Tahawwur Rana : मुंबई 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला भारतात आणणार, तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणाला मंजुरी

Mumbai 26/11 terrorist attack : तहव्वुर राणावर मुंबईत येऊन रेकी केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्याच्यावर लष्कर आणि आयएसआयसाठी काम केल्याचाही आरोप आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai AttackeUpdate

मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंट तहव्वूर हुसेन राणा याच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. भारतासाठी हे मोठे यश मानले जात आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राणाच्या प्रत्यार्पणाची भारताने अनेक दिवसांपासून मागणी केली होती. राणावर मुंबईत येऊन रेकी केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्याच्यावर लष्कर आणि आयएसआयसाठी काम केल्याचाही आरोप आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तहव्वूर राणा सध्या लॉस अँजेलिस येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये कोठडीत आहे. 13 नोव्हेंबर 2024 रोजी राणाने प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते, जे 21 जानेवारी रोजी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने फेटाळले. यापूर्वी त्याने सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात अपील केले होते, जिथे त्याची याचिका फेटाळण्यात आली होती. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते.

(नक्की वाचा-  Walmik Karad Property : वाल्मिक कराडला दणका; कराडच्या सर्व जगंम मालमत्ता जप्त होणार?)

मुंबई हल्ल्याच्या आरोपपत्रातही राणाच्या नावाचा आरोपी म्हणून उल्लेख आहे. त्यानुसार राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा सदस्य आहे. आरोपपत्रानुसार तहव्वूर राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याला मदत करत होता. 27 वर्षांपूर्वी झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तहव्वूर राणा एकेकाळी पाकिस्तानी लष्करात डॉक्टर होता आणि 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई हल्ल्यात त्याचा हात असल्याचा आरोप आहे.

( नक्की वाचा :  Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, महाकुंभात केले पिंडदान, Video )

अमेरिकेत पकडल्यानंतर हेडलीने मुंबई हल्ल्याच्या कटातील त्याच्या आणि राणाच्या भूमिकेची संपूर्ण माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली. अमेरिकन कोर्टाने हेडलीला 35 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, पण मुंबई हल्ल्याप्रकरणी राणाला निर्दोष ठरवले. मात्र, डेन्मार्कमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याबद्दल त्याला 14 वर्षांची शिक्षा झाली. 

Advertisement