तिच्या आयुष्याशी खेळत असेल, तर आता सावध होण्याची वेळ आली आहे.

काय आहे प्रकरण?

हे खळबळजनक प्रकरण उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये उघडकीस आले आहे. मिर्झापूरमधील काही जिम्समध्ये व्यायामाच्या नावाखाली धर्मांतराचे एक मोठे आणि भयंकर षडयंत्र रचले जात होते. हे केवळ एक छोटे रॅकेट नसून शहरातल्या अनेक जिम्समध्ये ही मोडस ऑपरेंडी अत्यंत पद्धतशीरपणे राबवली जात होती. 

दोन धाडसी मुलींनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार केल्यानंतर या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला आहे. या मुलींना जिममध्ये केवळ धमकावले जात नव्हते, तर त्यांना कुराण वाचायला लावण्यापासून ते धर्म बदलण्यापर्यंत जबरदस्ती केली जात होती.

( नक्की वाचा : Beed News : बीड हादरलं! 100 जणांच्या धर्मांतराचा कट, पास्टरसह 3 जण.... )
 

काय होते रॅकेट?

मिर्झापूरमधील केजीएन (KGN) जिमच्या 3 शाखा आणि आयर्न फायर नावाच्या जिममध्ये हे रॅकेट फोफावले होते. इथले जिम ट्रेनर मुलींना हेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करायचे. इन्स्टाग्रामवरून मुलींशी ओळख वाढवायचे आणि नंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे.

एकदा का मुलगी जिममध्ये येऊ लागली की, तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल केले जायचे. लग्नाचे आमिष दाखवून किंवा भीती घालून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

मुलींची होत असे विभागणी

या संपूर्ण रॅकेटमध्ये सन्नो नावाची एक महिला या जिम ट्रेनर्सची मुख्य साथीदार होती. सन्नोचे काम मिर्झापूरमधील स्थानिक मुलींशी मैत्री करणे आणि त्यांना गोड बोलून जिममध्ये घेऊन येणे हे होते. एकदा मुलगी जिममध्ये आली की, हे ट्रेनर्स आपापसात मुलींची विभागणी करायचे. 
 

एखादा ट्रेनर एखाद्या मुलीला फसवण्यात अपयशी ठरला, तर दुसऱ्या ट्रेनरवर ती जबाबदारी सोपवली जायची. हे सर्व अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले जात होते, ज्यामुळे अनेक मुली या जाळ्यात अडकत गेल्या.

( नक्की वाचा : जयपूरचा पीयूष कसा बनला मो. अली? मुलाचा दाढीवाला फोटो पाहून आई आजारी पडली, वडिलांचं दुःख बघून येईल डोळ्यात पाणी )

पोलिसांनी या तक्रारीनंतर अत्यंत वेगाने कारवाई करत केजीएन आणि आयर्न फायर या जिम्सना सील ठोकले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 32 वर्षांचा जहीर, 31 वर्षांचा मोहम्मद शेख अली आलम, 34 वर्षांचा फैजल खान, 36 वर्षांचा शादाब आणि 28 वर्षांचा फरीद अहमद या जिम ट्रेनर्सना बेड्या ठोकल्या आहेत. 

अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मुलींचे शेकडो आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत, जे ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जात होते. मुख्य आरोपी फरीदला पकडण्यासाठी पोलीस गेले असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनी त्याला जखमी अवस्थेत ताब्यात घेतले.

हेड कॉन्स्टेबलच मास्टरमाईंड

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटचा मास्टरमाइंड उत्तर प्रदेश पोलीस दलातील एक हेडकॉन्स्टेबल आहे. इरशाद असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने अवैध मार्गाने कमावलेल्या पैशातून मिर्झापूरमध्ये जिम्सची साखळी उभी केली होती. पोलीस दलात असूनही तो या धर्मांतराच्या फॅक्टरीचा मुख्य कणा होता, हे समजताच प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

लव्ह जिहाद आणि लँड जिहादनंतर आता हे जिम जिहादचे नवे स्वरूप पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुलींनी जिममध्ये जाताना ट्रेनर कोण आहे याची शहानिशा करावी, असे आवाहन केले होते, ज्याची प्रचिती आता या मिर्झापूरमधील घटनेवरून येत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com