मुंबईहून इंग्लंडला जाणारे भारतीय प्रवासी कुवेतमध्ये अडकले, 13 तासापासून अन्न-पाण्यापासून वंचित

जवळपास 60 भारतीय प्रवासी कुवेतमध्ये अडकले आहेत. ते मुंबईहून मॅचेस्टरला चालले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

मुंबईहून इंग्लंडच्या मॅचेस्टरला जाणारे भारतीय प्रवासी गेल्या 13 तासापासून कुवेतमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना कुठलीही सुविधा मिळालेली नाही. त्यांना अन्न आणि पाण्यापासूनही वंचित ठेवण्यात आले आहे. पण विमान कंपनींने त्यांच्याकडे कोणतेही लक्ष दिले नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. जवळपास 60 भारतीय प्रवासी अडकले आहेत. ते मुंबईहून मॅचेस्टरला चालले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गल्फ एअर लाईन्स भारतीय प्रवासी इंग्लडसाठी चालले होते. हे विमान बहरिनला पोहोचले. त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू झाला. अडीच तासानंतर आपातकालीन लँडींगची घोषणा करण्यात आली. त्यावेळी विमानाच्या इंजिनमधून धुर येत होत असं प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यातून सांगितलं. त्यानंत कुवेतमध्ये हे विमान उतरवण्यात आले. मात्र तिथे केवळ युरोपीय संघ, युके आणि अमेरिकेच्या प्रवशांना सुविधा देण्यात आल्या. 

ट्रेंडिंग बातमी - 'अजितदादा आमच्यात आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या' शिंदेंचा शिलेदार थेट बोलला

भारतीय प्रवाशांनी आपल्यालाही लाउंजमध्ये बसण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तिथल्या अधिकाऱ्यांना केली. मात्र त्यांनी त्यांना कोणतेही सहकार्य केले नाही. जवळपास 60 भारतीय विमानतळावर अडकले होते. त्यांना गल्फ एअर लाईन्स कडूनही कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. केवळ तीन तासांनी सांगितलं जात होतं की तुमचं विमान रवाना होणार आहे. पण तसं  काहीच झालं नाही.   

ट्रेंडिंग बातमी - मनसेत राडा! अविनाश जाधवांनी पदाधिकाऱ्याला जबर मारहाण केल्याचा आरोप

त्यानंतर सर्वांनी मिळून आपल्याला उद्या कामावर जायचं आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये आता पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी आमची सोय करावी. आमची इंग्लंडमध्ये वाट पाहीली जात आहे असंही भारतीय प्रवाशांकडून सांगितलं गेलं. पण त्याचाही काही परिणाम झाला नाही. शिवाय दुतावासाकडून काही मदत मिळत आहे का याची ही हे प्रवासी आता चाचपणी करत आहेत. या सर्व प्रवाशांना विमानतळाच्या फर्शांवरच बसावे लागले. ही सर्व माहिती प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.   
 

Advertisement